अनूसूचित क्षेत्रे व जनजाति क्षेत्रे - कलम २४४
भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.
अनुसूचित क्षेत्रे व जनजाति क्षेत्रे यांचे प्रशासन. २४४.
(१) पाचव्या अनुसूचीच्या तरतुदी [आसाम. [मेघालय. त्रिपुरा व मिझोरम] ही राज्ये] वगळता. अन्य कोणत्याही राज्यातील अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जनजाती यांचे प्रशासन व नियंत्रण यांच्या बाबतीत लागू असतील.
(२) सहाव्या अनुसूचीच्या तरतुदी [आसाम. [मेघालय. त्रिपुरा] व मिझोरम] या राज्यांतील] जनजाति क्षेत्रांच्या प्रशासनाव्या बाबतीत लागू असतील.
आसाममधील विवक्षित जनजाति क्षेत्रे समाविष्ट असलेले स्वायत्त राज्य बनवणे आणि त्याकरता स्थानिक विधानमंडळाची किंवा मंत्रिपरिषदेची किंवा दोन्हींची निर्मिती. २४४क.
(१) या संविधानात काहीही असले तरी, संसदेला कायद्याद्वारे आसाम राज्यात. सहाव्य अनुसूचीतील २० व्या परिच्छेदासोबत जोडलेल्या तक्त्यातील [भाग एक] यामध्ये विनिर्दिष्ट केलेली सर्व किंवा त्यांपैकी कोणतीही जनजाति क्षेत्रे (संपूर्णत: किंवा अंशत:) समाविष्ट असलेले स्वायत्त राज्य बनवता येईल आणि त्याकरता---
(क) त्या स्वायत्त राज्याचे विधानमंडळ म्हणून कार्य करणारा एक निकाय-मग तो निवडून द्यावयाचा असो किंवा अंशत: नामनिर्देशित करावयाचा व अंशत: निवडून द्यावयाचा असो-किंवा
(ख) एक मंत्रिपरिषद.
किंवा दोन्ही निर्मिता येतील व प्रत्येक बाबतील. कायद्यामध्ये विनिर्दिष्ट केली जाईल अशी त्यांची घटना. अधिकार व कार्ये राहतील.
(२) खंड (१) मध्ये निर्देशिलेल्या अशा कोणत्याही कायद्याद्वारे. विशेषत:---
(क) राज्य सूचीत किंवा समवर्ति सूचीत नमूद केलेल्यांपैकी कोणत्या बाबींसंबंधी स्वायत्त राज्याच्या विधानमंडळास. त्याच्या संपूर्ण किंवा कोणत्याही भागाकरता कायदे करण्याचा अधिकार असेल ते विनिर्दिष्ट करता येईल-मग तो अधिकार आसाम राज्याच्या विधानमंडळास वगळून असो किंवा अन्यथा असो:
(ख) स्वायत्त राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत कोणत्या बाबी येतील ते निश्चित करता येईल;
(ग) आसाम राज्याने बसवलेल्या कोणत्याही कराचे उत्पन्न स्वायत्त राज्याकडून प्राप्त झाल्याचे मानता येईल तेथवर. ते त्या स्वायत्त राज्यास नेमून दिले जावे. अशी तरतूद करता येईल;
(घ) या संविधानाच्या कोणत्याही अनुच्छेदातील राज्यासंबंधीच्या कोणत्याही निर्देशामध्ये. त्या स्वायत्त राज्यासंबंधीच्या निर्देशाचा समावेश आहे. असा त्याचा अर्थ लावला जावा. अशी तरतूद करता येईल; आणि
(ड) जरूर वाटतील अशा पूरक. आनुषंगिक व परिणामस्वरूप तरतुदी करता येतील.
(३) पूर्वोक्त्त अशा कोणत्याही कायद्याची सुधारणा ही. खंड (२) च्या उपखंड (क) किंवा उपखंड (ख) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्यांपैकी कोणत्याही बाबींशी संबंधित असेल तेथवर. ती संसदेच्या प्रत्येक सभागृहात उपस्थित असलेल्या व मतदान करणार्या सदस्यांपैकी किमान दोन-तृतीयांश इतक्या सदस्यांनी पारित केल्याशिवाय. प्रभावी होणार नाही.
(४) या अनुच्छेदात निर्देशिलेल्या अशा कोणत्याही कायद्यात. या संविधानात जी सुधारणा करते किंवा जीमुळे परिणामी या संविधानात सुधारणा होते अशी कोणतीही तरतूद अंतर्भूत असली तरीही. तो कायदा. अनुच्छेद ३६८ च्या प्रयोजनांकरता. या संविधानातील सुधारणा असल्याचे मानले जाणार नाही.]
N/A
References : N/A
Last Updated : January 12, 2013
TOP