Dictionaries | References

लकड

   
Script: Devanagari

लकड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A term for an extraordinarily high tree of the Palm-tribe. 2 fig. A term for a tall and gaunt person.

लकड     

 स्त्री. ( कों . )
अतिशय उंच वाढलेले माडाच्या जातीचे झाड .
( ल . ) शरीराने कृश , सोटासारखा उंच असलेला मनुष्य . [ लांकूड ] सामाशब्द -
०कोट  पु. मोठमोठी लाकडे जमिनीत उभी पुरुन भिंताडासारखे केलेले आवार ; लाकडाची तटबंदी ; मेढेकोट . [ लाकूड + कोट ; हिं . लकडकूट ]
०खाना  पु. 
इमारतीची किंवा जळाऊ लाकडे ठेवण्याची घरांतील स्वतंत्र जागा ; लांकूडघर .
लाकडांची वखार . [ लाकूड + खाना ; हिं . लकडखानह ]
०दिवी वि.  रोडका ; लुकडा ; उंच व कृश . [ लाकूड + दिवा ]
०वाला  पु. इमारतीची किंवा जळाऊ लांकडे विकणारा . [ हिं . ] लकडा पु .
मोठी काठी .
वाळलेला व लाकडासारखा कडकडीत झालेला पदार्थ ( कपडा , भाकर , वाळलेले काड इ० ). लकडी - स्त्री .
लाकडाप्रमाणे घट्ट होईतोपर्यंत कढविलेला उसाचा रस ; लाकडासारखा कडक झालेला गुळाचा पाक ; गुळाचा एक प्रकार .
लाकूड ; काठी . जोंधळ्याचा एक प्रकार . [ हिं . ] ( वाप्र . ) लकडी वांचून मकडी वठत , वळत नाही . - माकडचेष्टादि सौम्य उपायांनी बंद होत नाही , त्याला मारच पाहिजे . [ लाकूड + माकड ] लकडी कोट - पु . लकडकोट पहा . लकडी पूल - पु . नदी इ० कांवर बांधलेला लाकडांचा पूल . लकडी पेंढी - स्त्री . ( कों . ) होळीकरितां मुलांनी घरोघर फिरुन मागितलेली लांकडे , ओंडके व गवत इ० ( व्यापकार्थी ). लकड्या - वि . उंच आणि लुकडा . [ लकड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP