|
अ.क्रि. १ ठेवणें ; लावणें ; रचणें ; गुरुच बसविणेम . २ स्थापन करणें ; उभारणें ; व्यवस्था लावणें ३ सिद्ध करणें . ४ एकाग्र करणें . ( मन , चित्त वगैरे ) ५ रचणे ; पाया घालणें [ सं . स्था . राहणे ] स्थापक - वि . १ ठेवणारा ; स्थापन करणारा ; बांधणारा ; दगड , खूण वगैरे घालणारा . १ स्थापना , उभारणी , करणारा , पाया इ० घालणारा , रचणारा . २ नियमन करणारा ; आज्ञापक ; ठरविणारा ; निश्चित करणारा ३ सिद्ध , खरें शाबित करणारा . स्थापन - ना - न . स्त्री स्थापर्णे पहा . १ रचाई , उभारणी ; संस्थापन ; व्यवस्थित योजना . २ निश्चय ; शाबिती . ३ नियमन ; आज्ञापन ; निश्चिति . ४ प्राणप्रतिष्ठा ( देवतेची ); उपास्य दैवतावर चित्ताची एकाग्रता ; मनाची स्थिरता ; द्दढता ५ गर्भारपणांतील एक विधि ; पुंसवन संस्कार , स्थापनीय स्थाप्य - वि . स्थापणें , उभारणं इ० स योग्य , अवश्य , शक्य . स्थापविर्णे - सक्रि . स्थापणें याचे प्रयोजकरुप स्थापित - वि . स्थापन इ० केलेला . स्थापत्य शास्त्र - न . इमारती , पूल , सडका वगैरे बांधण्याचे शास्त्र गृहशिल्पशास्त्र .
|