देवपूजेचा संकल्प मंत्र
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रम्हणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्र्वेतवराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जंबुद्विपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिणापथे दंडकारण्ये देशे गोदवर्याः दक्षिणे तीरे (अथवा रेवाय उत्तरे : तीरे) बौद्धावतारे रामक्षेत्रे रामरामाश्रमे (अस्मिन् वर्तमाने) शालिवाहनशके अमुकनाम संवत्सरे अमुकअयने अमुकऋतौ अमुकमासे अमुकपक्षे अमुकतिथौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे शुभ्नामयोगे शुभकरणे अमुकस्थिते वर्तमाअनचंद्रे अमुकराशिस्थिते सुर्ये अमुकस्थिते देवगुरौ शेशेषु ग्रहेषु यथायथां राशिस्थानस्थितेषु सत्सु एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यस्थितौ ममआत्मनः वेदोक्त(अथवा पुराणोक्त) फलप्राप्त्यर्थ अस्माकं सकुटुंबाना सपरिवाराणां द्विपदचतुष्पदसहितानां क्षेमस्थैर्याभयायुरारोग्यैश्र्वर्याभिवॄद्ध्यर्थं समस्त मंगलप्राप्त्यर्थं समस्ताभ्युदयार्थं च श्रीअमुकदेवताप्रीत्यर्थं यथामिलितोपचारद्रव्यैर्ध्याना-ऽऽ वाहनादिषोडशोपचारद्रव्यैः पूजां करिष्ये । तदंग आसनादि कलशाद्यर्चनं च करिष्ये ॥
अर्थ :
"महाभाग्यशाली व पुरुषश्रेष्ठ, सर्वव्यापी विष्णूचे आज्ञने वर्तमान काली आदिब्रम्हाच्या दुसऱ्या परार्धात, विष्णुपदात, श्रीश्र्वेतवाराहकल्पांत वैवस्वतमन्वंतरामध्ये, २८ व्या युगचतुष्कांतील कलियुगाच्या पहिल्या चरणात, जंबुद्विपातिल भरतवर्षात(हिन्दुस्थानात), दंडकारण्यात, गोदावरीच्या दक्षिणतीरा्स(किंवा रेवाच्या उत्तरतीरास), बौद्धावतारात,रामक्षेत्रात(रामसीतेच्या आश्रमात) शालीवाहान शकाच्या अमुक संवत्सरांत (सनांत) अमुक आयनात, अमुक ॠतूत, अमुक मासात(महिन्यात), अमुक पक्षात,अमुक तिथीस (तारखेस), अमुक वारी, अमुक दिवस नक्षत्रात, शुभनाम योगात, शुभकरणात, अमुक राशिस्थित चंद्र असता, अमुक राशिस्थित सूर्य असता, अमुक राशीवर देवगुरु बॄहस्पती असता आणि इतर ग्रह बरोबर आपापल्या राशीवर स्थित असता अशा विशेष गुणांनी श्रेष्ठ झालेल्या कल्याणकारक व पुण्यकारक अशा तिथीस, मला स्वतःला वेदोक्त अथवा पुरणोक्त) फलप्राप्ती होण्यासाठी आणि माझ्या कुटुंबाच्या प्रिवारास गाई वगैरे चार पायांचे पशू आणि द्विपाद प्राणी यांच्यासह आमच्या कुटुंबाला क्षेम, स्थिरस्थावरता, दीर्घायुष्य, आरोग्य, ऐश्र्वर्य, इत्यादिकांची वाढ होण्यासाठी व समस्त मंगलप्राप्तीसाठी, तसेच सर्वत्र उत्कर्ष होण्यासाठी अमुक देवता प्रसन्न व्हावी म्हणून यथाशक्ती मिळविलेल्या या पुजासाहित्याने मी ध्यान, आवाहनादी सोळा उपचारंनी पूजा करतो."पूजा करणारी स्त्री असल्यास तिने वरील संकल्प "शुभ पुण्य तिथौ" येथपर्यंत म्हणून पुढे : मम इह जन्मानि जन्मांतरेषु च अखंड सौभग्यादी मनोवांछितकामनासिद्ध्यर्थं अमुक देवता प्रीत्यर्थं पुजां करिष्ये ॥
अर्थ:
"ह्या व अन्यजन्मी अखंड सौभग्य, पुत्रपौत्रदि प्राप्ती व इतर मनोकामना सिद्धिस जाव्यात म्हणून हे मी पूजन करीत आहे." (असे देशकालादिकांच्या स्मरणानंतर म्हणावे) नंतर निर्विघ्नतासिद्ध्यर्थं महागण्पती, कलश व शंखादी पूजन क्रमाने करावे. त्या वेळी मंत्र म्हणावा-
महागणपति ध्यान मंत्र
वक्रतुंड महाकाय कोटीसूर्यसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
अर्थ :
"ज्याचा देह मोठा असून तोंड वाकडे आहे,तसेच अनंत सूर्याच्या प्रभेप्रमाणे ज्याचे तेज आहे, अशा हे देवा ! सर्व काली व प्रत्येक कार्यामध्ये तू मला निर्विघ्नता प्राप्त कर ." असे म्हणून नमस्कार करावा. नंतर कलशची म्हणजे वरुण देवतेची स्थापना करावी-
कलशस्थापना
उदकाने भरलेला एक तंब्या(कलश) घेऊन, त्याचे तोंडात विड्यांची पाच पाने ठेवावी. त्यात एक सुपारी टाकून (असल्यास) तोंडावर एक नारळ ठेवावा व त्याला पाच जागी कुंकवाचे टिळे लावावे,व फुलंची माळ वाहावी म्हण्जे कलशस्थाप्ना झाली. नंतर गंध, अक्षता वाहून त्याचे पूजन करावे. त्या वेळी उजवा हात कलशावर ठेवून मंत्र म्हणावा-
कलशपूजन मंत्र
कलश्यस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रः समाश्रितः ।
मूले तत्र स्थितो ब्रम्हा मध्ये मातॄगणाः स्मॄताः |
कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तदीपा वसुंधरा ।
ॠग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्यथवर्णः ।
अंगेश्र्च संहिताः सर्वे कलशं तु समाश्रिताः ।
अत्र गायत्री सावित्री शांतिपुष्टिकरी तथा ॥
आयांतु देवपूजार्थ दुरितक्षयकारकाः ।
गंगे च यमुने चैव गोदवरि सरस्वती ।
नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन्संनिधिं कुरु ।
वरुणाय नमः । सर्वोपचारार्थे गंधक्षतापुश्पं समर्पयामि ॥
अर्थ :
"कलशाच्या मुखस्थानी विष्णु, कंठस्थानी शिव, मूलस्थानी ब्रम्हदेव व मध्यभागी मातृगण आश्रय करुन रहिले आहेत. तसेच त्याच्या कुक्षीमध्ये (आत) सप्तसमुद्र, साथी द्विपांसह पॄथ्वी,ॠग्वेद, सामवेद, अथर्वववेद आपापल्या अंगासहवर्तमान कलशाचा आश्रय करुन राहिले आहेत. येथे शांती व पुष्टिदायक गायत्री, सावित्री ह्या पापनाशक देवपूजेकरिता येवोत. गंगे,यमुने, गोदवरी, सरस्वती, नर्मदे, सिंधु, कावेरी, तुम्ही या जली सर्वदा स्थित व्हवे. (तुम्हास आवाहन करतो) वरुणास नमस्कार असो. स्र्व उपचरासाठी गंध, अक्षता,फुले अर्पण कर्तो." असे म्हणून ती फुले वगैरे कलशास वाहावीत. त्यातिल उदक तुळशीपत्राने सर्व पुजासाहित्यावर शिंपडावे. नंतर वाट्ल्यास शंखपुजन करावे. त्या वेळी मंत्र म्हणावा-
शंखपूजन मंत्र
शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता ।
पृष्ठे प्रजापतिश्र्चैव अग्रे गंगा सरस्वती ॥
त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतः करे ।
अग्रताः सर्व देवांना पांचजन्य नमोस्तुते ॥
शंखाय नमः सर्वोपचारर्थे गंधाक्ष्तपुष्पं समर्पयामि ॥
अर्थ :
"शंखा ! तुझ्या मुळाशी चंद्र, कुक्षीत वरुण, पाठीवर ब्रम्हा व शेवटी टोकावर गंगा, सरस्वती निवासा करतात. हे शंखा , तु पूर्व समुद्रात उत्पन्न झालास, तेव्हा तुला विष्णूने हाती धरले. अशा निर्मित शंखा ! तुज नमस्कार असो." असे म्हणून गंध, अक्षता, फुले वाहावी. नंतर शंखातील पाणी शिंपडावे त्या वेळी मंत्र म्हणावा-
शंखोदक प्रोक्षण
शंखोद्केन पूजाद्रव्याणि प्रोक्षयेत ।
आत्मानं प्रोक्षयेत् । घंटानादं कुर्यात् ।
अर्थ :
शंखातील उदक पुजेच्या सामानावर व स्वतःच्या अंगावर शिंपडावे आणि घंटा वाजवावी. त्या वेळी मंत्र म्हणावा-
घंटापूजन मंत्र
आगमर्थ तु देवानां गमनार्थं तु राक्षसानाम् ।
कुर्वे घंटारवात तत्र देवताव्हनलक्षणम् ॥
घंटानादें कुर्यात् । घंटायै नमः ।
अर्थ :
"देवांनी यावे व राक्षसांनी पळावे म्हणून मी घंटा वाअजवितो, देवांना बोलावितो. घंटेला नमस्कार असो." असे म्हणून गंध,अक्षता वाहाव्या व शुद्धी येण्यासाठी कलशातील पाणी अंगावर शिंपडावे. त्या वेळी प्रोक्षणमंत्र म्हणावा-
प्रोक्षण मंत्र
अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा ।
यः स्मरेत्पुंडरीकाक्षं स ब्राह्याभ्यंतरः शुचिः ॥
अर्थ : "अपवित्र किंवा पवित्र अशा कोणत्याही अवस्थेत जरी मनुष्य असला तरी तो कमलपत्राक्ष विष्णूचे ध्यान करील तर आतून व बाहेरुन शुद्ध होतो." असे म्हणून विष्णूचे ध्यान करावे-