|
स्त्री. भयंकर उन्हाचा ताप ; कडक ऊन . [ ध्व . ] ०करणें अक्रि . मध्यान्हसमय , ऊन , निखारे , ज्वरविशिष्ट शरीर इ० कांनीं स्पर्शन - दर्शनादि करण्यास अशक्य पडायाजोगी अतिसंतप्तता पावणें ; भयंकर तापणें . जळणें ( सूर्य , तापांतील शरीर , अग्नि , यांनीं ). रणरणणें अक्रि . जळजळणें ; अत्यंत तप्त होणें ( झळीनें ); अतिशय उष्णता वाटणें ; उकडणें . ऊन , निखारे , सूर्य , अग्नी इ० कांनीं अतिशय संतप्त होणें . रणरणीत - वि . अतिशय जळजळीत ; कडक ; प्रखर ( सूर्य , ऊन्ह , अग्नि , दुपार इ० ). रणरणीत उन्हाळा - पु . उन्हाळ्यांतील कडकडीत ऊन्ह , उष्ण झळा ; ( सामा . ) हवेंतील प्रखरता . रणरणीत दुपार - स्त्री . उन्हाळ्यांतील ऐनदुपार ; मध्यान्हसमय .
|