संकष्टी :
ही चतुर्थी 'विनायक चतुर्थी' म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा . गाईच्या दुधाचा आहार करावा. सायंकाळी गणपतीचे षोडशोपचार पूजन करुन त्यास तांबवूडे फूल व दूर्वा वाहाव्यात आणि चंद्रोदयानंतर नैवेद्य दाखवून ब्राह्मणभोजनोत्तर आपण उपवास सोडावा. या योगे संकटनाश होऊन सिद्धी प्राप्त होतात. नल राजा या व्रताच्या आचरणाने पुण्यश्लोक बनला. तसेच , एक चांडाल अनायासे घडलेल्या व्रताच्या प्रभावाने स्वानंदलोकी गेला.