-
न. १ ( दैवी ) धर्म , विधि , नियम , विद्या यासंबंधीं वचन , आज्ञा . हें ईश्वरी किंवा अपौरुषेय मानण्यांत येतें . बहुधा सामासांत उपयोग . समाशब्द - शास्त्रमर्यादा , शास्त्ररीती , शास्त्रमार्ग , शास्त्रप्रतिपादित , शास्त्राभ्यास , शास्त्रज्ञ , शास्त्रज्ञान , शास्त्रतत्त्व . २ ( समास नसतांना ) धर्म , वाङ्मय , विज्ञान , कला इ० संबंधीं नियम . हा अर्थ अभिप्रेत असतां बहुधा मर्यादा घालणार्या दुसर्या शब्दांस जोडून येतात . उदा० वेदांतशास्त्र , शिल्पशास्त्र , कामशास्त्र , न्यायशास्त्र , व्याकरणशास्त्र , ३ ( सामा . ) प्रबंध ; ग्रंथ . ४ नियमबध्द , सिध्दांतमय रचना असलेला विषय . [ सं . ] ( वाप्र . ) शास्त्रास , शास्त्राचा , शास्त्रापुरता , शास्त्रार्थास असणें , शास्त्रार्थास नसणें - केवळ नांवाला असणें - नसणें . हा आपला उगीच शास्त्रास चाकू आहे . ह्यानें बोट देखील कापणार नाहीं . आज घरांत शास्त्राला साखर नाहीं , मग शेरभर देऊं कुठली ? शास्त्रास स्नान झालें खरें , मुलशुध्दी ती निराळी शास्त्रांत - वि . शास्त्रांप्रमाणें ; शास्त्र धरून , अनुसरून . [ सं . ]
-
०दर्शि वेत्ता विद
-
०प्रविण प्रविज्ञ अभिज्ञ संपन्न - वि . शास्त्रांत निपुण , कुशल ; चांगला शास्त्री . [ सं . ]
-
०निंदा स्त्री. शास्त्राची धिक्कारणी , अवमानणी , शास्त्राचा अपमान . [ सं . ]
Site Search
Input language: