|
स.क्रि. क्रि.वि. ओरडणे ; रेंकणे पहा . आडवे होऊनि रेखत गेले । - दावि ४८४ . [ रेंकणे ] ( जमीन , कागद , भिंत इ० वर ) रेषा किंवा रेघोट्या काढणे . ( चित्र , कांही आकृती ) भिंत , कागद इ० वर रेघांच्या योगाने काढणे . घासून गुळगुळीत करणे . ( देव , साधु इ० च्या प्रतिमा मूर्ती ) मनांत ठसवून घेणे ; कल्पिणे . अंग , कपाळ इ० वर ( गंध इ० ) रेघांच्या रुपाने चिन्हित करणे . कोरणे ; नीट करणे ; प्रमाणांत लावणे , काढणे . चतुर्भुज माळा रुळे येकावळी । कस्तुरी निढळी रेखिलीसे । - तुगा ८ . . वस्त्राच्या चुण्या किंवा डोईच्या केसांच्या पट्ट्या चापूनचोपून बसविणे . वर्णन करणे ; बिंबविणे ; ठसा उमटविणे ; चित्रित करणे . ऐकोनि जो स्वहृदयांतचि रेखिला हो । प्रत्यक्ष तोचि नयनी हरि देखिला हो । [ रेखा , रेषा ] रेखला , रेखलिया - वि . नीटनेटका ; प्रमाणबद्ध . कोरीव ; कोरलेला ; रेखलेला ; सुंदर . योग्य ; बरोबर ; तंतोतंत . चित्र काढलेला . म्हणोनि माझी वैखरी । मौनाचेहि मौन करी । हे पाणियावरी मकरी । रेखिली पां । - अमृ १० . १७ .
|