वास्तुशांती - नांदीश्राद्ध

वास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.

While entering a new house, as per the Vedic tradition, a Vastushanti homam (shanti) is performed, this acts as a remedy for whatever malific influences are present in the house and removes the vastu.


कर्त्याच्या पत्नीलातूर्त विश्रांती.

कर्त्याने दर्भाचे पवित्रक काढून ठेवावे. दूर्वांचे पवित्रक धारण करावे. दोनही ताम्हने रिकामी करुन घ्यावी.

पंचपात्री ( फुलपात्र ) पाण्याने भरुन घ्यावी.

कर्त्याचे आई / वडील किंवा दोघेही तसेच मातामह / मातामही ( आईचे वडील / आईची आई ) हे सर्वजण ह्यात असतील तर, प्रत्येक वेळी कर्त्याने पितुः असे म्हणून पाणी वगैरे सोडावे. आई / वडील / आईचे, वडील व आई या पैकी एकादी व्यक्तीच हयात असेल तर प्रत्येक वेळी पुढीलप्रमाणे म्हणावे. व नमस्कार करावा.

मातृभ्यो नमः । पितृभ्यो नमः ।
मातामहादिसपत्नीकेभ्यो नमः ।

हे सर्व कार्य सव्य ह्या स्थितीतच करावयाचे आहे. देवांसाठी प्रत्येक वेळी उजव्या हाताकडील ताम्हनात समोर उदक सोडावयाचे आहे तसेच पितरांना उद्देशून पाणी वगैरे सोडताना डाव्या हाताकडील ताम्हनात समोर पाणी सोडावयाचे आहे.

कर्त्याने आपली दर्भ पवित्रके समोरच्या पाटावर काढून ठेवावीत. उजव्याहातात करंगळी व मधले बोट यामध्ये दूर्वा घट्ट धरुन ठेवाव्या किंवा दूर्वांचे पवित्रक धारण करावे.

( कार्यपरत्वे नांदीश्राद्धीयदेवता वेगळया वेगळया असतात. ) या कर्यात ज्या देवता आहेत, त्यांचा उल्लेख आहे.

उजवीकडे ( ताम्हनात ) पाणी सोडावे.

सत्यवसुसंज्ञकाविश्वेदेवानांदीमुखाः भूर्भुवः सुवः इदंवः पाद्यंस्वाहानम इयंचवृद्धिः ॥

यानंतर पुढील सूचना मिळेपर्यंत डावीकडील ताम्हनात समोर पाणी सोडावे. आई हयात नसेल, तर उदक सोडावे. आई हयात असेल तर नमस्कार करावा.

मातृपितामहीप्रपितामह्यः नांदीमुख्यः भूर्भुवः सुवः इदंवः पाद्यंस्वाहानम इयंचवृद्धिः ॥

वडील हयात असतील तर - " पितृभ्यो नमः " असे म्हणून नमस्कार करावा. वडील हयात नसतील तर वडीलांचे स्मरण करुन उदक सोडावे -

पितृपितामहप्रपितामहाः नांदीमुखाः भूर्भुवः सुवः इदंवः पाद्यंस्वाहानम इयंचवृद्धिः ॥

आईचे वडील व आई इत्यादींचे स्मरण करुन उदक सोडावे.

आईचे वडील व आई हयात असतील तर " मातामहादिसपत्नीकेभ्यो नमः " असे म्हणून नमस्कार करावा.

मातामहमातुः पितामहमातुः प्रपितामहाः पत्नीसहितानांदीमुखाः भूर्भुवः सुवः इदंवः पाद्यंस्वाहानम इयंचवृद्धिः ॥

उजवीकडील ताम्हनात उदक सोडावे.

गंध, अक्षता व फूल घेऊन समोर पाणी सोडावे.

सत्यवसुसंज्ञकाविश्वेदेवानांदीमुखाः भूर्भुवः सुवः इदंवः आसनगंधाद्युपचारकल्पनंस्वाहानम इयंचवृद्धिः ॥

डावीकडील ताम्हनात उदक सोडावे. ( गंध, अक्षता फूल घ्यावे )

आईचे स्मरण करावे.

आई हयात असेल तर " मातृभ्यो नमः " असे म्हणून नमस्कार करावा.

वडील हयात असतील तर " पितृभ्यो नमः " असे म्हणून नमस्कार करावा.

मातृपितामहीप्रपितामह्यः नांदीमुख्यः भूर्भुवः सुवः इदंवः आसनगंधाद्युपचारकल्पनंस्वाहानम इयंचवृद्धिः ॥

वडिलांचे स्मरण करुन. उदक सोडावे.

पितृपितामहप्रपितामहाः नांदीमुखाः भूर्भुवः सुवः इदंवः आसनगंधाद्युपचारकल्पनंस्वाहानम इयंचवृद्धिः ॥

आईचे वडील व आई इत्यादींचे स्मरण करुन उदक सोडावे.

आईचे वडील व आई हयात असतील तर " मातामहादिसपत्नीकेभ्यो नमः " असे म्हणून नमस्कार करावा.

मातामहमातुः पितामहमातुः प्रपितामहा
पत्नीसहितानांदीमुखाः भूर्भुवः सुवः इदं वः
आसनगंधाद्युपचारकल्पनंस्वाहानम इयंचवृद्धिः ॥

यानंतर उजवीकडील ताम्हनात दोन वेळा उदक सोडावयाचे आहे. प्रत्येक वेळी दोन ब्राह्मणांचे भोजन होईल एवढे द्रव्य सोडायचे आहे.

प्रथम मातृका देवतांचे स्मरण करुन द्रव्य सोडावयाचे आहे.

गौर्यादिषोडशमातरः ब्राह्‍ म्यादिसप्तमातरः गणपत्यादिसहिताः भूर्भुवः सुवः इदं वः युग्मब्राह्मणभोजनपर्याप्तम्‍ किंचिद्वयावहारिकद्रव्यंस्वाहानम इयंचवृद्धिः ॥

नांदीश्राद्धीय देवतांना उद्देशून द्रव्य व उदक सोडावे.

सत्यवसुसंज्ञकाविश्वेदेवानांदीमुखाः भूर्भुवः सुवः इदंवोः युग्मब्राह्मण भोजनपर्याप्तम्‍ किंचिद्‍ व्यावहारिकद्रव्यं, स्वाहा नम इयंच वृद्धिः ।

डावीकडील ताम्हनात प्रत्येकवेळी द्रव्य व उदक सोडावे. आईचे स्मरण करावे. द्रव्य व उदक सोडावे. / आई हयात असेल तर मातृभ्यो नमः । असे म्हणून नमस्कार करावा.

मातृपितामहीप्रपितामह्यः नांदीमुख्यः भूर्भुवः सुवः इदंवः युग्मब्राह्मणभोजनपर्याप्तंकिंचित्‍ व्यावहारिकद्रव्यंस्वाहानम इयं च वृद्धिः ।

वडिलांचे स्मरण करुन द्रव्य व उदक सोडावे.

वडील हयात असतील तर " पितृभ्यो नमः " असे म्हणून नमस्कार करावा पितृपितामहप्रपितामहाः नांदीमुखाः भूर्भुवः सुवः इदं वः युग्म ब्राह्मणभोजनपर्याप्तं किंचित्‍ व्यावहारिकद्रव्यंस्वाहा नम इयंच वृद्धिः ।

आईचे वडील वा आई हयात असतील तर -
मातामहादिसपत्नीकेभ्यो नमः । असे म्हणून नमस्कार करावा.

नसतील तर स्मरण करुन द्रव्य व उदक सोडावे.

मातामहमातुः पितामहमातुः प्रपितामहाः पत्नीसहितानांदीमुखाः भूर्भुवः सुवः इदं वः युग्मब्राह्मण भोजन पर्याप्तं किंचित्‍ व्यावहारिकद्रव्यं स्वाहा नमइयंच वृद्धिः ।

उजवीकडील ताम्हनात नांदीश्राद्धाची सांगता म्हणून ( असल्यास द्राक्षे, आवळे ) वा उपलब्ध फळे व द्रव्य यांसह उदक सोडावे. ( उजव्या हातात ह्या सर्व वस्तू घ्याव्यात. )

गुरुजींनी सांगितल्यानंतर उदक व वस्तू सोडाव्यात.

उपास्मैगायतानरः पवमानायेंदवे ॥ अभिदेवाँइयक्षते ॥
अभितेमधुनापयोथर्वाणोअशिश्रयुः ॥ देवंदेवायदेवयु ॥
सनः पवस्वशंगवेशंजनायशमर्वते ॥ शंराजन्नोषधीभ्यः ॥
बभ्रवेनुस्वतवसेरुणायदिविस्पृशे ॥ सोमायगाथमर्चत ॥
हस्तच्युतेभिरद्रिभिः सुतंसोमंपुनीतन ॥ मधावाधावतामधु ॥

हातातील सर्व वस्तूंसह उदक सोडावे.

कृतस्य नांदीश्राद्धस्य प्रतिष्ठाफलसिद्धयर्थद्राक्षामलकनितन्निष्क्रयीभूतंवा यथाशक्तिहिरण्य़ंदक्षिणात्वेनस्वाहानमइयंचवृद्धिः ॥

नमस्कार करावा.

प्रजापतेनत्वदेतान्यन्योविश्वाजातानिपरिताबभूव ॥
यत्कामास्तेजुहुमस्तन्नोअस्तुवय स्यामपतयोरयीणां ॥

नांदीश्राद्धात आलेल्या सर्व पितरांचे स्मरण करुन नमस्कार करावा.

मातापितामहीचैवतथैवप्रपितामही ।

( आई हयात असेल तर मातृभ्यो नमः । ) म्हणावे

पितापितामहश्चैवतथैवप्रपितामहाः ॥

वडील हयात असतील तर ( पितृभ्यो नमः ) म्हणावे

मातामहस्तत्पिताचप्रमातामहकादयः ॥
एतेभवंतुसुप्रीताः प्रयच्छंतुचमंगलं ॥

उजव्या हातात नाणे घेऊन, डावीकडील ताम्हनाच्या कडेवर आपटून नाद करावा.

ॐ इडामग्नेपुरुद स सनिंगोः शश्वत्तम्‍ हवमानायसाध ॥

स्यान्नः सूनुस्तनयोविजावाग्नेसातेसुमतिर्भूत्वस्मे ॥

नाणकमादाय पात्रे वादयेत्‍ ॥

उजवीकडील ताम्हनात उदक सोडावे.

अनेननांदीश्राद्धेननांदीमुखदेवताः प्रीयंतांवृद्धिः ॥

हातातील दूर्वापवित्रक काढून विसर्जन करावे. दर्भपवित्रक धारण करावे.

आतापर्यंतचे सर्व कार्य स्वतः यजमानाने केले. यानंतरचे कार्य ( देवतास्थापना व अग्निमुख इत्यादी कार्य करण्यासाठी आचार्य ( मुख्य गुरुजी ) व त्यांना मदत करणारे सहाय्यक / ऋत्विज यांना पुढील कार्य करण्याविषयी विनंती करावयाची आहे. त्यालाच आचार्य नेमणूक व सहकारी नेमणूक करणे म्हणजे आचार्य, ऋत्विकवरण असे म्हणतात.

आचार्यादिवरणम्‍ -
कर्ता स्वहस्ते फलतांबूल, दक्षिणा. पवित्रकं, गृहीत्वाअमुकगोत्रोत्पन्नः, अमुकशर्मा अहं, संकल्पित सग्रहमखवास्तुशांतिकर्मणि, अमुकगोत्रोत्पन्नं, अमुकशर्माणं, ब्राह्मणं आचार्यंत्वेन च त्वां अहं वृणे । इति उक्त्वा आचार्य हस्ते, फलतांबूलादि दद्यात्‍ ।
वृतोऽस्मि - इचि आचार्यः वदेत्‍ ऋत्विक वरणम्‍ -

( आचार्यांच्या बरोबर आलेल्या अन्य गुरुजींना " ऋत्विक " म्हणून वरण द्यावे. )

अमुक गोत्रोत्पन्नं, अमुकशर्मांणं ब्राह्मणं
संकल्पित कर्मणि ऋत्विजं त्वां अहं वृणे ।

( वृतोऽस्मि इति विप्रः वदेत्‍ )

या प्रमाणे सर्व गुरुजींना कार्य करण्यासंबंधी विनंती करावी याप्रमाणे जेवढे गुरुजी आले असतील त्या सर्वांना वरण द्यावे. नंतर कर्त्याने सर्व गुरुजींच्या मस्तकावर अक्षता वाहून नमस्कार करावा व प्रार्थना करावी.

आचार्यांची प्रार्थना -
आचार्यस्तु यथा स्वर्गे शक्रादीनां बृहस्पतिः ।
तथा त्वं मम यज्ञेऽस्मिन्‍ आचार्योभव सुव्रत ॥

अन्य गुरुजींची ( ऋत्विजांची ) प्रार्थना -

अस्य यागस्य निष्पत्तौ भवंतोऽभ्यर्थिता मया ।
सुप्रसन्नैश्च कर्तव्यं कर्मेदं विधिपूर्वकम्‍ ॥

आचार्यादि सर्व गुरुजींनी म्हणावे -
यथाज्ञानतः कर्मकरिष्यामः ।

यज्ञमानाने उदक सोडावे -
अनेन कर्मणा वास्तुदेवता - प्रीयताम्‍ ।

ततः ऋत्विकभिः सह / साहाय्यकैः सह आचार्यकर्मततः आचार्यः - आचम्य पवित्रकं धृत्वा, देशकालौ संकीर्त्य, अमुकगोत्रोत्पन्नेन, अमुकशर्मणा यजमानेन, सग्रहमखवास्तुशांतिकर्मणि वृतोऽहं एभिः ऋत्विजैः सह आचार्यकर्म करिष्ये । तथाच एभिः ब्राह्मणैः सहगणपति स्मरणं, तथाच पंचगव्य प्रोक्षणेन, स्वशरीरशुद्धिंच करिष्ये ।

गणपति स्मरण करुन स्वतःवर पंचगव्य शिंपडून घ्यावे.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP