|
पु. १ मावेल इतकी जागा ; पुरेशी जागा ( राहाण्यास , ठेवण्यास ). २ ( ल . ) क्षमाशीलता ; क्षमा . ३ सांठा ; संचय . ४ आश्रय ; दबा . आम्ही मलंगडचे रानांत साठ म्हणजे दबा घेऊं व तेथून कार्यसिध्दि करूं . - वसईची मोहीम . [ सं . सं + स्था ; प्रा . संठा ] सांठण - न . सांठविण्याचें पात्र . सांठणें - अक्रि . १ सांचणें ; जमणें ; गोळा होणें . २ मावणें ; राहणें . सांठवण - नस्त्री . १ सांचविण्याचें पात्र , जागा ; हौद ; बरणी इ० . व्योम सांठवे संपूर्ण । ऐसी सांठवण कोठून आणू । २ संचय ; संग्रह . सांठवणी - न . १ ( तळें , हौद , टांकें इ० त ) सांठवलेलें पाणी . २ ( खांच , खळगा , डबकें इ० त ) सांचलेलें पाणी . सांठवणी , सांठवणूक - स्त्री . सांठविणें ; संचय ; संग्रह . सांठवणें , सांठविणें - उक्रि . १ भरून ठेवणें ; सांठवण करणें . २ सांचविणें ; जमविणें . [ सं . संस्थापन ; प्रा . संठावण ] सांठवासांठव - स्त्री . १ सांठविणें ; संचय , संग्रह करणें ( अनेक वस्तूं ). २ घाईनें , कसें तरी सांठविण्याचा व्यापार . सांठा - पु . संग्रह ; संचय ; ढीग ; रास . सांठी - स्त्री . १ गोणी . २ सांठा . साठोपा - पु . संग्रह ; संचय . ओला चारा खड्डयांत दाबून त्याचा साठोपा करावा . - केसरी १८ . ९ . ३६ . सांठयाचा - वि . ठेवणीचा ( सुंदर पदार्थ , वस्त्रपात्र ). वि. ६० ही संख्या ; षष्टि . [ सं . षष्टि ; प्रा . सट्टि ] पु. चौकट ; साट पहा . साठणी - स्त्री . साटीवर टेकण्यासाठी बसविलेले लांकूड . हरिपंतांनी गाडीच्या सांठणीवर हात ठेवून गाडी मागून चालत असतां ... - खरादे १०३ साठबंद - पु . साठी आवळून बसावी म्हणून जे दोन सुरसे धोडक्यांतून आरपार घालून दोरीनें बांधतात ते प्रत्येक . साठा , साठया - पु . सांगाडा ; चौकट ( गाडी , जनावर चित्र इ० ची ). गजाश्वरथ पडिले खळाळा । रथ काष्ठा साठा वाहाती । - जै १८ . ११८ . साठी - स्त्री . साठ - ठा पहा . गाडीचा कोठा . न. १ आंबा , फणस इ० ची पोळी . २ ( विशेषतः ) फणसपोळी . [ सांठा ] ०संवत्सर पुअव . प्रभव , विभव इ० साठ संवत्सरांची नांवें ( हिंदु वर्षे होणें ) म्हातारचळ लागणें ; फार वय झाल्यानें बुद्धिभ्रंश होणें . साठियुं - पु . ( गुजरात ) निळवा ; लवकर तयार होणारी जोंधळ्याची जात . - कृषि २६६ . साठी - स्त्री . १ साठाचा समुदाय ; संच . २ साठ संख्या . नाराच साठि आधी प्रभुतें मग तीन जिष्णुतें ओपी । - मोकर्ण ११ . १९ . ३ साठ वर्षाचे वय . ४ या वयांत होणारी अवस्था ; म्हातारचळ . ५ तांदूळ , नाचणी यांची एक जात ; साठेरा - री . म्ह० साठी आणि बुध्दि नाठी . ०उलटणें म्हातारपण येणें . ०बुध्दि स्त्री. म्हातारचळ ; बुध्दिभ्रंश . साठें - न . ( कु . ) साठ दिवसांनीं पिकणारें भात . साठेरा , साठेरी - वि . १ साठ दिवसांत तयार होणार्या भाताची एक जात . २ नाचणीची एक जात .
|