दोन (अठराहि पुराणांतर्गत सारवचनें) १ परोपकार हें पुण्य ब २ परपीडा हें पाप.
अष्ठादशपुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् ।
परोपकार : पुण्याय पापाय परपीडनम् ॥ (
[सु.])
दोन अयनें १ दक्षिणायन आणि २ उत्तरायण. दक्षिणायनांत सूर्याची गति दक्षिणेकडे असते. आरंभ कर्कसंक्रातीपासून होतो. उत्तरायणांत सूर्याची गति उत्तरेस असते. आरंभ मकरसंक्रांतीपासून होतो.
'अग्रिज्योंतिरह : शुक्ल : षण्मासा उत्तरायणम् ।' (
[भ, गी. ८-२४])
'धुमो रात्रिस्तथा कृष्ण : षण्मासा : दक्षिणायनम् ।' (
[भ, गी. ८-२५])
दोन अंगें (घर्माची) (अ) १ तत्त्वज्ञान आणि २ आचार.
(आ) (सार्वकालिक) १ अभ्युदय आणि २ निश्रेयस.
दोन अंगें मुक्तीचीं २ त्रिविध दु:खनिवृत्ति व २ परमानंद प्राप्ति. (
[हरिपाठ रहस्य])
दोन अधिष्ठानें (रोगाचीं) १ शरीर आणि २ मन.
दोन अधिष्ठानें (लक्ष्मीचीं) १ चंद्र आणि २ कमल. (संस्कृतीचीं प्रतीकें)
दोन अवस्था (अ) १ सुख आणि २ दु:ख ;
(आ) १ पृर्वावस्था (वाल्य आणि तारूण्य) आणि २ उत्तरावस्था (प्रौढता आणि वार्धक्य).
दोन अवस्था (जीवाच्या) १ साधनावस्था आणि २ सिद्धावस्था. (परमार्थ मार्ग)
दोन अवस्था ; जीवनाच्या १ जीवन आणि २ मृत्यु.
दोन अवस्था विश्वाच्या १ वज्र आणि २ मदन. (कुमार संभव)
दोन अश्विनीकुमार अश्चिनी नांवाच्या अप्सरेचे दोन जुळे मुलगे. हे देवांचे वैद्य होते.
दोन अक्षरी मंत्र "राम","शिव"हे प्रत्येकी दोन अक्षरांचे मंत्र काशीक्षेत्रांत तारक होतात.
दोन आदर्श भक्तश्रेष्ठ १ हनुमान् आणि २ अर्जुन. यांनीं राष्ट्रकार्यार्थ आपलें जीवित अर्पण केलें.
दोन आदिकारणभूत तत्त्वें सृष्टीचीं १ शिव आणि २ शक्ति किंवा १ पुरुष आणि २ प्रकृति.
दोन आद्य शाहीर भारतांतले १ कुश आणि २ लव. हे श्रीरामाचे पुत्र व वाल्मिकीचे शिष्यवर.
हे रामायण गीत ऋषिसमुदाय, यज्ञमंडप, अथवा राजमार्ग यांवर बहुजनमनोद्दीपनार्थ कोठेंहि गाऊन दाखवीत असत. (
[आर्या - रामायण]) (
[वा. रा. ७-९३-५])
दोन ईश्वरी देणग्या (मानवाला) १ स्मृति, आणि २ विस्मृति. (
[समग्र सावरकर वाडमय.])
दोन उपाय चित्त नाशाचे १ योग आणि २ ज्ञान
"द्वौ क्रमौ चित्तनाशस्य योगो ज्ञानं च राघव।". (
[योगवासिष्ठ])
दोन उपासना १ सगुणोपासना आणि २ निर्गुणोपासना.
दोन कारणास्तव परान्नभोजन विहित आहे १ परस्पर प्रेम असलें तर व २ उपासमार होत असेल तर. (
[म. भा. उद्योग ९१-२५])
दोन कारणें कार्योत्पत्तीस आवश्यक (अध्यात्म) १ निमित्त कारण आणि २ उपादान कारण.
द्विकारणात्मकं सर्वकार्ये।(वेदान्तसार)
दोन गुण संस्कारांचे १ गुणांची निर्मिति व २ दोषांचे निराकरण. (तंत्रवार्तिक)
दोन गुप्त गंगा १ गयेची फलगु व २ प्रयागची सरस्वती या दोन गुप्त गंगा होत.
दोन गोष्टी आजन्म संपादणेच्या १ विद्या आणि २ धन.
"अजरामरवत् प्राज्ञ : विद्यामर्थे च साधयेत्। (
[म. भा.])
दोन गोष्टींत भीड धरूं नये १ आहार, (भोजन) आणि २ व्यवहार.
"आहारे व्यवहारे च त्यक्तलज : सुखीभवेत ।"(
[सु.])
दोन गोष्टींनी मानवाचा नाश होतो १ चिता आणि २ चिंता.
दोन गोष्टी रोधतां येत नाहीं ईप्सितार्थ मिळविण्याचा द्दढनिश्चय करणारें मन आणि २ उताराकडे वाहणारा जलप्रवाह. (कुमार संभव)
दोन गोष्टींत संयम आवश्यक १ जिव्हेंद्रिय आणि २ जननेंद्रिय. (
[गुरुचरित्र कलिप्रभाव])
दोन चाकें संसाररथाचीं १ स्त्री आणि २ पुरुष.
दोन गोष्टी स्वर्गसुखापेक्षां अधिक होत १ जननी आणि २ जन्मभूमि.
नेयं स्वर्णपुरी लङ्रका रोचते मम लक्ष्मण।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥ (
[सु.])
दोन गोष्टी स्थिर (चिरंतन राहणार्या) १ धर्म आणि २ कीर्ति.
अस्थिरं जीवितं लोके अस्थिरे धनयौवने।
अस्थिरा : पुत्रदाराश्च धर्मकीर्तिद्वयं स्थिरम् ॥ (
[सु.])
दोन गोष्टी परत जोडतां येत नाहींत १ फुटलें मोतीं आणि २ तुटलें मन.
'सोनें अथवा हस्तचरण। मोडिल्या सांधिती विचक्षण। फुटलें मोतीम तुटलें मन। सांधूं न शके विधाता।' (
[मुक्तेश्वर म. भा. अ. १८])
दोन गोष्टींत जन्माची सफलता १ अनायासानें मरण व २ विना दैन्यानें जीवन.
"अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम् ।"(
[सु.])
दोन गोष्टींमुळें तीन आपत्ति ओढवतात १ अपूज्यांची पूजा आणि २ पूज्यांची अवहेलना या दोन गोष्टी जेथें होतात तेथें १ दुर्भिक्ष, २ मरण आणि ३ भय या तीन आपत्ति ओढवतात.
अपूज्या यत्र पूज्यन्ते पूज्यानां तु विमानना।
त्रीणि तत्र प्रवर्तन्ते दुर्मिक्षं मरणं भयम् ॥ (
[सु.])
दोन गोष्टी क्षणभंगुर १ तारुण्य आणि २ धन.
दोन ग्रहणें १ चंद्रग्रहण आणि २ सूर्यग्रहण.
दोन चिकित्सा १ मानसचिकित्सा आणि २ औषधी चिकित्सा.
दोन चैतन्यें १ जीव चैतन्य आणि २ ब्रह्मचैतन्य.
दोन तत्त्वें अनादि १ प्रकृति आणि २ पुरुष."प्रकृतिं पुरुषं चैव विद्धयनादी उभावपि।"(
[भ. गी. १३-१९])
दोन दोष (चित्ताचे) १ रजोगुण व २ तमोगुण हे चित्ताचे दोन दोष. 'रजस्तमश्च मनसो द्वौ दोषौ समुदीरितौ।' (
[वाग्मट])
दोन द्रव्याचे अतिक्रम अथवा दुरुपयोग १ कुपात्रीं दान करणें व २ सत्पात्रीं दान न करणें ;
हे दोन संपादन केलेल्या द्वव्याचे अतिक्रम होत.
लब्धानामपि वित्तनां बोद्धव्यौ द्वावतिक्रमौ।
अपात्रे प्रतिपत्तिश्च पात्रे चाप्रतिपादनम् ॥ (
[म. भा. शांति २७-३१])
दोन देवर्षि १ नारद व २ पर्वत.
दोन द्वारपाल (श्रीविष्णूचे) १ जय आणि २ विजय.
दोन धर्म (अ) १ विश्वधर्म व २ व्यवहारधर्म ;
(आ) १ सामान्य धर्म आणि २ विशेष धर्म.
दोन धर्म मनाचे १ वासना आणि २ विचार. (
[नासदीय सूक्त भाष्य उत्तरार्ध])
दोन धर्मधुरंधर १ भीष्म आणि २ श्रीकृष्ण.
दोन धनें १ दैवधन (उपासना आणि कर्म) आणि २ मनुष्यधन (भूमि, पशु आणि सुवर्ण).
दोन धरुव १ उत्तर ध्रुव, २ दक्षिण ध्रुव.
दोन नर १ अर्जुन आणि २ अश्व.
दोन नृत्यें १ ताण्डव (शिव - नृत्य) आणि २ लास्य (पार्वती - नृत्य) असे दोन प्रकार.
दोन पक्ष १ शुक्ल पक्ष आणि २ कृष्ण पक्ष. पक्ष म्हणजे पंधरवडा.
अमावास्येपासून पौर्णिमेपर्येत शुक्ल पक्ष व पौर्णिमेपासून अमावास्येपर्येतचा कृष्ण पक्ष.
दोन परम - सूक्ष्म तत्त्वें १ चेतन आणि २ अचेतन (
[बृहस्पति तत्त्व श्लोक ६])
दोन पापपुण्याचे साक्षीदार १ माणसाचा आत्मा व २ परमेश्वर.
पुराणकालीन पाकशास्त्र प्रवीण १ राजा नळ - गोड पदार्थ (स्वादिष्ट उंची पदार्थोची पाकनिष्पत्ति) आणि २ भीम - तामस (तिखट मिठाचे पदार्थ) यावरून त्या त्या पाकप्रकारांना अनुक्रमें नळपाक आणि भीमपाक अशा संज्ञा मिळाल्या आहेत, (
[म. शब्दकोश])
दोन पुरुष १ क्षर (विनाशी) आणि २ अक्षर (अविनाशी) या विश्रांत असे हे दोनच पुरुष आहेत. (
[भ. गी. १५, १६])
दोन पुरुषोत्तम १ मर्यादा पुरुषोत्तम - श्री रामचंद्र व २ पुराण पुरषोत्तम - श्रीकृष्ण.
दोन पुराणकालीन वार्ताहर १ नारद व २ संजय.
दोन पुराणकालीन प्रतिज्ञा १ कचप्रतिज्ञा आणि २ भीष्मप्रतिज्ञा.
दोन प्रकारचे अलंकार १ शब्दालंकार आणि २ अर्थालंकार.
दोन प्रकारचे आचार १ शास्त्रीय आचार आणि २ लौकिक आचार.
'आचारो द्विविध : प्रोक्त : शास्त्रीयो लौकिकस्तथा' (
[देवी भाग. स्कंध ९ अ १-१६])
दोन प्रकार अवलोकनाचे १ सिंहावलोकन - मागचें अनुसंधान ठेवून पुढें पाहणें व २ विहंगमावलोकन - सूक्ष्म निरीक्षण.
दोन प्रकार (कर्माचे) १ सकाम आणि २ निष्काम् .
दोन प्रकार (सद्गुरुंचे) १ ध्यायी - शास्त्र आणि अनुभूति यांनीं युक्त आणि २ तत्त्वबित् - हा जन्मत : सिद्ध योगी असतो.
' द्वैविघ्यं सद्गुरुणां च घ्यायितत्त्वविदाविति.' (
[योगसंहिता])
दोन प्रकार (काव्याचे) १ नारिकेलरस - काव्य - कठीन व २ द्राक्षा - रस काव्य - सगम.
दोन प्रकारचा काल महा कठीण मध्यान्ह काल २ अंतकाल.
दोन प्रकारची कुंडली १ शापित आणि २ अनुगृहीत (
[ज्योतिष])
दोन प्रकार गणिताचे १ व्यक्त - अंकगणित व २ अव्यक्त - बीजगणित.
दोन प्रकार गुरूंचे (अ) १ कारण गुरु आणि २ कार्यगुरु (नित्या - नंद चरित्र)
(आ) दीक्षागुरु आणि २ शिक्षागुरु.
दोन प्रकार चोरांचे १ उघड चोर व २ गुप्त म्हणजे वरून साव दिसणारा.
' प्रकाशाश्चाप्रकाशाश्च द्विविधास्तस्करा : स्मृता :' (स्मृतिचंद्रिका)
दोन प्रकार ग्रंथपरीक्षणाचे १ अंतरंग परीक्षण आणि २ बहिरंग परीक्षण.
दोन प्रकारचे जन्म १ दिव्या आणि २ पार्थिव (
[भ. गी. ४-९])
दोन प्रकार ज्योतिषाचे १ फ्लज्योतिष व २ गणित ज्योतिष.
दोन प्रकारचे छंद १ वैदिक आणि २ लौकिक (तत्त्व - निज - विवेक)
दोन प्रकारांनी र्धम साध्य आहे १ द्वव्यरूपानें - यज्ञ वगैरेमुळें व २ देहानें - तीर्थयात्रा वगैरेमुळें.
'धर्मश्व द्विविध : प्रोक्तो द्र्व्यदेहद्वयेन च'। शिव. पु. अ १३)
दोन प्रकार (धर्माचे) १ प्रवृत्तिपर आणि २ निवृत्तिपर. (
[म. भा. शांति २४०-६])
दोन प्रकार (घ्यानाचे) १ सगुनध्यान व निर्गुणध्यान.
दोन प्रकार (नमस्काराचे) (अ) १ भावनमस्कार व २ द्वव्यनमस्कार ;
(आ) १ व्यवहारनमस्कार व निश्रयनमस्कार (रत्न कंरडक)
दोन प्रकार प्रपंचाचे १ विद्याप्रपंच आणि २ अविद्या प्रपंच.
"प्रपंचो द्विविध :"(वेदांत शास्त्र)
दोन प्रकार प्रयत्नाचे १ शास्त्रीय व २ अशास्त्रीय
"उच्छृंखलं शास्त्रियं चेति द्विविधं पौरुषं स्मृतम् "(यो. वा. २-५-४)
दोन प्रकारची बुद्धि १ संशयात्मिका आणि २ निश्चयात्मिका.
दोन प्रकारचे ब्रह्यचारी १ उपकुर्वाणक (जो फिरून गृहस्थाश्रम स्वीकारतो असा) आणि २ नैष्ठिक ब्रह्मचारी (आजन्मपर्येतचा) (दक्ष १-२)
दोन प्रकार भक्ताचे १ सकाम भक्त आणि निष्काम भक्त.
दोन प्रकार भक्ताचे (अ) १ ज्ञानपूर्व भक्ति व २ ज्ञानोत्तर भक्ति (
[वामन पंडित])
(आ) १ गौणी भक्ति - ज्ञानपूर्व भक्ति अ २ पराभक्ति - ज्ञानोत्तर भक्ति. (
[ज्ञानेश्वरी गूढार्थदीपिका खंद ३])
दोन प्रकार भ्रमाचे १ संवादीभ्रम - चांदी वाटून चांदी सांपडली तर आणि २ विसंवादीभ्रम - चांदी वाटून कथील सांपडलें तर (सावित्रीचरित्र)
दोन प्रकार मनाचे (अध्यात्म) १ शुद्ध - वासनांची भेसळ नसलेले आणि २ अशुद्ध - ज्यांत काम व संकल्प असतात असें
"मनो हि द्विबिधं प्रोक्तं शुद्ध चाशुद्धमेव च। अशुद्धं कामसंकल्पं शुद्धं कामविवर्जितम् ॥"(
[अमृत बिंदु उपनिषद्])
दोन प्रकार मौनाचे १ आकारमौन (उच्चार न करतां खुणेनें व्यक्त करणें) आणि २ काष्ठमौन. (उच्चारहि नाहीं व खुणोनेंहि नाहीं असे.) (
[अमृतानुभव - टीका])
दोन प्रकार मंत्रांचे १ स्वयंभूमन्त्र आणि २ वरदमन्त्र - (वैदिक - सं. पुनर्घटना)
दोन प्रकारचे योगी १ गुप्तयोगी व २ व्यक्तयोगी (श्रीरामकृष्ण वाक्सुधा)
दोन प्रकारचें विज्ञान १ आलय विज्ञान - अहं असेम जें ज्ञान होतें त्यास म्हणतात अ प्रवृत्ति विज्ञान - इंद्रियांनीं होणारें (
[बौद्धदर्शन])
दोन प्रकारचा विनय १ स्वाभाविक आणि २ कृत्रिम,
"द्विविधो विनय : स्वाभाविक : कृत्रिमश्च"(
[कौटिल्य])
दोन प्रकारचे शौच १ बाह्म शौच आणि २ आभ्यंतर शौच. हें दोन प्रकारचें शौच अथवा पावित्र्य.
"शौचं तु द्विविधं प्रोंक्तं बाह्ममाभ्यन्तरं तथा"(
[शिवतत्त्वरत्नाकर ६-९]), (द्क्षस्मृति)
दोन प्रकार श्रद्धेचे १ प्रयोजिका व २ निश्चयात्मिका,
दोन प्रकार ज्ञानाचे (अ) १ अनुभव व २ स्मृति - पुन : प्रत्यय. (न्यायदर्शन)
(आ) १ लौकिकज्ञान आणि व २ परमात्मज्ञान (सुफीसंप्रदाय)
(इ) १ शब्दज्ञान आणि २ अनुभवसिद्ध ज्ञान (
[देवी. भा.])
(ई) यथार्थ ज्ञान आणि २ अयथार्थज्ञान (रर्क.)
दोन प्रज्ञा १ स्थितप्रज्ञा व २ अस्थितप्रज्ञा.
दोन प्रवृत्ति १ सत्प्रवृत्ति आणि २ असत्प्रवृत्ति. जगांत या दोन्ही सनातन आहेत.
दोन प्राणी भयंकर सदाची १ हंसणारा पुरुष आणि २ रडणारी स्त्री.
दोन प्रकारचे योग (अ) १ साध्ययोग आणि २ साधनयोग
(आ) संप्रज्ञातयोग आणि २ असंप्रज्ञातयोग. (
[योगशास्त्र])
दोन प्रकारचीं रूपें परमात्म्याचीं १ विश्वात्मक आणि २ विश्वो - त्तीर्ण - निर्विकार स्थिति (श्रिशैवागम आणि ज्ञानेश्वर)
दोन प्रकार वेताळाचे १ रुद्रवेताळ आणि २ अग्निवेताळ -(आग्या - वेताळ) - एक ग्राम दैवत. (गाजलेलीं दैवतें)
दोन प्रकार वैराग्याचे १ ज्ञानवैराग्य आणि २ निर्वेदवैराग्य. अनुभवामृत - अमृतवाहिनिटीका
दोन प्रकारच्या व्याधी १ दोषजन्यव्याधि आणि २ कर्मजन्य व्याधि - पूर्वकर्मानें प्राप्त झालेल्या.
दोन प्रकारची शरीरें १ पार्थिव शरीर आणि २ मानस शरीर (
[रघु २-५७])
दोन प्रकारचे संत १ कुटुंबसंत आणि २ समाजसंत (संतसाहित्य)
दोन प्रकारची संतति प्रजापतीची १ देव आणि २ असुर. देव हे लहान आणि असुर हे ज्येष्ठ
'दूया ह प्राजापत्या देवाश्चासुराश्च।' बृहदारण्यक १-३-१)
दोन प्रकारचा संन्यास १ विविदिषा संन्यास व २ विद्धत् संन्यास.
दोन प्रकार समाधीचे १ संप्रज्ञात अथवा सविकल्प समाधि आणि २ असंप्रज्ञात अथवा निर्विकल्प समाधि.
दोन प्रकार सिद्धींचे.... १ कल्पिता ब २ अकल्पिता. (
[योग शिखोप - निषत])
दोन प्रकार शास्त्रचें १ भौतिक आणि २ अभौतिक - मानसशास्त्र, अर्थशास्त्र इ.
दोन प्रकार संकेतांचे १ श्रद्धाप्रधान (शास्त्राधारावरून ठरविलेले) आणि २ कल्पनाप्रधान. (कविप्रतिभाजनित).
दोन प्रकार संस्काराचे (अ) १ श्रौत आणि २ स्मार्त
(आ) ब्राह्म गर्भादान इ. व २ दैवी - पाकयज्ञ इ.
"द्विविधो हि संस्कारो ब्राह्मो दैवश्च"(
[हारीत])
दोन प्रकारची सृष्टि १ दैवी आणि २ आसुरी.
"द्वौ भूतसगौं लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च"(
[भ, गी. १६-६])
दोन प्रकार दास्याचे (अ) १ कृपादास्य आणि २ मायादास्य. (
[गूढार्थ - चंद्रिका])
(आ) १ दैवीदास्य व २ विदूषकीदास्य (
[नारदीय सूक्त भाष्य])
दोन प्रकारचे ज्ञान (अ) १ जन्मसिद्ध आणि २ अनुभवसिद्ध ;
(आ) १ शाव्दिक ज्ञान आणि २ अनुभवजन्य ज्ञान.
ज्ञांनं तु द्विविधं प्रोक्तं शाब्दिकं प्रथमं स्मृतम् ।
अनुभवाख्यं द्वितीयं तु ज्ञानं तद्दुर्लमं नृप ॥ (
[देवी भाग, षष्ठ स्कंध १५-५२])
दोन प्रकारच्या माणसांना सुखाचा लाभ होतो १ आगामी संकटाची आगाऊ तरतूद करणारा आणि
२ प्रसंगीं ज्याला युक्ति सुचते तो.
अनागतविधाता च प्रत्युपन्नमतिश्च य :।
द्वावेव सुखमेघेते दीर्घसूत्री विनश्यति ॥ (
[म. भा. शांति १३७-१])
दोन प्रकारचे पुरुष जगांत विरळा १ ज्यानें जें मागितलें त्यास तेंच देऊन टाकणारा आणि
२ आपण स्वत : कोणापासून कांहींहि न मागणारा (
[कल्याण - उपनिषत् अंक]).
दोन प्रकारचें वैर १ स्वाभाविक आणि २ कृत्रिम. साप आणि मुंगूस, पाणी व अग्नि, देव आणि दानव, कुत्रा व मांजर, सिंह आणि हत्ती, सज्जन व दुर्जन हीं स्वाभाविक वैराचीं उदाहरणें (
[पंचतंत्र])
दोन प्रतिज्ञा (अर्जुनाच्या) १ दैन्य न भाकणें ब २ युद्धांत पाठ न दाखविणें. 'अर्जुनस्य प्रतिज्ञे द्वै न दिन्यं न पलायनम्' (
[सु.])
दोन प्रयत्न (व्याकरणशास्त्र) १ आभ्यंतर प्रयत्न आणि २ बाह्म प्रयत्न.
आभ्यंतर प्रयत्न - वर्णोच्चाराचे वेळी उच्चारस्थानाचे आंतील प्रयत्न (हा पांच प्रकारचा आहे) आणि
बाह्म प्रयत्न - वर्णोच्चाराचे वेळीं जिव्हा तालु इत्यादि इंद्रियांच्या साह्यानें होणार (हा अकरा प्रकारचा आहे)
'तुल्यास्यप्रयत्नं सवर्णम्' (
[सि. कौ. १-१-९])
दोन प्रलय १ नित्यप्रलय आणि २ महाप्रलय
दोन ब्रह्में (अ) शब्दव्रह्म आणि २ परब्रह.
(आ) १ शब्दब्रह्म आणि २ अशब्दब्रह. घ्यान करण्याला योग्य अशीं दोन ब्रह्में
"द्वे ब्रह्माणी वेदितव्ये"(
[मैत्रायणीयापनिषद्])
दोन भक्तिसाधनें १ नामस्मरण आणि २ कीर्तन.
दोन भाग्यवान माता (अर्वाचीन कालीन) १ आंध्रराजा शातकर्णी याची मातोश्री गौतमीदेवी (१५ वे शतक) व २ छत्रपती शिवाजी महाराजांची मातोश्री जिजाबाई (१७ वे शतक) (पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज)
दोन भाव मनाचे १ संकल्प आणि २ विकल्प. (मणिकांचन)
दोन महामूर्ख १ जुनें तेवढें चांगलें व नवीन सर्व त्याज्य म्हणून जुनें कवटाळणारा आणि २ जुनें सर्व वाईट व नवीन तेवढें चांगलें म्हणणारा (वर्नार्ड शाँ)
दोन मति १ सुमति व २ कुमति.
दोन मनें (अ) १ अंतर्मन व २ बहिर्मन. 'चित्तंहि द्विविधम्' (
[योगशास्त्र])
(आ) १ जागृतींतील मन आणि २ मुषुप्तींतील मन
"द्विविघं हि मन :"
दोन मार्गदर्शक ऋषि (मानष शरिरांतले) १ बोध - ज्ञान आणि २ प्रतिबोध - विज्ञान
"बोधप्रतिबोधौ ऋषी"(
[अथर्ववेद कांड ५])
दोन मंत्री व गुप्तचर रावणाचे १ शुक्त आणि २ सारण. (
[वा. रा. युद्ध - सर्ग २५-१४])
दोन मार्ग १ अर्चिरादि मार्ग - प्रकाशाचा व २ धूमादिमार्ग - अंधाराचा मार्ग (वेदांत)
दोन मार्ग (जगांत आयु : क्रमणाचे) १ सांख्य (संन्यास मार्ग) आणि २ योग (कर्ममार्ग) (
[गी. र. ६२५])
दोन मार्ग धर्मसाधनेचे १ प्रवृत्तिमार्ग आणि २ निवृत्तिमार्ग.
'प्रवृत्तिश्च निवृत्तिश्च द्विविधं धर्मसाधनम्' (
[मोक्ष गीता ३-४])
दोन मार्ग साधकाला मुक्ति देणारे १ विहंगममार्ग आणि २ पिपीलिका मार्ग.
यांचे प्रवर्तक अनुक्तमें शुक व वामदेव होत.
शुकश्चा वामदेवश्च द्वे सृती देवनिर्मिते।
शुको विहड्गम : प्रोक्तो वामदेव : पिपीलिका ॥ (
[बराहोपनिषद् अ ४])
दोन मीमांसा १ पूर्व मीमांसा (कर्मकांड) आणि २ उत्तर - मीमांसा - वेदांतशास्त्र (
[ज्ञानकांड]).
दोन मूलभूत तत्त्वें भारतीय तत्त्वज्ञानाचीं १ मी - विचार करणारा व २ तूं - विचार्य वस्तु. (
[ब्रह्मसूत्र भाष्य प्रस्तावना])
दोन मंगलदायक शब्द १ ॐ आणि २ अथ.
हे दोन्ही शब्द ब्रह्मदेवाच्या कंठांतून प्रथम बाहेर आले म्हणून मंगलदायक गणले आहेत.
ॐ कारश्चाथशब्दश्च द्वावेतौ ब्रह्मण : पुरा।
कंठं भित्त्वा विनिर्यातौ तस्मान्मांगलिकाबुभौ ॥ (स्मृति)
दोन राष्ट्रीय गीतें (भारतीय) - १ वंदेमातरम् - - बंकिमचंद्र आणि २ जन गण मन (टागोर)
दोन लक्षणें दोघांची (मित्र - शत्रू) १ उपकार - मित्रलक्षण व २ अपकार हें शत्रूचे लक्षण.
"उपकारफलं मित्रमपकारोऽरिलक्षणम् "(
[वा. रा. किष्किंधा ८-२१])
दोन राष्ट्रीय महाकवि १ व्यास आणि २ वाल्मीकि.
दोन रूपें ब्रह्माचीं १ साकार आणि २ निराकार
"द्वे बाब ब्रह्मणो रूपे मूर्ते चैवामूर्ते च"(वेदांतशास्त्र)
दोन लक्षणें (पदार्थाचीं) १ तटस्थ लक्षण - पोषाख वगैरे म्हणजे बदलणारें आणि २ स्वरूप लक्षण - विद्या शील वगैरे - टिकणारें (वेदान्त)
दोनवाद (अनादि) (अ) १ भोगवाद आणि २ त्यागवाद (पुरुषार्थ - बोधिनी भ. गी.)
(आ) १ प्रतिबिंबवाद व २ अवच्छेद वाद (विचार चंद्रोदय)
(इ) १ सृष्टि - द्दष्टिवाद - सृष्टीवर ज्ञान अवलंबून आहे आणि २ द्दष्टि - सृष्टिबाद - द्दष्टीवरच सुष्टि अवलंबून आहे.
दोन विचारधारांचे प्रतीक असे दोन भारतीय खेळ १ सोंगटया - दैववाद आणि २ बुद्धिवळें - प्रयत्नवाद (याकूबी संस्कृति कोश)
वादाचीं दोन प्रबल कारणें १ कनक आणि ६ कांता. हीं कोणताहि विग्रह उत्पन्न होण्याचीं दोन मूल कारणें. 'कामिनी कनकं कार्ये कारणं विग्रहस्य वै' (
[देवी भाग. चतुर्थ स्कंध १०-६])
दोन विद्या (अ) १ पराविद्या - आत्मविद्या - ब्रह्मविद्या आणि २ अपराविद्या - ऋग्वेद. यजुर्वेद. सामवेद, अथर्ववेद आणि १ शिक्षा २ कल्प, ३ व्याकरण ४ निरुक्त, ५ छंद, व ६ ज्योतिष ही सहा वेदांगें.
"द्वे विद्ये वेदितव्ये"(मुण्डक १-१. ४)
(आ) १ शस्त्रविद्या व २ शास्त्रविद्या,"विद्या शस्त्रस्य - शास्त्रस्य द्वे विद्ये प्रतिपत्तये"(
[हितो.])
(इ) १ बला आणि २ अतिबला. सर्व प्रकारच्या ज्ञानांचें उगमस्थान. अशा या देवनिर्मित दोन विद्या - बला आणि अतिबला विश्वामित्रानें श्रीरामास दिल्या. (
[वा. रा, बाल. सर्ग २२-१७])
दोन वैरी यथार्थ ज्ञानाचे १ निंदा व २ स्तुति.
दोन वंश १ जन्मवंश आणि २ विद्यावंश.
दोन शब्दांत दोन संस्कृति १ श्रुतिस्मृतिपुराणोक्त - पौरस्त्य आणि २ अद्ययावत् - - पाश्चात्य (
[सावरकर])
दोन विशेष (लाभ) संस्कारांचे १ गुणांची निर्मिति व २ दोषोंचें निराकरण (तंत्रवार्तिक)
दोन शक्ति मायेच्या १ आवरण - अधिष्ठानास झांकणारी आणि २ विक्षेप - विपरीत भासविणारी (
[हरिवरदा १८-४])
दोन शरीरें (रूपें) रुद्रदेवतेचीं १ घोर शरीर आणि २ शिवशरीर (रुद्रार्थदीपिका)
दोन शाश्वत नेत्र (मानवाचे) १ श्रुति - मंत्रात्मकवेद आणि २ स्मृति - वेदानुकूल - साहित्य.
"श्रुतिस्मृती उमे नेत्रे ' (
[सु])
दोन संपत्ति १ दैवी संपत्ति आणि २ आसुरी संपत्ति.
दोन साधनें दैवाला अनुकूल करून घेण्याचीं १ प्रयत्न आणि २ प्रार्थना (विचार पोथी)
दोन साधनें ज्ञानाचीं १ शास्त्राभ्यास व २ गुरुपदेश.
दोन खरे परदेशी १ जीवन आणि २ झाडाचें पान (राजस्थानीं लोककथा)
दोनच खरे यात्रेकरू १ सूर्य आणि २ चंद्र (भोज - लोककथा)
दोन्च खरे राजे १ इंद्र आणि २ यम (भोज - लोककथा)
दोघेजण अंगीकारलेलें काम पूर्णतेस नेण्यास बद्धपरिकर होत १ राजा (राज्यशासनकर्ते) आणि २ बहुश्रुत ब्राह्मण.
'द्वौ लोके घृतब्रतौ राजा च ब्राह्मणश्च बहुश्रुत :' (
[गौतम धर्मसूत्रें ८-१])
दोघेजण दुर्मिळ १ अप्रिय पण हितकर असें सांगणारा व २ तें ऐकून घेणारा.
'अप्रियस्य च पथ्यस्य श्रोता वक्ता दुर्लभ :' (
[वा. रा. अरण्य ३७-२])
दोघेजण जलसमाधि देण्यास योग्य (अ) १ धनिक असून दान न देणारा आणि २ दरिद्रि असून तपस्या (कष्ट) न करणारा.
द्वावम्भसि निवेष्टव्यौ गले बध्वा द्दढां शिलाम् ।
धनवन्तमदातारं दरिद्रं चातपस्विनम् ॥
(
[म. भा. उद्योग ३३-६०])
दोघेजण जगमित्र १ निंदक - पाप हरण करणारा व २ अतिथि - सद्रति मिळवून देणारा.
अतिथिश्चापवादी च द्वावेतौ विश्वबन्वव :।
अपवादी हरेत्पापमतिथि : स्वर्गसंक्रम : ॥ (
[मार्कडेय पु.])
दोघेजण पराजित होत (अ) १ कर्ज घेणारा आणि २ मुलीचा बापा. (भोज - लोककथा)
(आ) १ लोभी गुरु आणि २ लालची चेला (
[कबीर])
दोघेजण विपरीत कर्मामुळें फजित होतात १ गृहस्थाश्रमी असून कर्तव्यपराड्मुख आणि २ भिक्षुक असून खटपटी.
अनारम्मो गृहस्थश्च कायवांश्रैव मिक्षुक :।
उमौ तौ न विराजेते विपरीतेन वर्त्मना ॥
(
[रामगीता ९-७])
दोघेजण सूर्यमंडलाचा भेद करून जाणारे १ समाधींत देह - त्याग करणारा योगी आणि २ घारातीर्थी मरण आलेला. (
[म. भा. उद्योग ३३-६१])
द्विजिव्ह १ सर्प आणि २ चहाडखोर.
द्वितत्त्ववाद दोन परस्पर विरोघी तत्वांपासून जगांतील सर्व गोष्टींचा खुलासा करतां येतो असें प्रतिपादणारें मत.
द्विविधनिष्ठा १ सांख्ययोग आणि २ कर्मयोग. या दोन निष्ठा म्हणजे अनुष्ठानतत्परतेचे मार्ग. (म. गी. ३-३)
द्विविध विश्व १ जड - २ चेतन. १ पुरुष - २ प्रकृति, १ साकार - २ निराकार, १ स्थूल - २ सूक्ष्म, १ अचेतन - २ सचेतन. असें हें एकंदर विश्व द्विविध आहे.
द्वैत (पंचमेदवाद) १ ब्रह्म व जीव २ जीव व जगत् ३ ब्रह्म व जगत् ४ जगांतील पदार्थ व ५ जीवाजीवांत मेद मानणारें मत.
द्वंद्व जोडी - युग्म. दोन परस्पर विरुद्ध गोष्टी साहचर्यानें राहतात. अशीं अनेक द्वंदें या जगांत आहेत.
उदा. - जड - चेतन, पुरुष - प्रकृति, देव - दैत्य, प्रपंच - पर्मार्थ, प्रकाश - अंधकार, राग - लोम. सुख - दु:ख शीत - उष्ण. धर्म - अधर्म. पुण्य - पाप. ज्ञान - अज्ञान, उत्पत्ति - लय, लाभ्म - हानि, जय - पराजय, निंदा - स्तुति, मान - अपमान, शत्रु - मित्र, सज्जन - दुर्जन, सत् - असत्, आशा - निराशा, शाप - आशीवीद, प्रवृत्ति - निवृत्ति, त्याग - भोग. हिंसा - अहिंसा, दिवस - रात्र, प्रेम - द्वेष, हर्ष - शोक, नीति - अनीति, शुभ - अशुभ, सम - विषम, सगुण - निर्गुण, विधि - निषेध, नित्य - अनित्य, व्यष्टि - समष्टि, द्वैत - अद्वैत, विवेक - वैराग्य, जन्म - मरण, बंध - मोक्ष, आवड - नावड, उत्कांति - अपकांति, शिव - अशिब, मंगल - अमंगल, शरीर - आत्मा, जुनें - नवें, सनातनी - क्रांतिकारी, मृत्यु - जीवन, सापेक्ष - निरपेक्ष, स्त्री - पुरुष इ.
दोन गोष्टी अखंड चालणार्या (अ) १ जनन आणि २ मरण"पुनरपि जननं पुनरपि मरणं"(शंकराचार्य स्तोत्र).
(आ) १ काळ आणि २ सावकाराचे व्याज. (बिरबल)
दोन प्रकार वृक्षांचे १ ज्ञानानें - ज्ञानवृद्ध आणि २ नुसतें वयानें - वयोवृद्ध.
दोन प्रकार वृक्षांचे १ फूल न येतां फळ देणारे व २ फुलें व फळें देणारे.
अपुष्पा फलवन्तो ये ते वनस्पतयः स्मृताः।
पुष्पिणः फलिनश्वैव वृक्षास्तूभयतः स्मृताः ॥ (
[मनु. १-४७])
दोन प्रकारचें शौच १ शुद्ध शौच व २ लौकिक शौच.
"शुद्धशौचं इतिज्ञेयं मृज्जलाम्यां तु लौकिकम्"(मैत्रेयि. उ. २।८)
दोन प्रकार शिक्षकांचे १ विद्वान् पण शिकविण्याची कला नसलेला व २ शिकविण्याची कला चांगली जाणणारा. या दोन्ही गुणांनी युक्त असा शिक्षक श्रेष्ठ होय.
श्लिष्टा क्रिया कस्यचिदात्मसंस्था संक्रातिरन्यस्य विशेषयुक्ता।
यस्योमयं साधु स शिक्षकाणां धुरि प्रतिष्ठापयितव्य एव ॥ (मालविकाग्निमित्र १।१६)
दोन प्रकार संकेतांचे १ पारिभाषिक व २ ईशनिर्मित. (
[न्यायकोश])
दोन प्रमुख हेतु विज्ञानाम्यासाचे १ जिज्ञासा व २ व्यावहारिक लाभाची अपेक्षा. (विज्ञान इतिहास)
द्विविध कर्म (अ) १ संचित व प्रारब्ध.
(आ) १ दैव व पित्र्य ;
(इ) प्रवृत्त व निवृत्त ;
(ई) १ शुभ व २ अशुभ. (सं. को.)
दोघां चे पावित्र्य स्वयंसिद्ध १ गंगाजल व २ अग्नि.
"तीर्थीदकं च वन्हिश्च नान्यतः शुद्धिमर्हतः"(भवभूति)
दोन मोठीं पातकें १ दुष्ट मंत्री असलेला राजा (शासनाधिकारी) २ अशा अधिकार्याच्या आश्रयाला राहणे.
पातकानां समस्तानां द्वे परे तात पातके।
एकं दुःसचिवो राजा द्वितीयं च तदाश्रयः ॥ (भोजप्रबन्ध)