संकष्टी :
या चतुर्थीला 'चिंतामणी चतुर्थी' म्हणतात. या दिवशी दिवसभर केवळ पाणी पिऊन उपवास करावा. रात्री चंद्रोदयानंतर कलशावर श्रीचिंतामणी गणेशाची स्थापना करून पूजा करावी. अर्घ्यदान द्यावे आणि मोदकांचा नैवेद्य दाखवावा. ब्राह्मणभोजनात घालून मग स्वतः जेवावे. यामुळे सर्वप्रकारचे मोह नष्ट होतात, चित्ताची भ्रांती नष्ट होते आणि सुख प्राप्त होते.
अयोध्येचा राजा या व्रताच्या प्रभावाने सर्व संकटातून मुक्त झाला, प्रजा आनंदी झाली. तसेच, मालवदेशात कर्णनगरीत राहणारी एक रूपवान गणिका अजाणपणे तिच्या हातून या चतुर्थीचा उपवास घडल्याने त्याच्या पुण्यप्रभावाने सर्व पापांपासून मुक्त होऊन ब्रह्मलोकात गेली.