-
स्त्री. त्वरा ; जलदी ; घाई . ( प्र . ) घाई पहा . [ घाई ] सामाशब्द -
-
पु. १ जखम . डोळां हरळ न विरे । घायीं कोत न जिरे । - ज्ञा १३ . ५३८ . - एरुस्व १२ . २२ २ शस्त्राचा वार , घाव , आघात . दु : खशोकांच्या घाई । मारिलियाची सेचि नाहीं । - ज्ञा ७ . १०७ . - र ५८ . [ सं . घात = प्रहार ; प्रा . घाय ; का . हिं . गु . घाय ] ( वाप्र . ) घायावर घाय घालणें - पहिल्या जखमे वरच दुसरा घाव घालणें ; जखमेवर मीठ टाकणें ; दु : खावर डागण्या देणें ; मेलेल्यास मारणें घायास येणें - अक्रि . संकटाच्या , नुकसानीच्या , दु : खाच्या परिस्थितींत पडणें , सांपडणें . सामाशब्द -
-
०कूत स्त्रीन , १ मोठी धांदल ; उतावेळपणा ; लावलेली निकड , तगादा , नेट , आग्रह . ( क्रि० लावणें ; देणें ; करणें ; मांडणें ). ३ ताप येण्यापूर्वी होणारी तगमग , काहिली , अस्वस्थता . ( क्रि० येणें ). ४ खानविण्याची अनिवार प्रवृत्ति , अतिशय कंडू ; खाजेची इसळी . ( क्रि० येणें ). [ घाय = घाई + कुथणें किंवा आकृत ]
-
०कटर कटार खेंटर - वि . ( राजा . ) कोडगा ; निगरगट्ट ; लातबुक्या ; लातखाऊ ; निसूक ; कितीहि मारलें किंवा रागावून बोललें तरी न सुधारणारा . [ घाय + कट्टर ? ]
Site Search
Input language: