Dictionaries | References

वासलत

   
Script: Devanagari
See also:  वासलात , वासलाद

वासलत     

 स्त्री. 
वसूल ; जमा ; उत्पन्न व त्याचा हिशोब , जमाखर्च . तहापासोन वासलातीचा ऐवजही माघार देविला . - रा ७ .
हिशोब लिहितांना काढावयाची एक रेघ ( या रेषेच्या आरंभी मोडी वा हे अक्षर असते . ) या रेघेप्रमाणे एकोणात , दकारी , वीत ही दुसर्‍या रेघांची नांवे आहेत . रेघ पहा .
हकीकत ; गोष्ट ; खटला ; कज्जा ; काम .
निकाल ; शेवट ; फैसला . वादविवादांचे जे पर्वत माजले आहेत त्यांची वासलाद कशी लावावयाची . आगर ३ . ५६ .
व्यवस्था ; तजवीज . त्यांना आपल्या हिश्श्याची वाटेल ती वासलात लावतां येईल . घका ५७ .
परिणाम ; अखेर . त्या निकालाची जी वासलात होईल तीच .. कार्याकार्य निर्णयाची होईल . - गीर १२४ .
०लावणे   
निकाल लावणे ; फन्ना करणे . [ अर . वासिलात ]
लांबलचक हकीकत सांगत येणे ; कंटाळवाणी कथा लावणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP