विराटपर्व - कीचकवध

मयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.


कविता मयूरकविची, तीस मना ! सुरभि मान, वाचा वी ।
तीच सतत, निरसाया कविही निजदुरभिमान वाचावी ॥

कीचकवध.

कीचक नामा सेनापाल श्याल प्रसिद्ध राजाचा ।
भंगूं पाहे कृष्णाव्रत, वांछी अभ्युदय धरा ज्याचा ॥१॥
भगिनीस ह्नणे, ' पूर्वी आढळली या न हे मला भवनी, ।
वाटे जन्मदरिद्रा झाला बहुकोटिहेमलाभवनी ॥२॥
मोहेल इला पाहुनि शक्रहि, मग अन्य कां न नर मोहे ?
मजसी अवः कराया अहिसुरनरकन्यकानन रमो हे ' ॥३॥
लब्धतदनुमोदन तो जंबुके सिंहीस, की सर्काम ससा ।
व्याघ्रीस, सतीस बळें, शांतीस वरावयासि तामससा, ॥४॥
रावणसा बहु विनवी, प्रेम प्रत्यक्षरीहि नव दावी ।
कीचक नीच कलुषनिधि त्याची आर्यात गोष्ट न वदावी ॥५॥
कृष्णा ह्नणे, ' अहाहा ! बुडती तरि भजति नीच कामातें, ।
सावध हो, गा ! वध हो न, व्याली जाण कीचका ! मातें ॥६॥
परदारा मी, मत्पति गंधर्व, प्रबल उग्र शिवशील, ।
मागें सरशिल, तरशिल; मरशिल जरि मज बळेंचि शिवशील ' ॥७॥
ती तीस ह्नणे, ' कीचकसदना जाऊन आण गे ! हाला ' ।
धाडी बळें वृकाच्या घालुनि हरिणीस आण गेहाला ॥८॥
कृष्णा ह्नणे, ' न जाइन, जेंवि मृगी वृकबिळा, विटागारा, ।
साधुगृहा धाड,परमतप्ता तत्पर्थशिळा विटा गारा ' ॥९॥
विनवी ऐसें बहु, परि तीस सुदेष्णा ह्नणे तरी ' जाच ' ।
फारचि बरी निरयगति परवशता शतगुणें करी जाच ॥१०॥
जातां परौर्थही बहु तापातें पावली सुरामा ती, ।
न करील कां पित्याची दुर्गतिची माउली सुरा माती ? ॥११॥
कीचक विलोकुनि ह्नणे त्रिजगद्गुरुविष्णुचाहि आलीस, ।
' रंभाचि सुदति ! तू या नलकूबरमंदिरासि आलीस ॥१२॥
सर्वस्व अर्पितों तुज देवि ! करी पूर्ण काम, हो दारा, ।
विकत मिळत स्मितसुधालेशें घेशी न कां महोदारा ॥१३॥
इत्यादि नीच कीचक दुष्कर्माची धरुनि आसे वदे ।
कृष्णा वदे, ' सुदेष्णेकरितां पात्री भरुनि आसव दे ' ॥१४॥
तो कर धरुनि खल ह्नणे, ' दासी आहेत फार अन्या, या, ।
वैसा शयनी, राज्ञी करिते, करवूनि दास्य अन्याया ' ॥१५॥
कर आसुडतांचि पडे धडडड वाल्यांजबें जसा विटंपीं, ।
कैचें तेज बल तशा दुर्वृत्ती ? जो सुरारसा विट पी ॥१६॥
तव ते उठोनि धांवुनि पळतां कवळूनि नीच कबरीतें, ।
नृपतिसमक्षहि पाडी लत्ता ह्नणोनि कीचक बरीतें ॥१७॥
भीमांगुष्ठाप्ति धरी स्वांगुष्ठे धर्मराज दडपून, ।
नाही तरि तेव्हांचि श्येनेतसा मारिताचि झडपून ॥१८॥
कृष्णा रडत ह्नणे, ' या रायावरि धर्मनीति विटर्ताहे, ।
कैसी उपेक्षिता, हो ! सभ्यस्त्रीकीर्तिहानि विटतौ है ॥१९॥
प्रेमें रक्षितिल सदा ह्नणुनि दिलें मी जयांसि मत्तातें, ।
ते गंधर्व उपेक्षिति मज कां ? कां मारिती न मत्तातें ? ॥२०॥
निजदुःखाहुनि केवळ कनकनगासहि गणी लहान सती; ।
तें द्वारकापुर तसें आणी बहुधा मनी महानस ती. ॥२१॥
जाय निशीथी साध्वी, दावी तिस तत्प्रभाचि वाट तमी, ।
चित्तांत ह्नणे, ' भीमा ! दयिता ! दयिता नसेन वाटत मी ' ॥२२॥
पाहुनि ह्नणे, ' भीमा ! आश्रय तुज काय हें महानस, हा ! ।
न यशोहानि सहा, गा ! सुज्ञा ! सहकाय हेमहान सहा ॥२३॥
निजलां काय मृतापरि ? व्हा जागे, सिंहसे उठा, राहो ।
निद्रा, कीर्ति वरा हो ! हीप्रद हा बाहु भृगुकुठारा हो. ' ॥२४॥
भीम गडबडोनि उठे अंकीच निवासे तीस दे वामी, ।
चित्ती म्हणे, ' बहुदिसां आतळलों या सत्तीस देवा ! मी. ' ॥२५॥
' दयिते ! कां आलीस ? प्रमदे ! हा आर्द्र कां पदर जाये ?  ।
भ्यालीस भीरु ! भय कां ? भेटे त्यालाचि कांप दर ज्या ये ॥२६॥
तूं काय भार ? भामिनि ! उतरसि मांडीवरुनि कां, बस ये,  ।
झालें काय ? वद सुदति ! सुमुखि ! सति ! रडूं नकोचि, थांब सये. '' ॥२७॥
' कृष्णसखी द्रुपदसुता धर्मस्त्री सून पांडुराजाची, ।
कविगण गणपति गाती कीर्ति सुधासिधुपांडुरा ज्याची ॥२८॥
कवि जीस राजसूयामाजि, व्यापुनि मही नभा, गाती, ।
झाली विराटसदनी सैरंध्री परम हीनभागा ती ॥२९॥
कीचक नीच कर तिचा धरि, परि हरिची सखी न अनुसरली,  ।
कर आसुडितां पडतां खल, तेथुनि दूर ती सुतनु सरली ॥३०॥
लता ह्नणुनि मूर्छित केली सुकुमारमूर्ति भूपातें. ।
अजि ! सोसलें कसें पतिहदया ? सोसो ससभ्य भूपा तें ॥३१॥
हे स्त्री नव्हे, प्रतिष्ठा तुमची, जरि ईस सोडिता पाणी ।
' धर्मे चार्थे च ' असें वदलां कां प्रथम जोडितां पाणी ? ॥३२॥
मज मरण सुसह, परि हें दुःसह बहु,धातया ! न रामेला,  ।
रक्षी वरुनि जो जन ह्नणती बहुधा तया नरा मेला ' ॥३३॥
नेत्रें पुसोनि कवळुनि भीम सतीला ह्नणे, ' उगी, न रडें, ।
अज्ञातवास नसता, तरि अरिचें तैंचि मुरडितों नरडें ॥३४॥
एकांतनृत्यशालाशयनी भेटे, असेंचि कर, जाये ! ।
येइल तसेंच माझ्या नृहरीच्या यश जसेंचि करजा ये ॥३५॥
काळाहि न भीतिस जी स्त्री तूं भ्यालीस काय अल्पा या ?  ।
कल्पाया सत्य, स्मित कर, ह्नण ' नृत्यालयस्थतल्पा या ' ॥३६॥
करवुनि खलवधनिश्चय तेथुनि गेली सती स्वशयनातें, ।
कंठी क्षपा स्मरोनि प्राणसख्या पुंडरीक - नयनातें ॥३७॥
गांठी तिला पुन्हा तो खल, जेंवि पतंगदीप कलिकेला, ।
प्रार्थुनि ह्नणे, ' सुमुखि ! मज भज, तुजसी म्यां चुकोन कलि केला ॥३८॥
सुंदरि ! विराट राजा नांवाचा जाण, साच मत्स्यप हा, ।
शृंगारसतरेगिणि ! तळमळतो संगमार्थ मत्स्य पहा ' ॥३९॥
त्यासि खरें भासेसें प्रियशिक्षित सस्मित स्वयें वदली;  ।
परि कांपली सतीची तनु जैसी मंदमारुतें कदली ॥४०॥
खल पाय धरुं पाहे; सुमति म्हणे, ' कासया नति, सरा हो ! ।
परि पात्र निजरहस्या भ्राता वा दास या न तिसरा हो ' ॥४१॥
तें वाटे त्या हालापानाद्यतिपातकायना सत्य, ।
मग मनिं ह्नणे, ' पित्याचा पाहतसे हात काय नासत्य ' ॥४२॥
त्या शून्यनृत्यशालाशयनी सांजेचि गुप्त भीम निजे, ।
जागति ते स्वाकारें भुजगांच्या नित्य देति भी मनि जे ॥४३॥
' आलों तुज भेटाया घेउनि सर्वस्व हें उपायन, हो !  ।
प्रमदे ! त्वत्प्राप्तीस्तव बहु केला विफल हा उपाय न हो ' ॥४४॥
हळुच ह्नणे भीम, ' तुह्मी सुमहागुणनंदनदीप, काशाला ।
दीप ? प्रकाशली की पावुनियां वदनदीपका शाला ॥४५॥
तुमचें लोकांत, अहो ! कीचक ! सामान्य काय हो ! शील ?
परि तूं वरटेसि करट नीच कसा मान्यकाय होशील ? ॥४६॥
धरितोसि जीविताशा तूं गरलप मंद नीच काशाला ? ।
त्वद्रक्तकर्दमें ही आतांचि भरेल कीचका ! शाला ' ॥४७॥
ऐसें बोलुनियां धृतखलगल वलजलंधि तो भला बुकली, ।
पावेल जय कसा प्रभुसेतुसवें करिल जो अलाबु कली ? ॥४८॥
प्राणा मुकेल इच्छुनि सिंहीचे गजहि सबहुमान मुके, ।
कां न मुके कोल्हा ? कां छी ह्नणतिल त्या जनाधमा न मुके ? ॥४९॥
जातां भीम ह्नणे, ' गे ! अपराध तुझा करुनि पर मेला; ।
वंचिल नीच कीचक कैसा लावूनि पाय परमेला ? ' ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP