|
पुन . इंद्राचे आयुध ; ( सामा . ) अमोघ शस्त्र . हिरा . माणिक मोती प्रवाळ । पाचि वैडूर्य वज्र नीळ । - दा ८ . ६ . ३४ . वीज ; विद्युत . वज्रतुंड पहा . - पु . सत्तावीस योगांपैकी पंधरावा . जाज्वल्य , दहशत बसविणारा माणूस ( योद्धा , शास्त्री ). हा शब्द पहिल्या पदी येऊन पुष्कळ समास होतात कांहीचे अर्थ पुढे दिले आहेत . ०आंगठी स्त्री. त्रिकोनाकृति कोंदणांत हिरा व तीन कोनांवर तीन रत्ने बसविलेली अशी आंगठी . - देहु ४९ . ०कपाट न. वज्राचे , हिर्याचे कवाड , दार . मुक्तिचे वज्रकपाट । कामीनि हे । - भाए ७५६ . ०कवच न. वज्राचे , वज्रासारखे अभेद्य चिलखत . जैसे वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे । - ज्ञा २ . १३२ ; - एभा १५ . ७ . कीट पु . खवल्या मांजर . ०कीटक स्त्री. ( महानु . ) एक रोग - जंतु . कव्हणा एका अंताचीए सवडी वज्रकीटकी लागली असे । - दृष्टांत - पाठ २ . ०कृत वि. घट्ट ; घट्ट बसेल असे केलेले . ०गर्भ स्त्री. एक प्रकारची भिकबाळी . ( बं . ) गिमडा . - देहु ४५ . ०गांठ स्त्री. पक्की , न सुटणारी गांठ . कर्माच्या वज्रगांठी । कळासे तो । - ज्ञा १८ . ३९२ . ०घात पु. वज्राचा प्रहार , तडाखा . ( ल . ) मोठी आपत्ति ; नुकसान ; संकट . ०चुडेदान चुडेदान पहा . - ह ११ . १३७ . ०चूडेमंडित वि. हिर्याच्या कंकणांनी विभूषित , शोभायमान असलेले ( हात ); वज्रचूडेमंडित हस्त । अवतार मुद्रा दाही झळकत । - ह २७ . ८० . पत्रांतून सुवसिनी स्त्रियांस लिहावयाचा मायना . अक्षय टिकणारे चुडे हातांत असणारी ; ( ल . ) अखंड सौभाग्यवती . ०जिव्ह वि. खोंचदार , कडक भाषा वापरणारा . ०जिव्हा स्त्री. खोंचदार , कडक भाषण . ०टीक टीका स्त्री . स्त्रियांचा गळ्यांतील एक दागिना . ०तडक पु. वीज . - खिप्रु . ०तुंड पु. वज्राचा एक जातीचा दगड . स्फटिक , चंद्रकांत आणि अभ्रक या पदार्थांच्या कणांच्या अनियमित मिश्रणाने हा झालेला असतो . ( इं . ) ग्रॅनाईट . ०देह पु. वजाप्रमाणे अभेद्य , बळकट शरीर ; रोगरहित , ताकदवान शरीर . ०देही वि. असे शरीर असलेला ; फार बलाढ्य . ०द्रोह पु. दीर्घकालचा व फार तीव्र असा द्वेष . ०द्रोही वि. हाडवैरी . ०धर पु. इंद्र . ०धार वि. तीक्ष्ण धार असलेले ; तिखट ( शस्त्र ). ०नाद निर्घोष पु . विजेचा कडकडाट . ०पंजर पु. ( वज्राचा पिंजरा ) दुर्भेद्य किल्ला , आश्रयस्थान ; निर्भय आसरा . तरि शरणांगतां वज्रपंजर । तेहिं कां म्हणवावे । - भाए ६१४ . - तुगा ७०६ . ०पथ्य न. फार अवघड , कठिण पथ्य . ०परीक्षा स्त्री. हिर्यांची परीक्षा . ( ल . ) कठिण कसोटी ; फार अवघड तपासणी . पाणि - पु . इंद्र . कृपा भाकिता जाहला वज्रपाणी । ०पात पु. वज्रायुधाचा प्रहार . वीज कोसळणे ; पडणे . ०पापी वि. मोठा पातकी . - एभा २७ . ४९४ . ०प्रयोग पु. फार अवघड प्रयोग , उपाय . मांत्रिक जादूगाराचा विशिष्ट मंत्रप्रयोग . ०प्रहार पु. वज्रपात पहा . ०प्राय वि. वज्रासारखा कठीण ( पदार्थ ). वज्रासारखा अमोघ आघात असणारा ( बाण , मुष्टि इ० ). ०बटू पु. एक झाड . - न . त्याचे फळ . बजरबटू पहा . ०बाण वि. वज्रासारखे घातक बाण असलेला . ०बुद्धि स्त्री. खंबीर मन . उत्कृष्ट ग्रहणशक्ति . विशेषणासारखाहि उपयोग . ०मणि पु. हिरा . ०मय वि. वज्राचा , हिर्याचा केलेला . अतिशय कठिण . ०महाग वि. अतिशय महाग . ०महागाई स्त्री. अतिशयित , भरमसाट महागाई ०महाग्या वि. अतिशय महाग विकणार . ०माला स्त्री. हिर्याची माळ . ०मिठी स्त्री. फार घट्ट मिठी . मग तोंडा कां वज्रमिठी पाडिजे । ज्ञा ७ . १५२ . ०मुष्टि पु. मल्लाचे एक आयुध . हे मुठीला लावतात . - स्त्रीपु . लोखंडासारखी , कठीण मूठ . ( बडोदे ) एक खेळ . - खाला ८० . लुतीचा कांदा . सुरण पहा . - वि . लोखंडासारखी मारक मूठ असलेला . मी वज्रमुष्टि ...! - स्वयंवर . वज्रमुष्टि हत्याराने लढणारा , हत्यार वापरणारा . ०मूठ स्त्री. वज्रमुष्टि पहा . ०मूली मूळ स्त्री . एक झुडूप ; रानउडीद . ०योग पु. वज्रासन ; हटयोग . एक वज्रयोग क्रमे । सर्वाहार संयमे । - ज्ञा ४ . १४७ . ०लेप पु. चुन्यामध्ये कात , गूळ इ० सरंजाम घातल्यामुळे दृढता आलेला चुना . अशा चुन्याचा दगड इ० वर करतात तो लेप . ( ल . ) अक्षयता ; अविनाशता ; चिरंतनपणा ( वचन , निश्चय , संस्था इ० चा ). याअर्थी विशेषणासारखा उपयोग ; पक्के ; कायमचे ; स्थिर ; अभंग . महापापां प्रायश्चित्तविधान । वज्रलेप पूर्ण गुरुवाक्यावज्ञा । - भाराबाला ११ . २७९ . ( महानु . ) दृढता आणणारा पदार्थ . ना तो संश्रृतीसि ताठ । वज्रलेप । - ऋ ११ . ०लेप - पक्के , कायम होणे . आमच्या आजे सासुबाई एकदां कोणाचे नांव घ्यावयाचे नाही असे म्हणाल्या की मग ते वज्रलेप झालेच समजावे ! पकोघे . होणे - पक्के , कायम होणे . आमच्या आजे सासुबाई एकदां कोणाचे नांव घ्यावयाचे नाही असे म्हणाल्या की मग ते वज्रलेप झालेच समजावे ! पकोघे . ०वाट स्त्री. ( महानु . ) वज्राचे वेष्टण . काळ लोहे डवरिले । वज्रवाटी बांधिले । - शिशु [ सं . वज्र + वृत्त ; प्रा . वट्ट ] ०वाणी स्त्री. कठोर , झोंबणारे भाषण . - वि . असे भाषण करणारा . ०वीर्य न. वानराचे वीर्य ( शुक्र ). हे इतके उष्ण असते म्हणतात की त्यामुळे दगडहि उलतात . - वि . अमोघ , पराक्रमी वीर्याचा ( माणूस - ज्याची मुले फार सशक्त आहेत अशाबद्दल . हे विशेषण योजतात ). उत्साही ; पराक्रमी ; निश्चयी ; सहनशील ; ताकदवान इ० . ०शरीर न. वज्रदेह पहा . ०शरीरी वि. वज्रदेही . ०शलाका स्त्री. घरावर वीज पडूं नये म्हणून लावतात ती तार . ०शील ( व . ) वरिष्ठ ; वरचढ . सगळ्या कुनांत तो वर्जशील होऊन बसला . ०संकल्प पु. न फिरणारा निश्चय ; दृढनिश्चय . ०संकल्प पी वि . फार दृढनिश्चयी . ०सांखळ ळी स्त्री . अभेद्य , अखंड्य कोटिक्रम . तार्किकांचिया वज्रसांखळा । - शिशु २५ . ०हस्त वि. वज्राप्रमाणे कठिण हाताचा . ०हस्ते क्रिवि . फार जोराने . तो मुकुंदराये काय केले । वेताचे छडीस पडताळिले । मारिते जाहले वज्रहस्ते । - संवि २० . ११६ . ०हृदय हृदयी - वि . कठोर अंतःकरणाचा ; अति निर्दय . अति निग्रही ; निधड्या छातीचा . ०क्षार पु. एक औषधी क्षार . मीठ , सेंधेलोण , पादेलोण , टाकणखार , बागडखार , जवखार , सज्जीखार , या खारांचे विशिष्ट कृतीचे केलेले औषध . वज्रांगी स्त्री . चिलखत ; कवच . वज्रांगी लेइला तैशी प्रलयमेघांची । - शिशु १००१ . - ज्ञा ६ . ४७५ . [ वज्र + अंग ] वज्राग्नि पु . मूलबंधापासून उत्पन्न होणारी उष्णता ; वज्रासनरुप अग्नि . - ज्ञा १२ . ५० . विद्युल्लताग्नि ; विजेचा अग्नि . वज्राग्नीचिया जाळी । करुनि सप्तधातूंची होळी । - ज्ञा ११ . ३७७ . [ वज्र + अग्नि ] वज्राघात - पु . वीज पडणे . शिरी वज्राघातचि गमला । - संग्रामगीते १२ . ( ल . ) भयंकर संकट , आपत्ति . [ वज्र + आघात ] वज्राधिकार - पु . अनेक पिढ्या एका कुटुंबांत असलेला अधिकार . [ वज्र + अधिकार ] वज्रानल - पु . वीज ; विजेचा लोळ . [ वज्र + अनल ] वज्रांबट - वि . अतिशय आंबट . [ वज्र + आंबट ] वज्राभ्यास - पु . गुणाकाराचा एका प्रकार ; वज्रवध [ वज्र + अभ्यास ] वज्रवध ;. [ वज्र + अभ्यास ] वज्रावळ , वज्राळे - स्त्री . न . एका वेलीच्या बियांची , मण्यांची केलेली माळ . मुलाला दृष्ट लागूं नये म्हणून ही त्याच्या गळ्यांत बांधतात . [ वज्र + आवली ] वज्रासन - न . ( योग . ) एक आसन . मुसलमान नमाज पढावयास बसतात त्याप्रमाणे बसून हात जोडणे . - संयोग ३२० . - एभा ६ . १२७ . मूळबंध , आधारबंध . - ज्ञा ८ . ४९ . स्थिर , दृढ आसन ( जसे घोड्यावर ). ( ल . ) दृढपणे धारण करणे ( अधिकार , सत्ता ). [ वज्र + आसन ] वज्रास्त्र - न . इंद्राचे आयुध ; वज्र ; विद्युतास्त्र . [ वज्र + अस्त्र ] वज्राहत - वि . वज्राचा प्रहार ज्यावर झाला आहे असा . [ वज्र + आहत ] वज्रिका - वि . ( संगीत ) दहाव्या श्रुतीचे नांव . वज्री - स्त्री . पाय घांसण्यास उपयोगी असा कठिण , खरखरीत दगड , वीट , धातूचा पदार्थ इ० - पु . इंद्र . वज्रेश्वरी , वज्राबाई - योगिनी - स्त्री . एक देवता . वज्रोपचार - पु . कडक उपचार , उपाय . [ वज्र + उपचार ]
|