|
पु. स्त्री. एक शाक भाजी ; माठ . स्त्री. न. भाज्या , मीठ इ० ठेवण्याचें दांड्याचें लाकडी पडगें . रचणें ; व्यवस्थित ठेवणें ( काम , कारखाना यांकरितां - हत्यारें , उपकरणें , साहित्य इ० ) मांडीस होणारा रोग . यानें सर्व मांडी सुजून मांडीचें हाड कुजतें . केलेली रचना ; मांडणी . ( क्रि० मांडणें ). योग्य बैठक ( घोड्यावरची , लिहितांना घातलेली ). ( क्रि० जमणें ; बसणें ; साधणें ). स्वारांच्या टोळीचा हल्ला . ( क्रि० करणें ). देखावा ; व्यवस्था . दावूनिया मांड । पुरे न करीती भांड ! - तुगा ३११५ . विस्तार ; पसारा . घोडेस्वारांची टोळी . दाटती मांड मांडिला . - ऐपो २३२ . [ मांडी ] ०मांडणें जमविणें - घोड्यावर चांगलें बसतां येणें . जमवून मांड घोड्याला । - संग्राम १२४ . वैभव . काळीं संहारीना मांड त्यांचा सारा मी हरी । - मोरा मायणें १ . २५२ . ( गो . ) दुकान . ०गादी स्त्री. घोड्यावर बसणार्याच्या मांड्या गच्च व सोईस्कर बसण्याकरितां खोगराच्या पुढील भागीं केलेली गादी . [ मांडी + गादी ] ( कों . राजा . कु . ) पिशाचादिकांस बलि देण्याचे वेळीं भगतानें देव - देवतांची स्थापना करण्याचा विधि . ( क्रि० भरणें ) ०चोळणा चेपणें चेपणी - पुनस्त्री . मांडीचोळणा इ० पहा ; लांडी विजार . ०पत्र न. ( मांडीवर घेऊन दत्तविधान करितात यावरुन ) दत्तकपत्र ; दत्तक घेण्याविषयींचा लेख , करार . [ मांडी + पत्र ] होळीच्या सणामध्यें ग्रामदेवतेस कौल लावणें . ०पुत्र पु दत्तक घेतलेला मुलगा . [ मांडी + पुत्र ] मोड स्त्री . मांडीमोड पहा . ठेवलेलेपणा ; मांडलेलेपणा ; स्थिरावलेली स्थिति . ( मांडणें या क्रियापदासह उपयोग करतात ). ०वर्त पु. घोड्याच्या मांडीवरील भोंवरा . - अश्वप १ . १०१ . ( संगीत ) एक राग . ह्यांत षडज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . जाति संपूर्ण - संपूर्ण . वादे षडज , संवादी पंचम , गानसमय सार्वकालिक . ( कों . ) झोडलेल्या भाताची रास . [ मांडणें ] ०काडप ( गो . ) दुकान उघडणें . ०घालप ( गो . ) दुकान स्थापन करणें . मांडणावळ स्त्री . मांडणें , व्यवस्थित ठेवणें याबद्दल द्यावयाचें मोल , किंमत . मांडणी ; मांडणूक . मांडणी , मांडणूक - स्त्री . मांडणें ; मोकळेपणीं व व्यवस्थित रीतीनें पसरणें ; थाटणें ; लावणें ; रचणें . जमीनीवर प्रथम टाहाळाची मांडणी करावी मग वर गवत घालावें . व्यवस्थित रचना . तदन्याय वृक्षपाषाणीं । आणिली ज्यानें गंधर्वमांडणी । - नव १९ . ४८ . सांगाडा ; नुसती बांधणी ; बंदिस्ती ( इमारतीची ). मांडणें - सक्रि . मोकळेपणीं व व्यवस्थितपणें पसरणें , ठेवणें , रचणें ( काम , धंदा यांकरितां - साहित्य , सामान , जरुरीच्या गोष्टी ). स्थापन करणें ; उघडणें ( दुकान , व्यापार ). लिहिणें ; वहींत दाखल करणें ( खर्चाच्या बाबी , टांचण ). तयार केलेल्या चिखलांत रोपापाठीमागून रोप याप्रमाणें लावणे ; आवटणें ( नाचणी , वरी इ० चीं रोपे - आवटणी करतांना ). प्रतिपादणें . मना सर्वथा मिथ्य मांडूं नकोरे । - राम १९ . व्यापणें . जी भूतीं भूतळ मांडिलें । - ज्ञा ११ . २८६ . पाळणें . देह सांडावा ना मांडावा । - एभा २० . १४९ प्रवर्तणें ; चालविणें ; दाखविणें ; प्रदर्शित करणें इ० . कज्जा मांडला , सोदेगिरी , मांडली , फजिती मांडली . कडाक्यानें व यथेच्छ चालू करणें . त्यानें गालीप्रदान मांडलें - लत्ताप्रहार मांडला - ढंग मांडले - चेष्टा मांडल्या . - अक्रि . इच्छेप्रमाणें . वागण्यास संधि मिळणें ; फावणें . अंधारी रात्र आली म्हणजे चोराचें मांडतें . बनणें ; तयार होणें ; निघणें . बाजरीच्या कणसांत अझून दाणा मांडला नाहीं . आरंभ होणें . जैसा प्रळयकाळ मांडला । - ज्ञा १ . १५८ . [ सं . मंड = शोभविणें ] मांडपूस - स्त्री . मांडणें , नोंद करणें व पुसणें ; लिहिणें व तपासणें . प्रत्येक वसुलाची लेखी पावती दप्तरांत मांडपूस होत आहे . - के २० . ५ . ३६ . मांडली - स्त्री . मंडण , रचना . म्हणौनि निवृत्तीचि मांडली । सूनि प्रवृत्तितळीं । - ज्ञा १८ . ७०४ .
|