-
f The throat, esp. the upper part of larynx.
-
स्त्री. १ घाटलेले हरभरे , डाळ . २ ( मिठाई , मिष्टान्न इ० करितां ) शिजविलेलें पीठ . ३ हरभर्यावर पडणारा तांबरा , गोरवा , एक रोग . ( यानें हरभर्याचा घाटा भरत नाहीं ). ( क्रि० पडणें ). ४ अटघाट ; आटघाट पहा . ( घाटणें ).
-
पु. १ देश एकमेकांपासून भिन्न करणारी पर्वताची रांग ; दोन देशांच्या सरहद्दीवरील पर्वतांची रांग . २ ( विशेष अर्थानें ) सह्याद्रीची रांग . ३ डोंगर ओलांडून जावयाचा रस्ता ; डोंगरावरील वाट ; खिंडीतील रस्ता . उ० खंडाळयाचा घाट ; कात्रजचा घाट ; डोंगरावरील अडचणीची व बिकट वाट . उ० रड तोंडीचा घाट . तेहवेळीं कुचपर्वताचां घाटीं । ओळघतां डोळे जाले आयेतुटीं । - शिशु ५६० . लष्कर चाल पेणोपेणीं घाटा हाडत उतरले । - ऐपो ८१ . ४ नदी , तलाव इ० कांच्या कांठावर नावेतून उतरण्या करितां , नावेंत बसण्याकरितां बांधलेला धक्का ; नदीकांठीं बांधलेला दगडी बांधणी ( विशेषत : पायर्यांची ). नदीवरील पायर्या . य० ब्राह्मणघाट ; धोबीघाट ज्या नांव तीर्थ वरि घाटहिरम्य आहे । - नरहरि गंगारत्नमाला १५९ ( नवनीत पृ . ४३३ ). ६ धरण ; बंधारा ; धक्का . आणि सुटलिया सिंधु जलाचा लोटु । न शके धरुं सैंधवाचा घाटु । - ज्ञा ९ . १२४ . ७ सह्याद्रीच्या रांगेच्या पूर्वेकडील देश , प्रदेश ; सह्याद्रीचें पठार ( ज्यास कोंकणसापेक्ष देश हें नांव आहे ). आम्ही घांटावरचीं माणसें आहोंत . - कोरकि ४८३ . सालमजकुरीं घाट चांगला पिकला . [ सं . घट्ट = घाट ; तुल० का . गट्ट , घट्ट , घाट ; हिं . सिं . घाटी = डोंगरांतील रस्ता ; बं . घट्ट , घाइट ] ( वाप्र . ) घाटांत अडवणें , घाटांत धरणें , घाटांत मारणें - ( चोर , लुटारू , डोंगरांतील घाटांत किंवा अडचणीच्या मार्गीत वाटसरूंना गांठून त्यांना लुबाडतात त्यावरून ल . ) एखाद्याच्या अडचणीचा फायदा घेणें ; एखाद्याला अडचणीच्या वेळीं अडवून धरणें .
-
. This is often done to a vocalist to destroy his voice.
Site Search
Input language: