|
स्त्री. हार , हारजीत पहा . वि. १ हिरावून नेणारा ; उचलून नेणारा ; पळविणारा . ( समासांत ) धन - कीर्ति - सुख - कफ - वात - ज्वर - हर इ० २ ( गणित ) भाजक . ३ ( गणित ) अपूर्णीकाचा छेद . [ सं . ह्र = हरण करणें ] पु. ( गो .) अभगर . म्ह० हर उवता म्होण गायंडोळ उवता = अजगर उडतो म्हणून गांडूळ उडतो . वि. ( व ) कठीण ; टणक . वि. प्रत्येकी ; दरएक . उदा० हरघडी - वखत - रस्ता - गांव - जागा इ० . [ फा .] ०उपाय पु. दरएक इलाज , युक्ति , साधन , सर्व , नाना इलाज , युक्तया ( विशेषत : अव , प्रयोग ). ०क पु. चोर लुटारु .- वि . हरण करणारा ; हर अर्थ १ पहा . ०हालणें अक्रि . नरम होणें ; थोडेफार शिजणें ( अन्न ). ०एक बि . १ प्रत्येक ; जो जो कोणी तो तो . इरएक मनुष्यासमागर्मे पत्र पाठवून संतोषवीत असावें . २ कसलाहि ; कोणाचाहि . जुने लोक यांस हरएक उपद्रव न केला . - मराचिस २८ . ०एकरंगी वि. निव्वळ एकाच रंगाचा ( घोडा ). हें अशुभ लक्षण आहे , अशुभ चिन्हें पहा . ०कशी वि. कशीबशी ; हर - एक हरकशी निभावणूक करुन तंजावरपर्यंत आले . - पेशवे० महाराष्ट्र २४४ . ०कसबी वि. १ हरएक कौशल्याचें काम करणारा ; अष्टपैलू कारागीर . २ हरकामी . ०काम न. प्रत्येक किंवा कोणतेंहि काम , धंदा ; वेळीं उपस्थित होईल तें काम . ०कामी काम्या --- वि १ जरुर पडेल तें तें काम करण्यास तयार असलेला ; अशा बोलीनें ठेवलेला ( माणूस ). २ कोणतेंहि किंवा दरेक प्रकारचें काम करण्यास समर्थ असलेला ; कोणतेंहि काम करण्यास ज्याचे हात वळताच असा . ३ अनेक प्रकारें उपयुक्त होणारी ( वस्तु ). ०कोण्ही कोणी --- वि . १ भलतासलता कोणी . २ प्रत्येक जण ; दरएक . ०घडी पु. सर्व तर्हेचा माल , जिन्नस ; किरकोळ व्यापारी वस्तू . ०जिन्नस पु. सर्व तर्हेचा माल , जिन्नस ; किरकोळ व्यापारी वस्तू . ०जिनशी सी --- वि . हरएक . अनेक जातीचा - प्रकारचा ; सर्व प्रकारचा . त्याचे दुकानीं लहान मोठे गोड आंबट असे हरजिती आंबे आहेत . ०तर्हाची रीत योजना युक्ति , साधन इ० ( विशेषत : अव . प्रयोग ); नाना तर्हा - प्रकार . [ फा .] प्रत्येक रीत योजना युक्ति , साधन इ० ( विशेषत : अव . प्रयोग ); नाना तर्हा - प्रकार . [ फा .] ०दम क्रिवि . हरघडी . ०दमख्याली पु. १ दरेकक्षणीं नवीन कल्पना , लहर , ख्याल . २ ( अव .) अनेक युक्तया , यत्न , बेत , योजना , साहसें , श्रम . हरदख्याल करुन त्यानें लग्न केलें . ३ शोधकता ; कल्पकता ; हिकमत . ज्याचे अंगी हरदमख्याल नाहीं असला एकमार्गी काय उपयोगी ? ०दमख्याली वि. १ फार उलाढाल्या करणारा ; चळवळ्या ; उद्योगी ; युक्तिबाज . २ ( ल .) लहरी .. ( शिंदे ) जात्या हरदमख्याली ... कसें करितील याचा विश्वास नाहीं - ख ७ . ३२ . ३ लबाड . त्यांत तो ( हैदर ) हरदमख्याली आहे . - ख १०९६ . ०प्रयत्न प्रेत्न --- पु . प्रत्येक प्रकारची खटपट , श्रम , योजना . २ ( अव .) सर्व प्रकारच्या खटपटी इ० . बाबी बाब --- वि . दरेक बाबीसंबंधींचें ( बाब = जमाबंदीचा प्रकार० . जसे - हरबाबी बंद - कागद - हिशेब - वसुलबाकी इ० . ०भास वि. फार हुशार ; अष्टपैलु ; सर्व गोष्टीत निपुण ; बहुगणी . ०भांस वि. १ वरील शब्द पहा . २ सर्व प्रकारचा ; जातीचा , तर्हेचा , नानविध . ०मळ माळ --- स्त्री . १ माणसें , गुरें इ० ची चालणारी रांग , ओळ , जाणार्यायेणार्याची माळका . ( क्रि० लावणें ; लागणें ; चालणें ; टळणें ; मोडणें ). २ नेमलेली , ठरविलेली वेळ . ( क्रि०संभाळणें ; साधणें ; टळणें ; चुकणें ). ३ परिचय ; घसट ; वावर . ०युक्ती स्त्री. दरेक उपाय , योजना , बेत , मसल्त ; ( अव .) सर्व उपाय इ० . येक वि . हरएक पहा . ०वख्त क्रिवि . हरघडी . ०वळ स्त्री हरमाळ अर्थ १ पहा . ०साव न. चोर . शत्रू इ० धाडीवर , सर्व प्रकारची शस्त्रास्त्रें घेऊन उठलेला गांवकर्यांचा , शेतकर्यांचा समूह , थवा . ( क्रि० उठणें , मिळणें ). ०हमेश शा --- क्रिवि . नेहमी . ०हुन न्न ) र --- न प्रत्येक कौशल्य , युक्ति , कसब ; ( अव .) सर्व कलाकौशल्य . ( न्न ) र --- न प्रत्येक कौशल्य , युक्ति , कसब ; ( अव .) सर्व कलाकौशल्य . ०हुन न्न ) री --- वि . हरकसबी ; हरहुन्नर जाणणारा . ( न्न ) री --- वि . हरकसबी ; हरहुन्नर जाणणारा .
|