Dictionaries | References

राजा उदार झाला नि हातीं भोपळा दिला

   
Script: Devanagari

राजा उदार झाला नि हातीं भोपळा दिला     

एका गांवांत दोन शेतकरी होते. त्यांच्या राजाचा वाढदिवस जवळ आलासें पाहून त्यांनीं राजाला नजराणा म्हणून आपल्याकडून कांहीं वस्तु देण्याचें ठरविलें. योग्यवेळीं ते दरबारीं गेले. पहिल्या शेतकर्‍यानें आपल्या शेतांत पिकलेले उत्तम भोपळे राजाला नजर केले. तेव्हां राजानें त्याला आपल्या गळयांतील कंठा बक्षिस दिला. दुसरा शेतकरी छाकटा होता. त्यानें विचार केला कीं, भोपळयासारखी कवडीमोल वस्तु नजर केल्यावर राजानें आपल्या गांवकर्‍याला कंठा दिला तेव्हां आपण त्याला किंमती वस्तु नजर करुं म्हणजे आपल्याला मोठें बक्षिस मिळेल. त्याप्रमाणें त्यानें दोन उत्तम गाई राजाला नजराणा म्हणून दिल्या. राजानें त्याचा भाव ओळखला नि त्याला पहिल्या शेतकर्‍यानें दिलेला भोपळा बक्षिसादाखल दिला. सदर गोष्टीवरुन ही म्हण प्रचारांत आली आहे. मोठयाकडून मोठी अपेक्षा करावी, पण त्यानें उदारतेचा आव आणून अल्पसें द्यावें तशांतली गत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP