-
पु. १ शरीरांतील त्रिदोषांपैकी एक . कफामुळें तोंड गुळमट चिकट होणें , तोंडाला पाणी खुटणें , झोंप फार येणें , घशांत घुरघुरणें , तिखट पदार्थ खाण्याची इच्छा होणें , उष्ण उपचारांची इच्छा होणें , अग्निमांद्य , मलमुत्रांचें आधिक्य वगैरे लक्षणें होतात . २ खाकलें असतां घशांतून बाहेर येणारा पातळ बुळबुळीत पदार्थ ; श्लेष्मा ; खाकरा ; बेडका . ३ फेंस ; फेन . ( सं . कफ . तुल०फा . कफ् = फेस , थुंका )
-
पु. सुरमाडाचा कापूस ; भूस ; रुई वगैरेच्या फळांतील म्हातारी , इ० कप पहा . ' लोह कफ गारा अग्निचिया काजें । येर्हवीं तें ओझें कोण वाहे । ' - तुगा २१७४ . ( सं . कार्पास )
-
पु. ( कों .) कप्पीचें घर , सांचा ( कप्पीसह किंवा कप्पीशिवाय )
-
०घ्न नाशक निःसारक भेदक सारक हर हारक कफारी - वि . कफ नाहींसा करणारें ( औषध वगैरे ).
Site Search
Input language: