विवेकसार - समाप्ती
श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .
इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्यवर्य श्रीमद्वासुदेवन्द्रस्वामी जे येही विवेकसार ऐसे नाम ज्याचें तो ग्रंथ संस्कृतफकिकारूप केला ॥ तेहींच परम दयाळुपणें आपले शिष्य श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्री रघुनाथेंद्रस्वामी जे यांचे हाती संस्कृतानधिकारी ऐसे जे ब्राह्मण आणि श्रीपाद तैलंग याकारणें तैलंग भाषेकरून ग्रंथ करा म्हणून आज्ञा केली त्याउपरी तेंहि मनन ऐसें नाम ठेउन ग्रंथ केला ॥ त्याउपरी श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्री बाळकृष्णानंदसरस्वती स्वामी जे तेंहि महाराष्ट्र ब्राह्मण आणि श्रीपाद संस्कृतानधिकारी त्यांस वेदान्तशास्त्रानुसार अभिप्राय जो याचे ठाई अभिनिवेश होउन साक्षात्काराकारणें स्वशिष्य बाळाजी अंबाजी नामक लक्ष्मेश्वराचे ग्रहच्छ पौरुषत्रय वेदान्ताचेठाई निष्ठा आहे ज्यास त्यास आज्ञा केली त्यावरून तेही महाराष्ट्रग्रंथ यथातैलंग केला तो श्री स्वामीच्या दयेकरून समाप्तितें पावला ॥ हा ग्रंथ जे श्री गुरुमुखें विचारून अर्थ मनास आणिल त्यास अपरोक्ष साक्षात्कार सिद्धच आहे निःसंशय ॥ श्री सहजानंदनाथार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP