|
बहुवचनाचा फारशी प्रत्यय ( हा बहुधां निर्जीव वस्तु दर्शविणार्या नामांना लागतो . पण मराठींत प्रादेशिक नामांनाच लागतो . उदा० देहेहाय , जिल्हेहाय , महालहाय . [ फा . हा ] उद्गा . १ सुखानुभवाचा उद्गार ( दुःखाचा प्रतिकार होऊं लागला म्हणजे तोंडांतून निघणारा . २ शरीर , मन यास दुस्सह वेदना झाली असतां निघणारा सुस्कारा , दुःखोद्गार ; हां , चूं , कुं कटकटा इ० . - स्त्री . ( बालभाषा ) तिखट , विस्तव , दिवा , तीक्ष्ण शस्त्र , क्षत इ० . [ घ्व . ] स्त्री. हयात ; आयुष्य . [ अर . हइ ] हायत , हायात - हयात इ० पहा . ०खाणें घेणें - १ जिवास लावून घेणें ; धास्ती घेणें ; घाबरून जाणें . २ ( तापाची , खाण्याची ) भीति वाटणें , धडकी घेणें . ०पतकरणें मोकलणें - पश्चात्ताप करणें ; चुकीबद्दल दुःखोद्गार काढणें . ०सोडणें देणें घालणें - उसासा टाकणें . ०घालणें ध्यास घेणें ; धोसरा काढणें . हायास येणें , हायास आणणें - जीव मट्टयास येणें ; थकणें ; भागणें ; अशक्त करणें , दुर्दशेप्रत आणणें . ०दोस्त दोस दुल्ला धुल्ला हायदोस - उद्गा . [ मुसलमान लोक ताबुताचे पुढें हसन व हुसेन हे त्यांच्या लग्नानंतर लवकरच लढाईत मरण पावले , म्हणून हाय ! मित्रा ! नवरदेव ! असा दुःखोद्गार काढून नाचतात त्यावरून ] नाचणें , ओरडणें ; दंगल ; धुमाकूळ . ( क्रि० घालणें ; माजणें ; उठणें ; मांडणें ; करणें ) [ हिं . हाय ! दोस्त ! दुल्हा = नवरा ] ०सा वि. क्रिवि . हाय ! असा ; समाधानाचा , आनंदाचा उद्गार उच्चारावयाच्या स्थितींत असलेला ; दुःखकारक स्थितींतून सुटका झाल्यामुळें सुखी झालेला . ( क्रि० होणें ). त्या दाटीमध्यें माझा जीव अगदीं कासावीस झाला होता , मी अंमळ बाहेर येतांच हायसा झालों . हायसें वाटणें - आनंद , स्वस्थता वाटणें ( दुःखप्रतिकारानंतर ). हाय , हूय - दुःखोद्गार . - स्त्री . करुणोद्गार ; वेदनांमुळें विवळणी . हाया , हायाहूया - हाय पहा .
|