|
स.क्रि. उकरणें . जैसा न मोडिलिया विहिरा । मग आपलिया उगमीं झरा । भरोनि ठाके । - ज्ञा १५ . २६९ . [ सं , मुट , मुड = मोडणें ; सं . मोटन ; प्रा . मोडण ; हिं . मोडन ] मोडणें शब्द उत्तरपदीं येणारे कांहीं वाक्यप्रचार ( एखाद्याचें ) मन मोडणें = त्याच्या इच्छेविरुद्ध जाणें , न ऐकणें ; त्याची आज्ञा निष्फळ करणें ; मर्जीच्या उलट जाणें . घर मोडणें = कुटुंबातील माणसांची पांगापांग करणें . प्रॉमिसरी नोट मोडणें = ती बाजारभावानें विकून मोबदल्याचे पैसे घेणें . दिवस मोडणें = दिवस खर्च करणें . भय मोडणें = भय घालविणें ; भीति वाटेनाशी करणें . चालरीत मोडणें = चालरीत सोडणें , ती न पाळणें . मातीचे चित्र मोडणें = तें छिन्नभिन्न करणें . अ.क्रि. स.क्रि. तोडून खाली टाकणें , पाडणें ; नाश करणें ; बिघाड करणें , ( इमारत इ० ); विस्कळित करणें ; भग्न करणें ; नाहींसें करणें ( मोडणें आणि तोडणें ह्या दोन्हीहि क्रियापदांचा हा सर्वसामान्य अर्थ आहे . तरी पण दोहोंच्या अर्थांत बराच भेद आहे . ( तोडणें पहा . ) तोडणे याचा अर्थ कांहीं तरी मोठें , अचानक , भयंकर कृत्य करुन तीक्ष्णधारी जोरकस हत्याराचा उपयोग करुन किंवा जोरानें किंवा एकदम हिसकून एखाद्या वस्तूचा नाश करणें . आणि मोडणें म्हणजे पदार्थांच्या आकारांत , स्थितींत बदल करणें . उदा० रान तोडणें आणि रान मोडणें हे दोन वाक्यप्रचार घेतले तर पहिल्यांतील तोडणें याचा अर्थ रानांतील झाडें तोडून , छाटून , खांडून नाहींशी करणें व मोडणें याचा अर्थ रानांतील झाडझुडूप काढून साफसफाई करणें असा अर्थ ध्वनित होतो . ) जसें :- देशपद्धति मोडणें . त्याचें लग्न त्यानें मोडलें . भग्न होणें ; छिन्नविच्छिन्न होणें ; विस्कळित होणें . तुकडे करणें ; भाग किंवा अवयव वेगवेगळे करणें ( यंत्राचे इ० ). र्हास पावणें ; अपकर्ष पावणें ; कमी होणें . ( एकादशी ) निष्फळ होणें . वांकवून तुकडा करणें ( कांठी , वेत , लांकूड इ० चे ) खुडणें . ( धान्याचीं कणसें , भुट्टे इ० ). जादुगारानें काठी मोडलेली आम्ही पाहिली . तोडणें ; नाहींसा करणें ( मैत्री , संगत , दुकानदारी , व्यवहार इ० ). मोडून जाणें ; भाराखालीं , दाबाखालीं नमणें . प्रकृति खालावणें ; र्हास होणें . विस्कळित होणें ; विस्कट होणें ; पांगापांग होणें ( बाजार , मंडळी , सभा , कौन्सिल इ० ची ). म्हैस उधळल्यामुळें सभा मोडली . ओसाड होणें ; निर्जन होणें ; लोकांची वस्ती नाहीशी होणें . खुरदा किंवा नाणें करुन आणणें ( मोहरा , रुपया यांचें ) एक रुपाया मोडून नाणें , खुर्दा घेतला . पैसे करणें ; ( दागिन्याचे , धातूच्या भांड्याचें ). विक्री करुन पैसे घेणें ( जनावराचे , वस्तूचे ). दिवाळें वाजणें ; मोडतोड होणें . भंग करणें ; अडथळा करणें ; बिघाड करणें ( झोपेचा , शांततेचा , चालू कामाचा , उद्योगाचा इ० ). बंद पडणें ; चालूं नसणें ( उद्योग , कारखाना , धंदा ). बिघडविणें ; नाखूश करणें ; अवमानणें ( मन , मर्जी , इच्छा , हेतु ). पितृसत्यपालना प्रभु कैकेयीचें न चित्त मोडून । - मोरामायणें १ . ४८४ . बिघाड करणें ; रचना , जुळणी नाहींशी करणें ; विस्कटणें ( पागोटें , निर्या इ० ). नांवाखालीं येणें ; मध्यें अंतर्भाव होणें ; जाणीव होणें ; पोटांत , सदरांत येणें , अंर्तभूत होणें . पुणें शहरांत भांबुर्डा मोडतो हिंदुस्थानांत लंका मोडते . स्मृतीतून नष्ट होणें ; विस्मरण पडणें ( आचार , रुढी , पद्धत यांचें ). नाहींशी करणें ; ओसाड पाडणें ; ( वस्ती , गांव , वसाहत ). खंडण करणें ; पाडाव करणें ( पक्ष , मत , वाद इ० चा ). ( अशक्तपणामुळें , अधिक श्रमामुळें ) ढिलें पडणें ; हतबल होणें ; त्राण नाहींसा होणें ; कसकसणें . खर्च करणें ; नाश करणें ; गमावणें ; घालविणें ; बुडविणें ( वेळ , काळ , दिवस ). तुटणें . अंग मोडून येणें , मोडून येणें - कसकस येणें ; तापाची कसर येणें ; हातपाय मोडून येतात . मोडतें घेणें - नाकबूल करणें ; इनकार करणें ; नाकारणें ; माघार घेणें ; मागें हटणें ; पाऊल मागे घेणें . मोडता काळ - पु . अपकर्षाचा , मंदाईचा काळ . मोडत्या काळीं जो धर्म करील तो धर्मात्मा . [ सं . मुट = चूर्ण करणें ; ठार करणें ] जोर हटविणें , नाहींसा करणें ; शमविणें ; दाबून टाकणें ; घालविणें . ( तहान , भूक , काळजी , संशय , भय ). जिरविणें ; कमी करणें ; घालविणें ( खोड , व्यसन , गर्व , इ० ). स्थिरस्थावर करणें ; सांत्वन करणें ; नाहींसे करणें ( भांडण , झगडा , दंगा ). भंग करणें ; अतिक्रमण करणें ; उल्लंघन करणें ( कायदा , हुकूम , आज्ञा , वचन , करार इ० ). रद्द करणें ; बंद करणें ; काढून टाकणें ( कायदा ; नियम , विधी , संस्कार , समारंभ ). दिवाळें काढणें ; नाश करणें ; मोडतोड करणें . पुसून टाकणें ; नाहींशी करणें ; खरडून टाकणें ; मागमूस दिसूं न देणें . गाडीची वाट फेसाटीनें मोडावी . मोडणें हें तोडणें या क्रियापदाहून भिन्न आहेच परंतु याच अर्थासारखें भासणारें फोडणें या क्रियापदाहूनहि भिन्न आहे . फोडणें पहा . मोडून टाकणें , काढणें - म्हणणें किंवा बोलणें खुंटविणें ; गोंधळविणें ; कुंठित करणें ; निरुत्तर करणें . पराजित करणें ; फजित करणें . त्याचा हा परिपाक आजि दिसतां या पंडिता मोडिलें । - सारुह ६ . ६४ .
|