-
वावल (वावळा) कुल, अर्टिकेसी
-
बेंथॅम व हूकर यांनी पूर्वी हा द्विदलिकित फुलझाडांचा गण मानला होता. यातील सर्व वनस्पती आता हचिन्सन यांनी चार कुलात समाविष्ट केल्या आहेत. वटकुल, गंजा (गांजा) कुल, वावल (वावळा) कुल व कारगोळ कुल. एंग्लर व प्रँटल यांनी वावल गणातील (अर्टिकेलीझ) फक्त दोन कुलात त्यांना अंतर्भूत केले आहे. वावल कुलात वावळा, आग्या, कापसी, मोठी खाजोटी, बिचू, रॅमी इ. वनस्पतींचा समावेश केला आहे. लहान एकलिंगी, द्विभागी, एककिंज व परिदलात ऱ्हास असलेली फुले, फळ अश्मगर्भी, किंवा कपाली व एकबीजी, चीक नसतो व बहुतेक वनस्पती औषधीय आहेत.
-
Ulmaceae
-
Cannabinaceae
Site Search
Input language: