-
न. १ भात , गहूं , बाजरी , इ० मनुष्याच्या शरीरपोषणाच्या उपयोगाचा पदार्थ ; दाणागोटा . तांदूळ , गहू , ज्वारी इ० तृणधान्ये हरभरा , तूर , उडीद इ० द्विदल धान्ये व करडई , तीळ , जवस इ० तैलधान्ये असे धान्याचे तीन मुख्य वर्ग आहेत . २ नवरात्रांत देवीपुढे किंवा चैत्रांत गौरीपुढे थोड्याशा मातीत गहूं किंवा भात यांची जी लहान रोपे करतात ती समुच्चयाने . ३ दसर्याच्या दिवशी पागोट्यांत , टोपींत , खोवण्यांत येणारा गहूं , भात इ० कांच्या रोपांचा तुरा . ४ धणे . [ सं . धान्य ; गु ; धान्य ] ( वाप्र . )
-
स्त्री. न . कोंकणी खलाटींतील सर्व प्रकारचें पीक . लंवग - वेलदोडे - जायफळ - केशर इ० सुवासिक पीक प्रत्येकीं . सुरईभात , तांदुळ - न . पु . अव . ( कों . ) उकडे नसलेले तांदुळ .
-
०झटकणे धान्य साफ करणे , वारवणे .
-
०हुडकणे सक्रि . शोधणे ; निवडणे ; धुंडणे . पद्धति - एक लांब लोखंडी गज जमीनीत मारुन व त्याचा वास घेऊन अमुक ठिकाणी धान्य पुरले आहे असे नेमके सांगणे . लष्करांतील कित्येक लोकांचा धान्य हुडकून काढण्याचा धंदाच होता . - ख १०५५ . अठरा धान्यांचे कडबोळे न . अठरा पहा . सामाशब्द -
Site Search
Input language: