भक्तीचिये पोटीं बोध-कंकडा ज्योती ।
पंचप्राण जीवेंभावे ओंवाळूं आरती ॥ १ ॥
ओंवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा ।
दोन्ही कर जोडूनि चरणी ठेविला माथा ॥ ध्रु. ॥
काय महिमा वर्णू आतां सांगणें तें किती ।
कोटी ब्रम्हहत्या मुख पाहतां जाती ॥ २ ॥
राई रखुमाबाई उभ्या दोन्ही दों बाहीं ।
मयूरपिच्छचामारें ढाळिती ठईंच्या ठाईं ॥ ३ ॥
विटेसहित पाय म्हणुनी भावे ओंवाळूं ।
कोटी रवी-शशी दिव्य उगवले हेळूं ॥ ४ ॥
तुका म्हणे दिप घेउनी उन्मनींत शोभा ।
विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥ ५ ॥