-
न. समाधान ; मनास वाटणारी स्वस्थता ; आराम ; आनंद , चैन ; अनुकूल अनुभव ; शांतता व विश्रांति ; करमणूक व उपभोग ; शांति . ( समासांत ) आत्म - रति - विषय - इंद्रिय - सुख ( समासांत पूर्वपदीं - विशेषणार्थी ) सुखकर ; सुखसाध्य ; सुखखाद्य इ० [ सं . ] म्ह० सुखंच मे शयनंच मे - चैनींत राहून झोपा ताणणें . ( वाप्र . ) सकलसुखसंपत्तिवसति - सर्व प्रकारच्या सुखाची व समृध्दीची खाण ( खुषमस्करी ) किंवा हितचिंतनाच्या वेळीं उपयोगांत आणावयाचा शब्द ) सुखाचा विचार - पु . समाधानाची कल्पना . सुखाचा भाऊबंद , सुखाचा भागी , सुखाचा वाटेकरी , सुखाचा सोबती - पु . शाळुसोबती ; ताज्या घोडयावरील गोमाशा . केवळ चैनीच्या वेळचा सोबती . सुखाचा शब्द - पु . गोड , सभ्य भाषा ; मनास समाधान वाटेल असें भाषण ; मृदु भाषण . सुखानें सुखें , सुखें = सुखेनैव - क्रिवि . आनंदानें ; तत्परतेनें ; अंतःकरणपूर्वक ; सहजरीतीनें . सुखास पडणें , सुखास येणें , सुखास वाटणें - सोपें , होणें ; बरें वाटणें . सामाशब्द -
-
०कर दायक सुखावह - वि . सुखदेणारें ,
-
०ढाळ पु. फार त्रास न देणारें जुलाबाचें औषध व त्यामुळें होणारा जुलाब . [ सुख + ढाळ ]
-
०दुःखभोक्तृत्व न. सांसारिकास किंवा जीवात्म्यास भोगावे लागणारे सुखदुःखाचे अनुभव .
Site Search
Input language: