-
स्त्री. १ कमळाचें झाड . २ कमल ; कमलपुष्प . ' किं रविकिरणीं कमळणी विकासति । दाता देखतां याचक हर्षती । '; ' मुक्तता होऊं पाहे , कमळिणीपासूनि भ्रमरा । ' - होला १६ . ( सं .)
-
n A lotus. A lotus form vessel or stand.
-
न. १ तळ्यांत सरोवरांत उप्तन्न होणारें फुल . याचे कांदे असुन त्यास लांबट देठ येतो व देठास फुल येतें ; पान वटोळे असतें . कमळाच्या तांबडें , पांढरें , गुलाबी , निळें अशा रंगपरत्वें जाती असून तांबड्या कमळास कोकनद किंवा निळ्या कमळास इंदीवर म्हणतात . शिवाय कल्हार , कुमुद , कमलाक्ष , पोयसर , अशा जाती आहेत . पोयसर कमळास चपटें फळ येतें . त्यांत पांच सहा बिया असतात . त्यांस कमलाक्ष किंवा कमळ काकडी म्हणतात . कमलाक्षाच्या काशीकडे लाह्मा करतात . कमळाच्या देंठास भिसे म्हणतात . कमलाच्या सर्व बेलास कमलिनी म्हणतात . शरीरावयवांचें सौंदर्य दाखविण्याकरितां त्या त्या अवयववाचक नामांच्यापुढें कमल शब्द घालून समासांत योजितात . जसें ; मुखकमल , नेत्रकमल , चरणकमल , इ० २ पुजेचें देव ठेवावयाचें कमळाच्या आकाराचें एक पात्र ; देवाचें आसन , बैठक . ३ गर्भ . ' कमळ लागलें फिरुं पोटामध्यें करीं कांति झळझळा । ' - पला १०० . ४ केळफुल ' जैसें केळीचें कमळ । तैसें हऋदयीं अष्टदळ । ' एभा १४ . ४६५ . ( सं .) ०कला - ळी - स्त्री . कम - लाची कांति , सौदर्यं ( ल .) तेज ; सौदर्यं ; शोभा ; कांति . ( चेहर्याची इ० )
-
०वरचा पु. १ कमलाच्या पानावरील पाण्याचा थेंब . २ ( ल .) कमलाच्या पानावर पाण्याचा थेंब पडला असतां त्याच्या गुळगुळीतपणामुळें तो वाटोळा होऊन गडगडत पडुन जातो यावरून आयुष्य , संपत्ति , वैभव , ऐश्वर्य वगैरेची क्षणभंगुरता व अनिश्चितता दाखविण्याची काव्यांतील उपमा . ३ मन , हेतु , वचन यांचें चंचलत्व , असत्यता , बेभरवंसा दाखविण्यासहि योजतात . पाण्यावरचा बुडबुडा पहा .
Site Search
Input language: