-
न. १ ( काव्य . ) व्यंग ; उणेपणा . इंतुकें हें नस्तां वेंग । नरदेह आणी सकळ सांग । - दा १ . १० . ३२ ; १५ . ९ . २१ . [ व्यंग ]
-
दोन्ही हात अंगापासून लांब करून त्याच्यांत माणूस , वृक्ष , गाठोडें इ० पकडावयासाठीं घातलेली मिठी ; कव ; कवळा ; कवळी ; कवटळा . अंकुराचा कांहीं वर्षांनीं सपाटा बुंधा बनून दहा मनुष्यांच्या वेगेंतहि तो मावणार नाहीं . - नि ४७१ . २ ( गो . ) आलिंगन . ( क्रि . मारणें ; घालणें ).
-
f Embrace, clasp, hug.
-
०मारणें वेगेंत , कवळींत घेणें , धरणें . वेंगटणें , वेंगाटणें - क्रि . १ वेगेंत धरणें ; वेंग मारणें ; हातांनीं कवटाळणें . २ उराशीं धरणें ; आलिंगन देणें ; मिठी मारणें . वेंगणें - सक्रि . १ वळसा घालणें ; प्रदक्षणा घालणें . झाडाला वेंगून जा . = झाडाला वळसा घालून जा . २ वेंघणें पहा . वेंगळणें , वेंगाळणें - क्रि . ( कों . ) वेंग मारणें ; मिठी मारणें ; कवटाळणें . वेंगाटी - स्त्री . वेंग पहा . वेंगाटी मारणें , वेंगाटींत धरणें , वेंगाटींत घेणें - कवटाळणें ; वेंग मारणें . वेंगेवर घेणें - कडेवर घेणें .
Site Search
Input language: