सभापर्व - दुर्योधनाचा द्यूतनिश्चय

मयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.


त्या मर्यसभेंत रचना पाहुनि राजा सुयोधन भ्रमला, ।
प्रौढकविकृती जैसा बाळ ह्नणे जो, ' कळे अदभ्र मला ' ॥१॥
मानुनि जळ स्थळाला वस्त्रांते आवरी करें, वाटे ।
कोठें पडे जळी तो जळ न, जल स्थळचि तें खरे वाटे ॥२॥
पिहितद्वार विवृतसें मानुनि जातां कपाळ आपटलें, ।
झाला व्याकुळ दुर्मति आपुलियाचि भ्रमाचिया पटलें ॥३॥
जाय बळें उघडाया कर देवुनि उघडिल्याहि अरसा ज्या ।
तोंडघशींच पडे हो ! होय चमत्कार तापकर राजा ॥४॥
भीमार्जुन पोषिति अतिहासा अंधजसुदुःसहा यमही ।
त्यां निजभरहर हरिचे सुसहाय ह्नणे, न दुःसहाय, मही ॥५॥
त्या उपहासें झाला बहुतचि संतप्त तो सुयोधन हो ! ।
चित्ती ह्नणे, ' मरो, परि अपमानी सर्वथा सुयोध नहो ' ॥६॥
जातां पुराशि मार्गी शकुनि ह्नणे कुरुवराशि, ' सांग मला, ।
तूं अप्रसन्न कां ? गा ! वाड्नियम सदैव विहित कां गमला
दुष्ट ह्नणे, ' जें झालें खैर दुःख कृतांतरुप मामा ! तें ।
दावाचिसें कराया भस्म पहातें तरुपमा मातें ॥८॥
झालें युधिष्ठिराला भूमंडळ विक्रमें वश, कुनेते ।
भ्राते नव्हेत त्याचे, नरतनुधर सर्व देव शकुने ! ते ॥९॥
श्री कीर्ति मूर्ति महिमा शक्रीर्चा या युधिष्ठिरी भूपी, ।
अन्यत्र लेश कैंचें ? सलिल जसें सागरी तसें कूपी ॥१०॥
या स्वसपत्नोत्कर्षें जळतों मी अंतरींच, असुखा या ।
सोसील कोण मानी ? देतों मी पावकासि असु खाया ॥११॥
घेवुनि दे गुर्वाज्ञा मज हा अग्नीत काय होमाया;
दुःखद जो स्वपराला त्याची ज्ञात्यांसि काय हो ! माया ? ॥१२॥
शकुनि ह्नणे रायातें, ' प्रिय अप्रिय काय तूं ? अगा ! धात्या; ।
' कर्मानुरुप देतो फळ ' ह्नणति असे भले अगाध त्या ॥१३॥
पुण्य तसेंचि तयांचें व्हावा उत्कर्ष नित्य नव साचा; ।
महिमा पूर्वीचा हा सुकृतभराचा, नव्या न नवसाचा ॥१४॥
यत्न तदुच्छेदी त्वां शत केले परि कवे ! न शकलास, ।
पूर्णेदुं काय जिंकी उडु ज्याच्या जिंकवे न शकलास ॥१५॥
तुजही सहाय गुरु, गुरुसुत, कृप, वृष, बंधु, भीष्म, आहेत
होईल पूर्ण दिग्जय बहुदक्षिण यज्ञ, कीर्ति हा हेत ' ॥१६॥
नृप त्यासि ह्नणे, ' मामा ! योजिसि येथें कशास सामातें ? ।
सांग उपाय, युधिष्ठिरपरिभव जेणें घडे, असा मातें ॥१७॥
शकुनि ह्नणे, ' पांडुसुत, द्रुपदनृपति, तत्सहाय कंसारी, ।
यांशि भुजबळें जिंकी ऐसा कैंचा समर्थ संसारी ? ॥१८॥
परि एक उपाय असे धृतराष्ट्र तुला ह्नणेल जरि कर गा ! ।
होइल युधिष्ठिराची श्री पृथ्वी निश्चयेंचि तरि करगी ॥१९॥
प्रेम बहु, पतुत्व नसे, द्यूती धर्म स्वयें असे भोळा ।
अनिवर्तनप्रतिज्ञा तच्छ्रीला यापरी करी गोळा ' ॥२०॥
कुरुखल ह्नणे, ' तरि नृपा ! घे आज्ञा, तूंचि हें वद पित्यातें ।
मी हें बोलों न शकें, जरि करितो बहु दया तदपि त्यातें ' ॥२१॥
करुनि कुविचार, नगरी जावुनि एकांत समय पाहूनी, ।
नृप गांठिला हळूहळू तच्छास्त्रविवेकचंद्रराहूंनी ॥२२॥
शकुनि वदे, ' राजा ! हा झाला त्वज्ज्येष्ठपुत्र कृश हरिण ।
क्षणही स्वस्थ नसेचि व्याघ्रवनामाजि जेंवि शिशु - हरिण ' ॥२३॥
वृद्ध वदे, ' वत्सा ! कां पांडुर कृश जाहलासि सांग मला ? ।
भोगिसि भोग सुरांचे निष्कंटराज्यखेद कां गमला ? ॥२४॥
कलिपुरुष ह्नणे, ' देती तिळहि न सुख हे स्वभाग्यभोग मला ।
पाहुनि युधिष्ठिरश्री मज तुच्छ स्वविषय प्रभो ! गमला ॥२५॥
मतिचक्षु भेदिलें हो ! माझें अतिदुःसहें किरीटिकणें; ।
मज संसारी कैचें चितनें लागतां किरी टिकणे ? ॥२६॥
मी घटतों, परि तुमचे मनि केवळ वाढतात ! ते; ज्यानें
अवलोकिले, कळे त्या शिशुशशिसे वाढतात तेजानें ॥२७॥
इतरांची काय कथा ? जे देणार त्निखर्व वळि बा गा ! ।
त्यांतें वारित होते द्वारप दारापुढें न ज्यां जागा ॥२८॥
संज्ञा केली होती, की होतां लक्ष त्या मखी पात्र, ।
उच्चगृहाग्रपुरुषे फुंकावा शंख एकदां मात्र; ॥२९॥
वाजत होता संतत दर, जाणों विष वचोगृही वमला; ।
त्या अनिशरवश्रवणें बापा ! आलें खरेंच हीव मला ॥३०॥
मयकृतसभेंत पडलों मी वापीत स्थलभ्रमें सहसा, ।
हसले सपत्नदाराहि, न ह्नणे कोणीहि की ' उगे न हंसा ' ॥३१॥
खदखद हांसे भीमहि जिष्णुहि, मजला तसेचि बा ! यमही ।
तददुर्दशा न करितां निस्तेजा मज वठेल काय मही ? ॥३२॥
विवृत्तद्वाराकार प्रेक्षुनि भित्तिप्रदेश जों शिरतों,
फुटलें तें थोडें बहु, जें धरिलें शत्रुनें स्वयें शिर तों ॥३३॥
धृतराष्ट्रसुता ! ये, मी दाखवितो, द्वार हें, न बापा ! हें ।
वदला असें वृकोदर जें तद्वाक्यार्थ तूंचि बा ! पाहें ' ॥३४॥
तों शकुनि ह्नणे, ' राया ! अभिमानधना ! सुयोधना ! जरि तें
भाग्य हरावेंचि असें इच्छिसि जिंकूनि दुर्जया अरितें, ॥३५॥
तरि मज कपटद्यूती आहे बळ फार, हा उपाय भला, ।
धर्महि न ह्नणेल नको हेंही ठावें असे यथार्थ मला ॥३६॥
धर्माची ' आहूतो ' न निवर्तेयम् ' असी प्रतिज्ञा ते, ।
न मृषा द्यूताप्रति अतितर खर ह्नणति न असीप्रति ज्ञाते ' ॥३७॥
खलमणि ह्नणे, ' नृपाळा ! दे आज्ञा, श्री हरील शकुनी ती
कां न स्वीकारावी, करिल जरि महारिला वश कुनीती ? ' ॥३८॥
धृतराष्ट्र ह्नणे, ' पुसतों विदुराला, तो विवेकराशि कवी ।
मज हित सदा शिकावतो, जेंवि बृहस्पति सुरेश्वरा शिकवी ' ॥३९॥
भरतकुळकलंक ह्नणे, ' मोडील विदुर विचार हा केला, ।
मग मी मरेन, राया ! कथितों मारुनि उच्च हाकेला ' ॥४०॥
पुत्रप्रियकर राजा आज्ञापुनियां निजानुगां बरवी ।
जीत सहस्त स्तभ स्वर्णमणिखचित असी सभा करवी ॥४१॥
आप्तांनी विदुराला हा कपटद्यूतमंत्र जाणविला, ।
मग त्या धृतराष्ट्रेंही तो बुद्धिसुधासमुद्र आणविला ॥४२॥
नमुनि कवि ह्नणे, ' राया ! न द्यूतविचार हा मला रुचला ।
त्यजुनि सहकार पिकला पिक लाजेना वरावया कुचला ' ॥४३॥
अध ह्नणे, ' होऊं दे द्यूतक्रीडाविनोद भावांत
अस्मान्निकेट तयांच्या न शिरेल दुराग्रह स्वभावांत ॥४४॥
होणें होतें, साधो ! चित्त तुझेंही न काळजी वाहो, ।
ज्याचें आचरण जसें त्या तैशा फलद काळ जीवा हो ! ' ॥४५॥
क्षमहि बुधोक्त न रुचलें, रुचले बालोक्त अक्षमहि, म्या तें
काय वदावें ? भुलला दोषज्ञहि भूप अक्षमहिन्यातें ॥४६॥
' धर्मासि सुहद्यूतक्रीडार्थ क्षिप्र आण जा. विदुरा ! '
ऐसे वदे वचन, तें कविहद्याशिच न कांपवी, भिदुरा ॥४७॥
असकृद्धितोपदेशें विदुर न शकला नृपासि वळवाया, ।
कीं तो पुत्नस्नेहें झाला सिद्ध स्वकीर्ति मळवाया ॥४८॥
धर्मासि निरोप हरिप्रस्थी कटु केवळ स्वभावाचा,
चिताम्लानच्छविनें कविनें कथिला चळस्वभावाचा ॥४९॥
धर्म ह्नणे, ' बापाजी ! ऐसें ह्नणतात काय हो तात ? ।
बहु उत्तम वचनकरा तारक गुरुचेचि पाय होतात ॥५०॥
चाला अवश्य येतों, भावि चुकेनाचि जे भले खोटें, ।
अयश पुन्हां वृद्धपणी गुरुचें होईल दुःख हें मोठें ॥५१॥
स्वप्नाहि अनय न घडो, अपकीर्ति नसो, असे असेल मनी ।
तरि तारिल जगत्पति मज, सालस जरि नसेन, तन्नमनी ॥५२॥
युद्धास द्यूतासहि जावें, नाही ह्नणों नये, बा ! हे ।
माझी अशी प्रतिज्ञा सत्या अर्त्यादरोचिता आहे ' ॥५३॥
ऐसें वदोनि राजा सकुटुंब निघोनि गजपुरा आला; ।
त्याला पाहुनि आप्तां थोडा बहु हर्ष दुर्जना झाला ॥५४॥

उपसंहार

भक्तमयूरकरें हें श्रीगुरुनें लिहिविलें सभापर्व, ।
कीं आर्यानंदाचें रसिकांची नित्य हो सभा पर्व ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP