Dictionaries | References

मुडकें

   
Script: Devanagari
See also:  मुंडकी

मुडकें     

नस्त्री .
डोकें ; शिर .
डोक्याला बांधायाचें तीन चार हात लांबीचें वस्त्र ; मुंडासें ; रुमाल .
हजामत केलेला किंवा डोक्यावर केस नसलेला मनुष्य .
पानें झडून गेलेलें झाड ; बोडका वृक्ष .
न्हावी .
मुंडकोपनिषद ; अथर्ववेदाचें एक उपनिषद .
( व . ) कुल ; घराणें . रामराव गोपाळरावांच्या मुंडांतील आहेत . - वि .
केंस नसलेला ; बोडका .
हजामत केलेला ; मुंडित .
( व . ) सुस्त . [ सं . मुंड ]
०मुंडावणें   एखाद्या कार्याला वाहून घेणें . तुझे निरोप पोंचवायला मी कांहीं मुंड मुंडावून बसलों नाहीं .
०माला   ळा - स्त्री . मेलेल्या माणसांच्या मुंडक्यांची , डोक्याच्या कवच्यांची माळ ; रुंडमाळा ; शिरांची माळ . मुंडण - न .
हजामत ; हजामपट्टी ; क्षौर ; चौल , उपनयन व तीर्थयात्रा इत्यादि कर्मांत करावी लागणारी हजामत .
( ल . ) खरडपट्टी ; तासडपट्टी ; शिव्या हासडणें . [ सं . ] म्ह० तीर्थीं गेल्यावांचून मुंडण होत नाहीं .
०पर्वणी  स्त्री. 
हजामत करण्यास योग्य दिवस .
( ल . ) सुट्टीचा दिवस . मुंडणें - क्रि .
हजामत करणें ; मुंडन करणें .
मंत्रोपदेश देणें ; गुरुपदेश देणें ; शिष्य बनविणें .
( अशिष्ट ) फसवून लुबाडणें ; ठकवून द्रव्य काढणें .
संन्यास देणें ; घेणें . नलगे हिंडणें मुडणें तें कांहीं । साधनाची नाहीं आटाआटी । - तुगा २५८० . [ सं . मुंडन ; फ्रें . जि . मुर ] म्ह० वैद्याचें वाटलें आणि संन्याशाचें मुंडलें कोणास समजत नाहीं . मुंडला जाणें - लुबाडला जाणें . मुंडंती - स्त्री . चांगली खरडपट्टी ; बोडंती ; तासडपट्टी ; खरमरीत कानउघाडणी . मुंडवण - स्त्री .
फसवणूक ; नागवणूक ; मोहनी . ( क्रि० पडणें ; घालणें ).
( ल . ) शिव्यांचा भडिमार ; खरडपट्टी . मुंडविणें , मुंडाविणें - क्रि . हजामत करणें ; डोकें तासणें . मुंडावळ , मुंढावळ , वळी , मंडावळ - स्त्री . वधूवरांच्या किंवा मुंज्या मुलाच्या डोक्याला फुलें , मोतीं इ० ची तोंडाच्या दोन्ही बाजूला पदर लोंबणारी बांधतात ती माळ .
फुलांची माळ ; गजरा . [ मुंड + आवली ] मुंडासें , मुंढासें - न . साध्या बांधणीचें लहान पागोटें ; शिरोवस्त्र ; हेंच ओबडधोबड बांधणीचें मोठे पागोटें असल्यास त्यास निंदार्थी पुल्लिंगी . मुंडासा असें रुप योजितात . ) [ हिं . मुंडासा ; का . मुंडास ] मुंडासबंद - वि . ( व . ) पागोटें बांधणारा , घालणारा . मुंडित - वि . हजामत केलेला ; मुंडन केलेला ; तासलेला . मुंडी , ढी - पु . ( निंदार्थीं ) ( शेंडी न ठेवतां सर्व हजामत करतात म्हणून ) संन्याशी ; गोसावी . - स्त्री .
शिर ; डोकें ; मुंडकें . दुर्धर योग धराया जैसी देतात धीरतर मुंडी । - मोभीष्म ५ . ४३ .
( मल्लविद्या ) दोन खांदे व कमरेचे दोन खवाटे मिळून चार मुंड्या होतात त्यांपैकीं प्रत्येक भाग ( यावरुन ). चारी मुंड्या चीत होणें -
वरील अवयव जमिनीला लागतील अशी जमिनीला पाठ लागणें
( ल . ) पूर्ण पराभव होणें . मुंडी फिरवणें - नापसंति , नावड दाखविणें . मुंडी मुरगाळणें , पिळणें , पिरगळणें - ( एखाद्याचा ) सर्वतोपरी नाश करणें ; त्रास देणें ; छळणें ; एखाद्याच्या उपजीविकेचें साधन नाहींसें करणें . मुंडी हालविणें , डोलविणें - विषय न समजतां समजला असें डोकें हालवून सांगणें ; वरिष्ठाच्या म्हणण्यास अनुसरणें ; होस हो करणें . मुंडी , मुंड मोचन - न .
( अशिष्ट ) चोरांनीं केलेला शिरच्छेद .
दुर्दशा ; शिव्या शाप , द्रव्य हरण इ० नीं केलेली दुर्दशा . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP