|
पु. लक्ष्मीपति ; विष्णु [ सं . मा + पति ] वि. रगड ; पुष्कळ ; उमाप . आज पाऊस माप पडला आहे . [ अमाप ] न. न. ( गों . ) उन्हांत वाळविलेली मोठी वीट ; कच्ची वीट . - शामची आई . [ मापणें ] प्रमाणानें मोजून निश्चित करण्याचें साधन ; ( वजन , सांठा , लांबी , वेळ इ० ) मोजण्याची , गणण्याची क्रिया . ( क्रि० करणें ; चालवणें ; घेणें ; मांडणें ; लावणें . ) आज भाताचें माप चाललें आहे . गणना ; गणनेनें निश्चित करणें . आंब्याचें माप झाले म्हणजे खुरद्याचें माप घे . ( सामा ) मापण्यानें निश्चित केलेलें मान , परिमाण . दहा खंडी माप भरलें ; ( सामा . ) मापण्याचें साधन ( वजन , सांठा , लांबी इ० चें ) उदा० वजनी माप , कैली माप , धान्य माप , कापडाचें माप . इ० , मापण्याचें कोणतेंहि साधन . मापलेला , परिमित भाग . त्या खांचरांत चार मापें आहेत . ( खा . ) बारा डोळें किंवा चार पायली , डोळा अर्थ १० पहा . [ सं . मा = मोजणें ] ०देणें घेणें - मापून देणें , घेणें . ०कुतर्यानें - एखादी गोष्ट गतगोष्टीपैकीं एक होणें ; एखाद्या गोष्टीची गतगोष्टींत गणना होणें . पदरीं घालणें , नेणें - एखादी गोष्ट गतगोष्टीपैकीं एक होणें ; एखाद्या गोष्टीची गतगोष्टींत गणना होणें . पदरीं घालणें , ०घालणें एखादी गोष्ट अमान्य करणारास ती अनेक प्रमाणांनीं खरी करुन पटवून देणें . ०लागणें मापीं लागणें - कमी कमी होणें . मापीं लागलें शरीर । - दा ३ . ९ . १ . आपल्या मापानें मोजणें मापानें मोजणें - आपल्या स्वतःच्या ( प्रमाण असलेल्या ) मापानें मोजणें . माप आणि महापाप - खोटें माप घालणें भहापाप होय . सामाशब्द - ०पट्टी ऐनजिनसी सारा घेतांना धान्य मापण्याबाबत शेतकर्यावर बसविलेला कर . ०वरताळा वर्ताळा - पु . धान्याच्या सार्याच्या खंडीमागें सरकारानें हक्कानें मागितलेला वरतावळा . ( कों . ) कुळाकडून धान्य घेतांना माप घेण्यासाठीं हक्क म्हणून ठरीव खंडापेक्षा एकचौसष्टांश किंवा एकअष्टमांश जास्त घेतलेला मा , रकम . मापटें - न . साठप्याचें माप ; अर्धा शेर , एक अष्टमांश पायली ; निठवें . म्ह० ( व . ) आपलं तें मापटं दुसर्याचं तें दीड पायली . मापणें - सक्रि . ( वजन , साठपा , लांबी , वेळ यांच्या ) मापानें निश्चित करणें ; मोजणें ; तोल करणें ; मेज घेणें . [ सं . मा ; झें . मा ; ग्री . मेचिओ ; लॅ० मेतिओर ] मापन - न . मापणें ; मोजणें ; माप घेणें . मापाड्या , मापारी , मापेली - वि . ( सरकारी कोठ्या , बाजार माल यांतील ) सरकारी धान्य मापणारा . ( सामा . ) मापणारा . आयुष्य मोजायाला बैसला मापारी । तूं कांरे व्यापारीं संसाराच्या । मापारकी - स्त्री . मापार्याचा धंदा . मापारी - स्त्री . धान्य इ० मोजण्याचें फरा नांवाचें एक माप . मापी - वि . साठप्याच्या मापानें निश्चित केलेला . मापानें मोजण्यासारखें ; साठप्याचें ; वजनीच्या उलट . माप दाखविणार्या शब्दांच्या पूर्वी हा शब्द जोडून येतो . जसें मापी खंडी - मण - शेर . मापीव , मापित - वि . मापलेला . ह्याच्या उळट तोलीव , मोजीव .
|