-
m A dog. Fig. A vile, snarling, currish person.
-
पु. १ श्वान ; सारमेय ; कुक्कुर ; अर्व चतुष्पाद प्राण्यामध्यें कुत्रा हें मनुष्यांशी संबंध असलेले एक महत्वाचें जनावर आहे . हा माणसाळलेला प्राणी आहे . कुत्रा चोर व परकी माणसे यांपासुन घराचें रक्षण कर्तो . शिकार करण्याच्या कामीं त्याचा उपयोग होतो . २ ( ल .) वाईट , हलकट माणुस . ३ चितारू नांवाचा एक मासा . ( प्रा . कुत्त - कुत्ती ) कुत्री - स्त्री . १ शुनी ; सारमेयी : कुत्र्याची मादी . २ एक औषधी वनस्पति व तिचें वोंड , हिच्या फुलास व पानास वाईट तास येतो . काम्हींच्या मतें लोखंडी नांवाची वनस्पति . कुत्रें - न . १ कुत्रा - त्री . २ ( ल .) भांडखोर व शिवराळ माणुस . ३ राहाट थांबविण्यासाठी केलेली योजना . याला दोन पट्ट्या असतात . एक चपटी असून तिचें एक टोंक रहाटच्या विरुद्ध बाजुस खिळ्यांत भक्कम बसवितात व दुसर्या टोकांत बांकदार चपटी अशी लोखंडी कांब बसवितात . दुसर्या टोकांत बांकदार चपटी अशी लोखंडी कांव बसवितात व दुसर्या टोकाला मध्यें एक खांचा असतो , तो खांचा रहाटांत टाकला कीं गति बंद होते . ४ गवताचा एक प्रकार व त्यांचें फुल , तुरा , बोंड , हें वस्त्रास लागलें असतां चिकटून बसतें . ५ लहान कुसळयुक्त रानटी वनस्पतीचें बीं . ६ दार , झडप लावलें असतां उघडू नये म्हनुन अडकविण्याचें एक अडकवण ; आडसर ; चक्राचें दांरो उलट फिरू नयेत म्हणुन दात्यांत अडकविण्याचा धातूचा तुकडा . ७ ( वरील कुत्र्यांच्या साम्यावरुन ) कोपर , खांदा , मनगट , गुड्या , घोठां , कंबरेचा खवाटा यांचा सांधा . ( वाप्र .) ( कुत्रा ) कोलटेकणी बसणें -( माण .) पुढील दोन पाय उभे करुन मागें ढुंगण टेकून बसणें . ( कुत्रा ) मुडा घालून बसणे -( माण ). कुत्र्यानें भांड्यांत तोंड घालुन बसणें .
-
०कुत्रा खाईना - अतिशय वाईट स्थिति येणें . कुत्रा , कुत्रें होऊन राहाणें , पडणें - आर्जंवानें , खुशामतीनें नोकरी करणें . कुत्रीं मारीत फिरणें , हिंडणें - रिकामटेकडें भटकणें . कुत्री वाफेला येणें -( माण .) कुती माजावर येणें ; संभोगोत्सुक होणें .
-
हाल खाईना - अतिशय वाईट स्थिति येणें . कुत्रा , कुत्रें होऊन राहाणें , पडणें - आर्जंवानें , खुशामतीनें नोकरी करणें . कुत्रीं मारीत फिरणें , हिंडणें - रिकामटेकडें भटकणें . कुत्री वाफेला येणें -( माण .) कुती माजावर येणें ; संभोगोत्सुक होणें .
Site Search
Input language: