-
पु. ( कु .) फरक ; अंतर ; कोस पहा . ' दोन काठ्यांच्या मापांत थोडासा कोश राहिला .'
-
पु. १ खजिना ; सांठा ; संग्रह ; तिजोरी ; खाण ; वखार . २ देहामधील अन्न - प्राण - मन - विज्ञान - आनंदमय असे जे कोश आहेत त्यापैकीं प्रत्येक ; आत्म्यांचें आवरण . ३ शब्द विषय , संज्ञा इ० चें संग्रहयुक्त ; विवेचन करणारा ग्रंथ ; निघटु ; ( इं .) डिक्शनरी , शब्दसंग्रह ; उदा० शब्दकोश , ज्ञानकोश , चरित्रकोश , इ० ४ आवरण ; पटल ; पापुद्रा ; अस्तर . ५ म्यान ( तरवारीचें ). ६ कोळी - कीटक अंड स्थितींतुन कीटस्थितीत येऊन शरीराभोंवती रेशमासारखें मऊ आवरण करतो तो . कोशेटा . ७ कळी . ' अंतरी फाकें । हृदयकोंशु । ' - ज्ञा ६ . २०९ . ८ दिव्य करुन लावलेला निकाल ; न्यायदानांतील दिव्य ( अग्नि , पाणी , विष , वजनाचा कांटा उकळआणारें तेल , कुलदेवतेवर पाणी घालनें - ब्राह्मणांच्या चरणांवर पाणी घालणें . किंवा त्यांचें तीर्थ घेणें इ० ) शपथ ; प्रतिज्ञा . ' पीयालीं कृतनिश्चयाचा कोश । ' - ज्ञा १३ . ६०४ . ०कार - पु . १ रेशमाचा किडा ; कोळ्याच्या वर्गांतील प्राणी . २ कोशीस्थतींत असलेला , कोशवासी किडा , फुलपाखरुं , ३ शब्दार्थकोश रचणाचा ; कोश तयार करणारा संपाद्क . ०कीट - कीटक - पु . कोशकर ( अर्थ १।२ ) पहा . कोशकिडा हा आपल्या भोंवतीं कोशेटा करुन आपणांसच कोडूंन घेतो . ' एर्हवीं कोशेकीटका . चिया परी । तो आपणपया आपण वैरी । ' - ज्ञा . ६ . ७२ . - वि . १२ . १६१ . क०गृह - न . भांडार . ' कीं कोशगृहीं प्रवेशोनी । ' रावि १ . ७१ . ०पान - न . देवाचें तीर्थ पिणे . दिव्याचा एक प्रकार . शपथ घेणें ; दिव्य करणें . ०पिणें - शपथ घेणें . ' शरीर वाचा मानस । पियालीं कृतनिश्चयाचा कोश । ' - ज्ञा १३ . ६०४ .
-
पु. दोन मैल अंतर , कोस पहा . ( सं . क्रोश ; प्रा . कोस )
-
०वृद्धि स्त्री. संपत्तीची वाढ ; भरभराट ; सम्रुद्धि . ' होम हवनें होय कोशवृद्धि ॥ ' ०शुद्धि - स्त्री . दिव्यानें निरपराधित्व सिद्ध करण्याची क्रिया .
Site Search
Input language: