लक्ष्मी - सरस्वती - पूजनाचे तीन प्रकार आहेत . भाद्रपद शुक्ल पक्षांत , आश्विन शुक्ल पक्षांत आणि कृष्ण अमावस्येस . ह्या तीन प्रकारांपैकी पहिले दोन्ही प्रकर प्रत्येक घरी होतच असतात . परंतु तिसर्या प्रकारचे जे लक्ष्मीपूजन ते फक्त " व्यापारे वसते लक्ष्मीः " या न्यायाने व्यापारीवर्गच आपल्या दुकानात , पेढीत , ऑफिसांत वगैरे सार्वजनिक उत्सवपद्धतीने करीत असतो . तेव्हा हीच पूजापद्धति येथे दिली आहे . ज्यांना अशी पूजा करावयाची असेल त्यांनी पुढे दिलेल्याप्रमाणे पूर्वतयारी ठेवावी . प्रथम आपल्या दुकानांत , पेढींत रंग वगैरे लावून साफसफाई करावी . शक्य असेल त्याप्रमाणे फुलांच्या माळा , तोरणे , ध्वज , पताका , आम्रपल्लव , केळीचे खांब इत्यादि प्रकारांनी शोभा आणावी . बाहेरगांवी असलेले आपले व्यवसायबांधव ( व्यापारी , शेट , सावकार ) यांना व आप्तईष्टांना उत्सव समारंभास येण्याविषयी आमंत्रण पत्रिका पाठवाव्या . सरस्वतीपूजनाकरितां स्वतःच्या पद्धतीप्रमाणे जमाखर्चाच्या वह्या , बुके तयार करुन त्या सर्वांवर , निदान खतावणी व रोजकीर्द या दोन बुकांवर आरंभी तांबडे कुंकू लावून त्या गंधाने स्वस्तिक चिन्ह काढून त्यापुढे शाईने शक , संवत् , इसवीसन , वार , नक्षत्र इत्यादि कार्तिक शुक्ल प्रतिपदेची तिथी पंचांगांत पाहून लिहावी आणि शेवटी तांबडया गंधाने " शुभमस्तु " असे लिहावे . शाईच्या दौती , लेखण्या किंवा टाक स्वच्छ नव्या असाव्या . गोडे तेलवात घातलेला समईतील दिवा असावा , पूजेकरितां स्वच्छ उदकाने भरलेले तांब्याचे किंवा चांदीचे दोन कलश , पंचपात्री , ताम्हण , संध्येची पळी , तांदूळं २ शेर , नारळ २ , सुपार्या २० , विडयाची पाने , फळफळावळ , हळदकुंकू , अष्टगंध , गुलाल , बुक्का , जिरे , गूळ , फुले , तुलसी , दुर्वा , आम्रपल्लव , उदबती , कापूर , वाती , फुलवाती , नाडापुडी , नैवेद्याकरिता बत्तासे , पेढे वगैरे . एक कोरा पंचा , चोळखण , दक्षिणेसाठी कांही नाणी याप्रमाणे सर्व साहित्याची तयारी करुन आश्विन कृष्ण अमावस्या , किंवा कार्तिक शुक्ल प्रतिपदा जसा स्वतःचा प्रघात चालू असेल त्या दिवशी सायंकाळी निशामुखसमयी दुकानांत दिव्यांची रोषणाई करुन मुख्य मालकाने शुचिर्भूत होऊन पूजेस आरंभ करावा . दुकानांत गाद्या , तक्के , लोड वगैरे घालून बिछायत करावी .
लक्ष्मीसरस्वतीपूजा : -
दोनवेळा आचमन करुन श्रीमन्महागणाधिप ०
येथपासून
समस्ताभ्युदयार्थंच
येथपर्यंत देशकालाचा उच्चार करावा आणि
प्रतिवार्षिकविहितं श्रीमहालक्ष्मीप्रीत्यर्थं सर्वारिष्टनिवृत्तिपूर्वकं सर्वाभीष्ट फलप्राप्तर्थं व्यापारे लाभार्थंच गणपती , नवग्रह , कलश , पूजनपूर्वकं श्रीमहालक्ष्मी महासरस्वती लेखनी मषीपात्र कुबेरादीनां पूजनं करिष्ये
असा हातात उदक घेऊन संकल्प सोडावा आणि जमिनीला हात लावून
‘ पृथ्वितिमंत्रस्य पासून दातुमर्हसि ॥ वामपादेन भूमिं त्रिस्ताडयेत् ॥
मंत्र म्हणून डावा पाय तीन वेळा भूमीस लावावा . वरील आसनादिकर्म नंतर मांडी घालून
ॐ यत्पुरुषं व्यदधु पासून अस्त्राय फट् इति दिग्बंधः ।
दोन्ही हातांनी षडंगन्यास करुन
‘ कलशस्य मुखे विष्णुः ’
पासून
‘ गंधाक्षतापुष्पं समर्पयामि ’
पर्यंत मंत्रांनी अनुक्रमे कलश , शंख , घंटा , दीप , मंडप यांची गंधपुष्पाक्षतांनी पूजा करावी व
अपवित्रः पवित्रोवा ०
हा मंत्र म्हणून कलशोदकाने पूजासाहित्य प्रोक्षण करावे . आपल्या समोरच बैठकीवर एक पसाभर तांदूळ घालून त्यावर ऊर्ध्वमुख सुपारी ठेवून त्यावर गणपतीचे पूजन करावे . पूजेकरिता गंध व अक्षता तांबडया घ्याव्या .
ॐ गणानांत्वां गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ॥ ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः शृण्वन्नूतिभिः सीदसादनम् ॥ वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ ॥ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ॥
महागणपतयेनमः ध्यानं समर्पयामि ॥ याप्रमाणेच " महागणपतयेनमः " या नाममंत्राने आवाहनं , आसनं , पाद्यं , अर्घ्यं , आचमनं , स्नानं , वस्त्रं , गंध , अक्षता , पुष्पं , हरिद्राकुंकमं , धूप , दीप , नैवेद्यं तांबुलदक्षिणा , नारिकेल फल , दुवांकरान् , महानीरांजन , मंत्रपुष्पं , नमस्कारान्ससमर्पयामि ॥ अथ प्रार्थना ॥
कार्य मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि ॥ विघ्यानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायक ॥
अनना पूजया विघ्नहर्ता महागणपतिः प्रीयतां ॥ अशी ही गणपतीपूजा झाल्यावर त्याच्याच जवळ एक पसाभर तांदूळ पसरुन त्यावर वर्तुळाकृति नऊ सुपार्या ऊर्ध्वमुख मांडून ठेवाव्या आणि त्यावर पुढील मंत्र म्हणून क्रमानें नवग्रहांचे आवाहन करावे . येथे पहिला वेदोक्त व दुसरा पुराणोक्त दोन्ही मंत्र दिले आहेत . इष्ट असेल त्याप्रमाणे एक मंत्र अगर दोन्ही मंत्रांचा उपयोग करावा .
ॐ आकृष्णेनरजसा वर्तमानो निवेशयन्नमृतं मर्त्यंच ॥ हिरण्ययेन सविता रथेना देवोयाति भुवनानि पश्यन् ॥१॥
जपाकुसुमसंकाशं काश्यपेयं महाद्युतिं ॥ तमोरिं सर्व पापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरम् ॥
सूर्याय नमः आवाहनार्थे अक्षतान्समर्पयामि ॥
ॐ आप्यायस्व समेतुते विश्वतः सोमवृष्ण्यं ॥ भवावाज्यस्य संगथे ॥२॥
दधिशंखतुषाराभं क्षीरार्णव समुद्धवं नमामिशशिनं सोमं शंभोर्मुकुटभूषणम् ॥
सोमाय ० आवाहनार्थे अक्षतां ० ॥
ॐ अग्निर्मूर्धादिवः ककुत्पतिः पृथिव्या अयम् ॥ अपांरेतासिजिन्वति ॥३॥
धरणीगर्भसंभूतं विद्युत्कांकि समप्रभं । कुमारं शक्तिहस्तं तं मंगलं प्रणमाम्यहम् ।
भौमाय ० आवा ० अक्षतां ० ॥
ॐ उदबुध्यध्वेंसमनसः सखायः समग्निमिध्वंबहवः सनीळः ॥ दधिक्रामग्निमुषसंच देवीमिंद्रावतो वसेनिव्हयेवः ॥४॥
प्रियंगु कलिकाश्यामं रुपेणाप्रतिमंबुधं ॥ सौम्यं सौम्य गुणोपंत तं बुधं प्रणमाम्यहम् ॥५॥
बुधाय आवा ० अक्षता ० ॥
ॐ बृहस्पते अतिय दर्यो अहीमद्विभाति क्रतुमज्जनेषु । यद्दीदयच्छवस ऋत प्रजाततदस्मा सुह्रविणं धेहि चित्रम् ॥ देवानांच ऋषीणांच गुरुं कांचन संनिभं । बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् ॥
बृहस्पतयेन ० आवा ० अक्षतां , ॥
ॐ शुक्रःशुशुक्चां उषो न जारःप्रप्रासमीचीदिवोनज्योति ॥६॥
हिमकुंदमृणालाभं दैत्यानां परमं गुरुं । सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् ॥
शुक्राय ० आवा ० अक्षतां ०॥
ॐ शमग्निरग्निभिः करःशन्नस्तपतुसूर्यः ॥ शंवतोवात्वर अरस्त्रिधः ॥७॥
निलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं । छाया मार्तंड संभूतं तन्नमामि शनैश्वरम् ॥
शनैश्वराय ० आवा ० अक्षतां ० ॥
ॐ कयानश्चित्राआभूवदूतीसदावृधः सखा । कयाशचिष्ठयावृता ॥८॥
अर्धकायं महावीर्यं चंद्रादित्य विमर्दनं । सिंहिका गर्भसंभूतं तं राहूं प्रणमाम्यहम् ॥
राहवे ० आवा ० अक्षता ० ॥
ॐ केतुं कृण्वन्न केतवे पेशोमंर्याअपेशसे ॥ समुषद्भिरजायथाः ॥९॥
पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रहमस्तकं । रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् ॥
केतवे ० आवा ० अक्षतां ० ॥ याप्रमाणे आवाहन झाल्यावर नाममंत्राने पुढील आसनपाद्यादि सर्व पूजोपचार सुपार्यांवर समर्पण करावे . म्हणजे
" आदित्यादि नवग्रहदेवताभ्योनमः आसनं समर्पयामि ॥ आदित्यादि नवग्रहदेवताभ्योनमः पाद्यं समर्पयामि । "
असे म्हंणून तुलसीपत्राने प्रोक्षणद्वारा पाद्य , अर्ध्यं , आचमनादि सर्व उपचार समर्पण करावे .
अनेन पूजनेन भगवान् आदित्यादि नवग्रहदेवताः प्रीयताम् ॥
अशी नवग्रहपूजा झाल्यावर आपल्या सन्मुख तेथेच बैठकीवर किंवा देव्हारा चौरंग ठेवून लक्ष्मीपूजनार्थ कलश वरुणाची स्थापना करावी . प्रथम दोन्ही हात जोडून
ॐ महीद्यौः पृथिवी च न इमं यज्ञं मिमिक्षतां ॥ पितृतान्नौ भरीमभिः
हा मंत्र म्हणून भूमीची प्रार्थना करावी .
ॐ ओषधयः संवदंते सोमेनसह राज्ञा ॥ यस्मैकृणोति ब्राह्मणस्तं राजन्पारयामसि ॥
हा मंत्र म्हणून एक पसाभर धान्य ( तांदूळ अगर गहूं ) भूमीवर घालावे व त्या धान्यावर
ॐ आकलशेषु धावति पवित्रे परिषिच्यते ॥ उक्थैर्यज्ञेषुवर्धते ॥
हा मंत्र म्हणून कलश ठेवावा . त्या कलशामध्ये
ॐ इमं मे गंगे यमुनेसरस्वती शुतुद्रिस्तोमं सचता परुष्णया ॥ असिक्न्यमरुद्बृधे विसस्तयार्जीकीये श्रुणुह्यासुषोमया ॥ ह्या मंत्राने कलशांत उदक घालावे .
ॐ गंधद्वारां दुराधर्षान्नित्यपुष्टां करीषिणीम् ॥ ईश्वरी सर्व भूतानां तामि होपव्हयेश्रियम् ॥
गंधं समर्पयामि ॥
ॐ अश्वत्थेवोनिषदनं पर्णेवोवसतिष्कृता । गोभाजईत्किलासथ यत्सनवथ पुरुषम् ॥
कलशावर पांच पानांचा आंब्याचा टाळ ठेवावा .
ॐ काण्डात्काण्डात्प्ररोहन्ति परुषः परुषः परि । एवानो दूर्वे प्रतनुसहस्त्रेणशतेनच ॥
कलशांतील उदकांत दोन दूर्वा घालाव्या .
ॐ या फलिनीर्या अफला अपुष्पायाश्च पुष्पिणीः बृहस्पतिप्रसूतास्नानो - मुंचंत्वहंसः ॥
कलशांत दोन सुपार्या घालाव्या .
ॐ सहिरत्नानि दाशुषे सुवाति सविताभगः ॥ तंभागंचिमीमहे ॥ ॐ हिरण्यरुपः सहिरण्यसंदृगपां नपात्सेदु हिरण्यवर्णः ॥ ॐ हिरण्ययात्परियोर्निषद्या - हिरण्यदादददयं नमस्मै ॥
कलशांत रत्न ( अथवा चांदीचे नाण्यांपैकी , चवली पावली , अधेली रुपया यांतून शक्तीप्रमाणे ) घालावे .
ॐ युवासुवासाः परिवीत आगात्स उश्रेयान्भवतिजायमानः ॥ तंधीरासः परिवीत आगात्स उश्रेयान्भवतिजायमानः तंधीरामः कवय उन्नयंति स्वाध्यो ३ मनसा देवयंतः ॥
कलशांत फुले , तुळशी , अक्षता घालावी .
ॐ पूर्णा दर्विपरापत सुपूर्णा पुनरापत ॥ वस्नेवविक्रीणावहा इषमूर्जं शतक्रतो ॥
हा मंत्र म्हणून एका लहानशा ताम्हणांत तांदूळ भरुन कुंकवाने स्वस्तिक काढून ते त्या कलशावर आम्रपल्लवाच्यामधोमध ठेवावे . त्यावर एक नारळ ठेवावा .
ॐ तत्त्वायामि ब्रह्मणावंदमानस्तदाशास्ते यजमानोहविर्भिः अहेळ मानो वरुणेह बोध्यरुशंसमान आयुः प्रमोषीः ॥ वरुणं सांगं सपरिवार , सायुधं , सशक्तिकं , आवाहयामि ॥ वरुणायनमः सकलपूजार्थे गंधाक्षता पुष्पं समर्पयामि ॥
हात जोडून कलशाची प्रार्थना करावी .
देवदानव संवादे मध्यमाने महादधौ । उत्पन्नोसि तदा कुंभ विधृतो विष्णुना स्वयम् ॥ त्वत्तोये सर्वतीर्थानि देवाः सर्वे त्वयि स्थिताः । त्वयि तिष्ठंति भूतामि त्वयि प्राणाः प्रतिष्ठिताः ॥ शिवःम् ( स्वयम् ) त्वमेवासि विष्णुस्त्वंच प्रजापतिः । आदित्यावसवोरुद्रा विश्वे देवाः सपैतृकाः ॥ त्वयि तिष्ठंति सर्वेपि यतः कामफलप्रदाः । त्वत्प्रसादादिमं यज्ञं कर्तुमीहे जलोद्भव । सान्निध्यं कुरु मे देव प्रसन्नो भव सर्वदा ॥
याप्रमाणे कलश स्थापन झाल्यावर त्याच्या जवळच जमाखर्चाच्या वह्या , बुके , उघडून ठेवावी . दौत , लेखणी , तराजू वगैरे ठेवावे , आणि मुख्य लक्ष्मीसरस्वतीच्या पूजनास प्रारंभ करावा . लक्ष्मीपूजनासाठी एक सुवर्णमुद्रिका घ्यावी . लक्ष्मिध्यानं -
ॐ सक्तुमिवतित उनापुनंतो यत्रधीरामनसावाचमक्रत ॥ अत्रासखायः सख्यानिजानते भद्रैषां लक्ष्मीर्निहिताधिवाचि ॥१॥
या सा पद्मासनस्था विपुलकटितटी पद्मपत्रायताक्षी , गंभीरावर्तनाभिः स्तनभरमिता शुभ्रवस्त्रोत्तरीया ॥ या लक्ष्मीर्दिव्यरुपा मणिगणखचितैः स्नापिता हेमकुंभैः , सा नित्यं पद्महस्ता मम वसतु गृहे सर्व मांगल्य - युक्ता ॥ सरस्वतीध्यानं ० ॥ ॐ प्रणोदेवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती धीनामवित्र्यवतु ॥ यस्त्वा देवि सरस्वति त्युपक्रते धनेहिते ॥ इंद्रन्नवृत्रतूर्ये ॥ नमस्ते शारदे देवि काश्मीरपुरवासिनी । त्वामहं प्रार्थयिष्यामि विद्यादानं च देहि मे ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतिभ्यां नमः ध्यानं समर्पयामि ॥
सर्व लोकस्य जननी शूलहस्तां त्रिलोचनां । सर्व देवमयीमीशां देवीमावाहयाम्यहम् ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां आवाहनार्थे अक्षतां स ० ॥
तप्तकांचनवर्णाभूं मुक्तामणिविराजितं । अमलं कमलं दिव्यमानसं प्रतिगृह्यतां ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां ० आसनार्थे अक्षतां ० ॥
गंगादितीर्थसंभूतं गंधपुष्पाक्षतैर्युतम् । पाद्यं ददाम्यहं देवि गृहाणाशुनमोस्तुते ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां ० पाद्यं ० ॥
अष्टगंधसमायुक्तंस्वर्णपात्र प्रपूरितम् । अर्घ्यं गृहाण मद्दतं महालक्ष्यै नमोऽस्तुते ॥
श्रीमहालक्ष्मी सरस्वतीभ्यां ० अर्घ्यं ॥
सर्वलोकस्य या शक्तिर्ब्रह्मा विष्णुवादिभिःस्तुता । ददाम्याचमनं तस्यै महाकाल्यै मनोहरम् ॥
श्रीमहालक्ष्मी सरस्वतीभ्यां ० आचमनं ० ॥
पंचामृतसमायुक्तं जान्हवी सलिलं शुभं । गृहाण विश्वजननि स्नानार्थं भक्तवत्सले ॥
श्रीमहालक्ष्मी सरस्वरतिभ्यां ० पंचामृतादि शुद्धोदकस्नानं ० ॥ ( सवड असल्यास या ठिकाणी श्रीसूक्त म्हणून अभिषेक स्नान घालावे . स्नानानंतर मुद्रिका स्वच्छ पुसून कलशावर स्थापन केलेल्या पूर्णपात्रात ठेवून पुढचे उपचार करावे . )
दिव्यांबरं नूतनं ही क्षौमं त्वतिमनोहरम् दीयमानं मया देवि गृहाण जगदंबिके ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतिभ्यां ० वस्त्रयुग्मं ॥ ( येथे कलशाभोवती पंचा गुंडाळावा व कलशावरील पूर्णपात्रांत चोळखण ठेवावा . )
रत्नकंकण वैडूर्य मुक्ताहारादिकानि च । सुप्रसन्नेन मनसा दत्तानि स्वीकुरुष्व भो ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वति ० भरणानि
श्रीखंडागरु कर्पूरमृगनाभि समन्वितं । विलेपनं गृहाणाशु नमोऽस्तु भक्तवत्सले ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतिभ्यां ० चंदनं ० ॥
रक्तचंदनं संमिक्षं पारिजात समुद्धवं । मयादत्तंगृहाणाशु चंदनं गंधसंयुतम् ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतिभ्यां ० रक्तचंदनं ० ॥ सिंदुरं रक्तवर्णंच सिंदूरतिलकप्रिये ॥ भक्त्या दत्तंमया देवि सिंदूरं प्रतिगृह्यताम् ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतिभ्यां ० सिंदूरं ० ॥
कुंकुमं कामदं दिव्यं कुंकमं कामरुपिणम् । अखंड कामसौभाग्यं कुंकमं प्रतिगृह्यताम् ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतिभ्यां ० हरिद्राकुंकमं ० ॥
तैलानिच सुगंधीनि द्रव्याणि विविधानिच । मया दत्तंविलेपार्थं गृहाण परमेश्वरी ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतिभ्यां ० न ० सुवासिक परिमलद्र्व्यं ० ॥ ( देवावर वह्या - पुस्तकांवर , गुलाल , बुक्का , अष्टगंध , अत्तर घालावे . )
मंदारपारिजातादीन्याटली केतकी तथा । मरुवा मोगरं चैव गृहाणाशु नमोस्तुते ॥
श्रीमहालक्ष्मी ० सरस्वतिभ्यां ० नानाविधपुष्पाणि ० ॥ विष्णवादि सर्व देवानां प्रियां सर्व सुशोभनाम् । क्षीरसागरसंभूतं दूर्वास्वीकुरुसर्वदा ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतिभ्यां ० पुष्पमालां ० ॥
अथडपूजा - पुढील नाममंत्राने देवावर अक्षता घालून अंगपूजा करावी .
ॐ चपलायै ० नमः पादौ पूजयामि । चंचलायै न ० जानुनीपू । कमलायै न ० कटिं पू ० । कात्यायन्यै न ० नाभिं पू । जगन्मात्रेन ० जठरं पू ० विश्ववल्लभायै न ० वक्षस्थलं पू ० कमलावासिन्यै ० नेत्रत्रयं पू ० । श्रियैन ० शिरः पू ० ।
कलशासभोवती पूर्वादि आठही दिशेला अष्टसिद्धिचे व अष्टलक्ष्मीचे नाममंत्राने अक्षता टाकून पूजन करावे .
ॐ अणिम्ने नमः ॐ महिम्ने नमः ॐ गरिम्णे नमः ॐ लघिम्ने नमः ॐ प्राप्त्यै नमः ॐ प्राकाम्यायै नमः ॐ ईशितायै नमः ॐ वशितायै नमः ॥८॥
ॐ आद्यलक्ष्म्यै नमः ॐ विद्यालक्ष्म्यै नमः ॐ सौभाग्यलक्ष्म्यै नमः ॐ अमृतलक्ष्म्यै नमः ॐ कामलक्ष्म्यै नमः ॐ सत्यलक्ष्म्यै नमः ॐ भोगलक्ष्म्यै नमः ॐ योगलक्ष्म्यै नमः ॥९॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतिभ्यां ० सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥
वनस्पति रसोद्भूतो गंधाढयः सुमनोहरः । आघ्रेयः सर्व देवानां धूपोयं प्रतिगृह्यताम् ।
श्रीमहालक्ष्मीसरस्वतिभ्यां धूपं स ० ॥
कर्पूरवर्ति संयुक्तं घृतयुक्तं मनोहरम् । तमोनाशकरं दीपं गृहाण परमेश्वरि ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतिभ्यां ० एकार्तिक्यदीपं स ० ॥
नैवेद्यं गृह्यतां देवि भक्ष्य भोज्य समन्वितम् । षडसैरन्वितं दिव्यं लक्ष्मि देवि नमोस्तुते ॥
नैवेद्यावर तुलसीपत्राने उदक प्रोक्षण करुन " प्राणायस्वाहा , अपानाय ० व्यानाय ० उदानाय ० समानाय ० ब्रह्मणेस्वाहा " ह्या नाममंत्राणे समर्पण करावा .
शीतलं निर्मलं तोयं कर्पूरेण सुवासितं । आचम्यतां मम जलं प्रसीद त्वं महेश्वरी ॥
श्रीमहालक्ष्मीसहस्वतिभ्यां ० आचमनीय स ० करद्वार्तनार्थे चंदनं ० ॥
एलालवंगकर्पूर नागपत्रादिभिर्युतम् । पूगीफलेन संयुक्तं तांबुलं प्रतिगृह्यताम् ॥ महालक्ष्मीसर ० तांबूलं स ० हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः । अनंतपुण्य फलद मनःशांतिप्रयच्छ मे ॥
श्रीमहालक्ष्मीसर ० नानाविध फलानि स ० ॥
( केळी , खारीक , बदाम , डाळिंब , संत्रे , मोसंबी , सफरचंद , पेरु , अंजीर , द्राक्षे , सीताफळ , रामफळ इत्यादि फळांपैकी शक्य असतील तितकी मिळवून देवीजवळ ठेवावी . )
चक्षुर्दं सर्व लोकानां तिमिरस्य निवारणं । अर्तिक्यं कल्पितं भक्त्या गृहाण परमेश्वरी ॥
( देवी़ची आरती म्हणावी . ) कर्पूरार्ती करावी .
ह्रतज्ञान तमोनाशक्षमंभक्त्या समर्पितं कर्पूरं दीपममलं गृहाण परमेश्वरी ॥
श्रीमहालक्ष्मीसर ० महामंगलर्तिक्यं स ० ॥
केतकीजाति - कुसुमैर्मल्लिकामालती भवैः । पुष्पांजलिर्मयादत्तं स्तवप्रीत्यैनमोस्तुते ॥
( येथे सवड असेल तर ॐ यज्ञेन यज्ञ ....... पासून सहस्त्रकोटी युगधारिणे नमः ॥ पर्यंत हे मंत्रपुष्प म्हणावे . ) श्रीमहालक्ष्मीसह ० मंत्रपुष्पांजली स ० ॥
यानिकानिच पापानि ब्रह्महत्या समानि च । तानि तानि विनश्यंति प्रदक्षिण पदेपदे ॥
( प्रदक्षिणा घालावी ) श्रीमहालक्ष्मीसर ० प्रदक्षिणानमस्कारान् स ० ॥ छत्रं ० चामरं ० गीतं ० नृत्यं ० वाद्यं ० आंदोलनं ० सर्वे राजोपचारार्थे अक्षतां समर्पयामि ॥
( येथपर्यंत ही लक्ष्मीची , सरस्वतीची पूजा झाल्यावर दौत , लेखणी , कुबेर वगैरेंना गंधफूल अक्षता वाहून पूजा करावी . )
दौतीची पूजा : -
( मषीपात्र ) - हात जोडून ध्यानाचा श्लोक म्हणावा .
सद्यच्छिन्नशिरः कृपाणमभयं हस्तैर्वरं बिभ्रतीं , घोरास्यां शिरसास्त्रजं सुरुचिरामुन्मुक्त केशावलिम् ॥ सृक्काऽसृक्प्रवहांश्मशान निलयां श्रुत्योः शवालं कृतिं , श्यामांगी छतमेखलां शवकरैर्देवी भजे कालिकाम् ॥१॥
मषि त्वं लेखनी युक्ता चित्रगुप्त गृहस्थिता । सदक्षराणां पत्रे च लेख्यं कुरु सदा मम ॥२॥
या माया प्रकृतिः शक्ति - श्चंडमुंडविमर्दिनी । सा पूज्या सर्व देवैश्च अस्माकं वरदा भव ॥३॥
महाकाल्यै नमः ध्यानं समर्पयामि ॥ महाकाल्यैन ० आवाहनार्थे अक्षतान् स ० । ( पुढील नाममंत्राने दौतीवर अक्षता घालाव्या . )
ॐ काल्यैनमः ॐ कपालिन्यै ० ॐ फुल्लायै ० ॐ कुरुकुलायै ० ॐ विरोधिन्यै ० ॐ विप्रचितायै ० ॐ उग्रप्रदत्तायै ० ॐ दिव्यायै ० ॐ नीलायै ० ॐ घनायै न ० ॐ बलकायै ० ॐ मात्रायै ० ॐ मुद्रायै नमः ॥
महाकाल्यै नमः सकल पूजार्थे गंधाक्षत पत्रपुष्पं हरिद्राकुंकमं समर्पयामि ॥ असे म्हणून दौतीला गंध , पुष्प , हळद , कुंकू वाहून हात जोडून प्रार्थना करावी .
या कालिका रोगहरा सुवंद्या वेश्यानुकूलैर्मदनातुरेश्च जनैर्जनानां भयह्रिणी च सा देवमाता मयि सौख्यदात्री ॥
लेखनीपूजा : -
शुक्लां ब्रह्मविचार सार परमा माद्यां जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीमभयदां जाडयांधकारापहाम् ॥ हस्तेस्फटिक मालिकां विदधती पद्मासने संस्थिता वंदे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदाम् ॥१॥
कृष्णानने द्विजिह्वे च चित्रगुप्त करस्थिते । सदक्षराणां पत्रेच लेख्यं कुरु सदा मम ॥२॥
लेखन्यै नमः ध्यानसमर्पयामि । वीणापुस्तकधारिण्यै नमः सकलपूजार्थे गंधाक्षतपत्र - पुष्पं हरिद्राकुंकुमं समर्पयामि ॥ असे म्हणून लेखणीला गंध , पुष्प , हळद , कुंकू घालावे . ( पुढील नाममंत्राने लेखणीवर अक्षता घालाव्या . )
ॐ वाचित्त्यै नमः ॐ वाग्वादिन्यैन ० ॐ अजितायैन ० ॐ विष्णुमायायैन ० ॐ हिंगलायैन ० ॐ यज्ञविद्यायैन ० ॐ सिद्धविद्यायै ० ॐ प्रज्ञायै ० ॐ पद्मावत्यै ० ॐ भुवनेश्वर्यैनमः ॥ लेखन्यैनमः सरस्वत्यैन ० ब्रह्मण्यैन ० भारत्यैन ० गिरेन ० वाचेन ० वाण्यैन ० हंसगमनायै ० पद्महस्तायै ० शारदायैनमः ॥
याप्रमाणे अक्षता घालून झाल्यावर हात जोडून प्रार्थना करावी .
तरुणशकलमिंदोर्बिभ्रती शुभ्रकांतीः कुचभर नमितांगी सन्निषष्णा सिताब्जे । निजकरकमलोद्यल्लेखनी पुस्तकश्रीः सकलविभवसिध्यै पातुवाग्वदेवता नमः ॥
एका ताम्हणांत किंवा ताटांत चांदीसोन्याची नाणी भरुन त्यांचेवर कुबेरपूजा करावी .
कुबेरपूजा : -
ॐ धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च । भवंतु त्वत्प्रसादान्मे धनदान्यादि संपदः ॥
द्रव्यनिधिस्थान कुबेरायनमः ध्यानावाहनादि सकलपूजार्थ , गंधाक्षतपत्रपुष्प हरिद्राकुंकम समर्पयामि ॥ असे म्हणून , गंध , अक्षता , फुले , तुलसी , हळदीकुंकू घालून नमस्कार करावा .
तुलापूजा : -
नमस्ते सर्व देवानां शक्तित्वे सत्यमाश्रिता । साक्षिभूता जगद्धात्री निर्मिता विश्वयोनिना ॥
तुलायैनमः सकलपूजार्थे गंधाक्षत पत्रपुष्पं हरिद्राकुंकमं समर्पयामि असे म्हणून तुलेला ( तराजू ) गंध , फूल , हळदकुंकू घालून नमस्कार करावा .
दीपपूजा : -
भोदीप ब्रह्मरुप त्वं अंधकारनिवारक । इमां मया कृतां पूजां गृहाण तेजः प्रवर्धय ॥ दीपावलीं मया दत्तां गृहाण त्वं सुरेश्वरि । आरार्तिक प्रदानेन ज्ञानदृष्टिप्रदा भव ॥ अग्निज्योति रविज्योतिश्चंद्रज्योतिस्तथैव च । उत्तमः सर्वतेजस्तु जीवोऽयंप्रतिगृह्यनाम् ॥
दीपावल्यैनमः सकलपूजार्थे गंधाक्षतपत्रपुष्पं हरिद्राकुंकम समर्पयामि ॥ दिवे लावून रोषणाई केला असेल त्याला गंध , पुष्प घालून नमस्कार करावा . याप्रमाणे सर्व पूजा आटपल्यावर उठून उभे राहून हात जोडून लक्ष्मीसरस्वतीची पुढील श्लोक म्हणून प्रार्थना करावी .
नमस्ते सर्व देवानां वरदासि हरिप्रिये । गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात्त्वदर्चनात् ॥ विश्वरुपस्य भार्यासि पद्मे पद्मालये शुभे । महालक्ष्मि नमस्तुभ्यं सुखरात्रिं कुरुष्व मे ॥ वर्षेकाले महाघोरे यन्मया दुष्कृतं कृतं । सुखरात्रिः प्रभातेऽद्यतन्मेऽलक्ष्मीर्व्यपोहतु ॥ या रात्रिः सर्वभूतानां याच देवेष्वस्थिता । संवत्सरप्रिया याच सा ममास्तु सुमंगला ॥ माता त्वं सर्वभूतानां देवानां सृष्टिसंभवा । आख्याता भूतले देवि सुख रात्रि नमोस्तुते ॥ दामोदर नमोस्तेस्तु नमस्त्रैलोक्य मातृके । नमस्तेस्तु महालक्ष्मि त्राहि मां परमेश्वरी । शंखचक्र गदा हस्ते शुभ्रवर्णे शुभानने । मम इष्ट वरं देहि सर्वसिद्धिप्रदायिनि ॥ नमस्तेस्तु महालक्ष्मि महासौख्यप्रदायिनि । सर्वदा देहि मे द्र्व्यं दानाय मुक्तिहेतवे ॥ धनं धान्य घरां हर्षं कीर्तिमायुर्यशः श्रियः तुरगान्दंतिनः पुत्रान्महालक्ष्मि प्रयच्छ मे ॥ यन्मया वांछितं देवि तत्सर्वसफलं कुरु । न बाध्यतां कुकर्माणि संकटान्मे निवारय ॥ न्यूनं वाव्यतुलं वापियन्मया मोहितं कृतम् । सर्वं तदस्तु संपूर्णं त्वत्प्रसादान्महेश्वरी ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वत्यादि आवाहित देवताभ्योनमः प्रार्थनां समर्पयामि ॥
" यस्यस्मृत्याच नामोक्त्या ० "
हे मंत्र म्हणून " अनेन ध्यानवाहनादि षोडशोपचार पूजेन भगवान् श्रीमहालक्ष्मीसरस्वत्यादि देवताः प्रीयताम् न मम । तत्सत् श्रीकृष्णर्पणमस्तु । "
याप्रमाणे पूजासमाप्तीचे उदक सोडून ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी . सर्वाना प्रसाद , पानसुपारी , अत्तर , गुलाब द्यावा . शक्य असल्यास त्या रात्री जागर करुन गायन , वादन वगैरे करमणूक करावी . दुसरे दिवशी पहाटेला देवावर गंधफूल , हळदकुंकू घालून पंचोपचार पूजा करावी . कापूर पेटवून आरती करावी . नारळ फोडावा आणि यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय मामकीम् । इष्टकाम प्रसिध्यर्थं पुनरागमनायच ॥
हा मंत्र म्हणून देवावर अक्षता टाकून विसर्जन करावे .