-
पुस्त्री . १ कटकट ; त्रासदायक प्रश्न , गोष्ट ; भूणभूण ; घासाघीस ; गळी पडून , विनवण्या करून तगादा लावणें . ( क्रि० करणें ; लावणें ). लढाईची गोष्ट लढाईत राहिली त्याचा जिकीर आतां कशाला पाहिजे . - रा ५ . १२ . हल्लीं ज्या समयीं इंग्रजांचा जिकीर निघतो - दिमरा १ . ९३ . २ छळ ; त्रास ; जिगजिग ( त्रासिक किंवा आजारी माणसाची ). ( क्रि० देणें ; करणें ). ३ नि : सहाय स्थिति ; मेटाकुटी ( सगळे प्रयत्न फसल्यानंतर , पैसा खलास झाल्यावरची ). डोळे यावे म्हणून त्यानें हजारों उपाय केले तथापि गुण येईना , यामुळें तो फार जिकीरीस आला . [ सं . जिघृक्षा - जिघीर - जिगीर , पदार्थ घेण्याची इच्छा - भाअ १८३४ , तुल० जर . झिक्र = स्मरण , दिक्क ] जिकीरीस येणें - मेटाकुटीस येणें ; हैराण होणें . - मरांचिथोशा ६२ . जिकीरीची - वि . हताशपणांतील ; नैराश्यपूर्ण ( उत्तर . ) जिकिरीचीं उत्तरें . - पाब ३२ .
-
ना. उपद्रव , उपाधी , करवाद . कीव करण्यासारखी अवस्था ;
-
ना. कटकट , गळी पडणे ;
-
ना. छळ , त्रास , दगदग , दुःख ;
Site Search
Input language: