माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई .
२३ . ( १ ) माणसांचा अपव्यापार आणि बिगार व त्यासारख्या अन्य स्वरुपातील वेठबिगारीस मनाई करण्यात आली आहे आणि या तरतुदींचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल .
( २ ) सार्वजनिक प्रयोजनाकरता सेवा करायला लावण्यास राज्याला या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही व अशी सेवा करावयास लावताना केवळ धर्म , वंश , जात वा वर्ग या अथवा यांपैकी कोणत्याही कारणावरुन राज्य , कोणताही भेदभाव करणार नाही .
कारखाने , इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई .
२४ . चौदा वर्षे वयाखालील कोणत्याही बालकास , कोणत्याही कारखान्यात वा खाणीत काम करण्यासाठी नोकरीत ठेवले जाणार नाही अथवा अन्य कोणत्याही धोक्याच्या कामावर त्यास लावले जाणार नाही .