-
पु. १ नेट , चिकाटीचा उद्योग ; निष्ठापूर्वक कार्य . ( क्रि० करणें , धरणें ) नित्य नवा हव्यास धरावा । साक्षेप अत्यंतच करावा । - दा ४ . २ . ५ . २ आस्था ; अगस्त ; अतिशय आवड ; व्यासंग ; तुला पुस्तकांचा साक्षेप आहे . तुझ्या भावाला पैक्याचा सा० आहे . ३ मनाचा तीव्र कल ; बळकट निष्ठा ; मनाचा निश्चय , निर्धार . हा साक्षेपानें संध्याकाळचे वेळेस निजतो . कोणाला चोरी करण्याचा साक्षेप तर कोणाला शिंदळकीचा साक्षेप फळ सारखेच . ४ आग्रह ; अगस्त्य . कथेसी साक्षेपे पाचारिले जरी । म्हणे माझ्या घरी कोणी नाही । - तुगा २४ . ५४ . ५ दीर्घोद्योग ; मोठी खटपट . - एभा ९ . ३७५ . - दा ५ . ९ . ५४ . साक्षेपेविण केवळ । वृथा पुष्ट । - दा १ . १० . २० . [ सं . स + आक्षेप ] साक्षेपी - वि . १ काम , अभ्यास , शोध यांत सारखा गढलेला ; तन्मय . २ आग्रही , निर्धाराचा स्वभाव असणारा . ४ दीर्घोद्योगी ; प्रयत्नवादी . साक्षेप , साक्षेपानें , साक्षेपें - क्रि . वि . १ मुद्दाम ; जाणुन बुजुन . - ज्ञा १८ . १६५३ . की कल्पतरू शोधित आला घर । दारिद्र्याचें साक्षेपें । - रावि . २ यत्नानें ; कष्टानें . - ज्ञा १७ . २४९ . श्रीकृष्णमूर्तीच्या साक्षेपें भार उतरेल धरेचा । - मुसभा १७ . ३० . साक्षोप - पी - साक्षेप - पी पहा .
-
ना. चोखंदळपणा , नीटनेटकेपणा ;
-
ना. दीर्घोद्योग , प्रयत्न ;
-
ना. निर्धार ;
Site Search
Input language: