|
साठ अधिकरणें (गीतेची) १ ऐतिह्य कथन, २ दैन्य प्रदर्शन, ३ श्रीकृष्णास शरण, ४ आत्मप्रबोधन, ५ स्वधर्मपालन, ६ बुद्धियोग, ७ स्थितप्रज्ञता, ८ कर्मयोग, ९ नित्यकर्म, १० लोकसंग्रह, ११ शासनपालन, १२ शत्रुसंहार, १३ जन्मकर्म, १४ कर्म - अकर्म, १५ प्राज्ञमुखें ज्ञान, १६ सांख्ययोग, १७ सदामुक्तता, १८ योगारुढ होणें, १९ समाधि अभ्यास, २० शाश्वत योग, २१ एकसूत्रता, २२ शरणता, २३ मोह त्यागून ज्ञानविज्ञान साधन, २४ संतत स्मरण, २५ भूत लय - उत्पत्ति, २६ बोधक्षयोदय, २७ ईश्वरी सत्त, २८ हरिभावना, २९ निष्काम भक्ति, ३० ईशस्मरण, ३१ विभूतिसंक्षेप, ३२ विभूतिविस्तार, ३३ ईश्वरी रूप, ३४ ईश्वरी रूपावलोकन, ३५ क्षमापनस्तोत्र, ३६ रूपविसर्जन, ३७ भक्ततुलना, ३८ सुलमसाधन, ३९ ईश्वरगुणगान, ४० क्षेत्राक्षेत्रशोधन, ४१ प्रकृतित्याग, ४२ निर्लिप्त आत्मता, ४३ त्रिगुण संसार, ४४ गुणमुक्तता, ४५ वृक्ष (अश्वत्थ) छेन्न, ४६ जीवात्मादर्शन, ४७ जीवनव्याघ्र, ४८ पुरुषोत्तम, ४९ दोन संपदा, ५० असुरवर्णन, ५१ शास्त्रीय संयमानें नरकद्वार टाळणें, ५२ श्रद्धाविभाग, ५३ स्वाभाविक गुण, ५४ आहार यज्ञाचारण, ५५ ॐ तत्सदर्पण, ५६ त्यागमीमांसा, ५७ कर्मनिर्णय, ५८ त्रिधावृत्ति, ५९ पूर्णसाधना व ६० अर्जुनबोध, हीं साठ गीतेचीं अधिकरणें अथवा विषय होत. (गीताई अधिकरण माला) साठ आत्मिक गुण (आदर्श पुरुषाचे) मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्राचे अंगीं अशी साठ आत्मगुणसंपन्नता होती. असें रामायणांत वर्णिलें आहे. ([वा. रा. बाल. सर्ग. १ पाहा.]) साठ पेंच मल्लांचे १ हातमुरड, २ बैठक, ३ डंकी, ४ झडप, ५ खोचाअ, ६ कसोटा, ७ चक्री कसोटा, ८ दुम, ९ दस्ती, १० नागपेंच, ११ मुठ्ठा, १२ दंतमुरड, १३ आवळा, १४ नागमुरड, १५ झटका, १६ लुकान, १७ थाप, १८ धोबीपछाड, १९ हुलकस, २० कुंद्याचीं टांग, २१ मानेची टांग, २२ बैठक, २३ भोळी < २४ चाट, २५ तावबगली, २६ तबकफाड, २७ पाठपेंच, २८ उडाव. २९ बैठक आंतली, ३० गोदी, ३१ गम, ३२ कलावा, ३३ कटिबंध, ३४ चितेपछाड, ४० कलाजंग, ४१ मानदाब, ४२ दाब, ४३ दंडवोट, ४४ गळखोडा, ४५ कातरी, ४६ उमाकसोटा, ४७ स्वारी, ४८ कैची, ४९ कुंदा, ५० कंबर खोडा, ५१ घाणा, ५२ हातचढाव, ५३ गळखोडा, ५४ हरणफांस, ५५ बाळसोंगडा, ५६ गोजीलोट, ५७ लाटज, ५८ मोरपेच, ५९ दसरंग आणि ६० ? (जय - मुक्तिमाला) ([दु. श. को.]) साठ संवत्सरें १ प्रभव, २ विभव, ३ शुक्ल, ४ प्रमोद, ५ प्रजापति, ६ अंगिरा, ७ श्रीमुख, ८ भाव, ९ युवा, १० धाता, ११ ईश्वर, १२ बहुधान्य, १३ प्रमाथि, १४ विक्रम, १५ वृष, १६ चित्रभानु, १७ सुमानु, १८ तारण, १९ पार्थिव, २० व्यय, २१ सर्वजित् २२ सर्वधारी, २३ विरोधी, २४ विकृति, २५ स्वर, २६ नंदन, २७ विजय, २८ जय, २९ मन्मथ, ३० दुर्मुख, ३१ हेमलंबी, ३२ विलंबी, ३३ विकारी, ३४ शार्वरी, ३५ प्लव, ३६ शुभकृत्, ३७ शोभन, ३८ क्रोधी, ३९ विश्वावसु, ४० परामव, ४१ प्लवंग, ४२ कीलक, ४३ सौम्य, ४४ साधारण, ४५ विरोधकृत, ४६ परिधावी, ४७ प्रमादी, ४८ आनंद, ४९ राक्षस, ५० नल, ५१ पिंगल, ५२ कालयुक्त, ५३ सिद्धार्थी, ५४ रौद्र, ५५ दुर्मति, ५६ दुंदुमि, ५७ रुधिरोद्नारी, ५८ रक्ताक्षी, ५९ क्रोधन व ६० क्षय. ([ज्योतिष])
|