वैशाख व. चतुर्थी
वैशाख व. चतुर्थी
संकष्ट चतुर्थी :
ही कृष्णपिंगाक्ष संकष्टी म्हणून प्रसिद्ध आहे. दिवसभर शिंगाड्याचे पदार्थ खावून उपवास करावा. सायंकाळी श्रीकृष्णपिंगाक्ष गणपतीची यथासांग पूजा करून चंद्रोदयानंतर आरती करून ब्राह्मणभोजन घालावे. ब्राह्मणास सुवर्ण दक्षिणा द्यावी व मग स्वत: जेवावे. यायोगे सर्व पापांचा विनाश होतो व धनधान्याची समृध्दी होऊन पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने तो सुखी होतो. महर्षी अगस्ती या व्रताचरणाने व त्याच्या प्रभावाने सागरशोषण करू शकले . तसेच, अवंती नगरीत राहणार्या एका पापी वैश्याचे हातून अजाणतेपणे हे व्रत घडल्याने तो अनंत पापांतून मुक्त झाला. असा या व्रताचा प्रभाव आहे.
N/A
N/A
Last Updated : December 09, 2007
TOP