-
अ.क्रि. १ निर्वाह ; निभाव होणे ; निभावून जाणे . महाराजांचा कारभार प्रजेच्या दुर्दैवाने धकला गेला . - विक्षिप्त २ . ३९ . २ ( खा . व . ) ( अन्न , जेवण ) घशाखाली उतरणे ; पोटांत जाणे ; खपणे . तिखटावेगळ भाकर न धके । - विक ७९ . ३ ( व . ) ( आगगाडी , वाहन इ० ) चालू होणे , धक्क्यावरुन हालणे . गाडी आताच धकली . ४ ढकलले , लोटले जाणे . जितके हरिभजनाला चुकाल । तितके यमाजीकडे धकाल । - अफला ६२ . [ सं . दक्ष = वृद्धौ , शीघ्रार्थेच ; सिं . धिकणु = लोटणे ]
-
क्रि. कसेबसे रेटणे , कसेतरी ढकलणे , निभावणे , विर्वाह होणे .
-
verb खाणे शक्य असणे
Ex. जेवणानंतरही मला ही मिठाई धकेल.
-
See : भागणे, खपणे, चालणे
Site Search
Input language: