यज्ञोपवीत संस्कार :
आचम्य, प्राणानायम्य, देशकालौ, संकीर्त्य अद्यपूर्वोच्चरित वर्तमान एवंगुण विशेषण विशिष्टायांशुभपुण्यतिथौ मम ।
यजमानस्य आत्मनः श्रुतिस्मृति पुराणोक्त, फलप्राप्त्यर्थं, श्रौतस्मार्त, कर्मानुष्ठानसिद्धयर्थं, यज्ञोपवीतसंस्कारं, अहं करिष्ये ।
डाव्या हाताच्या अंगठयात जानवी / जानवे अडकवून, उरलेला जानव्याचा सर्व भाग डाव्या हाताच्या तळव्यावर ठेवावा. उजव्या हातात तुलसीपत्र / दर्भ घेऊन जानव्यावर मंत्र म्हणत फुलपात्रातील पाणी शिंपडावे ( प्रोक्षण करावे ) प्रथम गायत्री मंत्र म्हणावा.
ॐ भूर्भुवःसुवः तत्सवितुरवरेण्यं....प्रचोदयात् । ॐ आपोहिष्ठामयोभुव स्तान उर्जेदधातन ॥ महेरणायचक्षसे ॥ योवः शिवतमोरसस्तस्यभाज यतेहनः ॥ उशतीरिवमातरः ॥ तस्माअरंगमामवोयस्यक्षयायजिन्वथ ॥ आपोजनयथाचनः ॥ आपोवाइद सर्वंविश्वाभूतान्यापः प्राणावा आपः पशव आपोन्नमापोमृतमापः सम्राडापोविराडापः स्वराडापश्र्छंदास्यापोज्योती ष्यापोयजू ष्यापः सत्यमापः सर्वादेवताआपोभूर्भुवः सुवराप ॐ ॥ दधिक्राव्णोअकारिषंजिष्णोरश्वस्यवाजिनः ॥ सुरभिनोमुखाकरतप्रण आयू षितारिषत् ॥ आपोहिष्ठामयोभुवस्तान ऊर्जेदधातन । महेरणायचक्षसे ॥ योवःशिवतमोरसस्तस्यभाजयतेहनः । उशतीरिवमातरः ॥ तस्माअरंगमामवोयस्यक्षयायजिन्वथ । आपोजनयथाच नः ॥ हिरण्यवर्णाः शुचयः पावकायासुजातः कश्यपोयास्विंद्रः ॥ अग्निंया गर्भंदधिरेविरुपास्तान आपःश स्योनाभवतु ॥ यासा राजावरुणोयातिमध्येसत्यानृतेअवपश्यंजनानम् ॥ मधुश्चुतः शुचयोयाः पावकास्तान आपःश स्योनाभवंतु ॥ यासांदेवादिविकृण्वंतिभक्षंयाअंतरिक्षेबहुधाभवंति ॥ याः पृथिवींपयसोंदंतिशुक्रास्तान आपःश स्योनाभवंतु ॥ शिवेनमाचक्षुषापश्यतापः शिवयातनुवोपस्पृशतत्वचंमे ॥
सर्वा अग्नी रप्सुषदोहुवेवोमयिवर्चोबलमोजोनिधत्त ॥ पवमानः सुवर्जनः ॥ पवित्रेणविचर्षणिः ॥ यःपोतासपुनातुमा ॥ पुनंतुमादेवजनाः ॥ पुनंतुमनवोधिया ॥ पुनंतुविश्व आयवः ॥ जातवेदःपवित्रवत् ॥ पवित्रेणपुनाहिमा ॥ शुक्रेणदेवदीद्यत् ॥ अग्नेक्रत्वाक्रतू रनु ॥ यत्तेपवित्रमर्चिषि ॥ अग्नेविततमंतरा ॥ ब्रह्मतेनपुनीमहे ॥ उभाभ्यांदेवसवितः ॥ पवित्रेणसवेनच ॥ इदंब्रह्मपुनीमहे ॥ वैश्वदेवीपुनतीदेव्यागात् ॥ यस्यैबह्वीस्तनुवोवीतपृष्ठाः ॥ तयामदंतःसधमाद्येषु ॥ वय स्यामपतयोरयीणाम् ॥ वैश्वानरोरश्मिभिर्मापुनातु ॥ वातः प्राणेनेषिरोमयोभूः ॥ द्यावापृथिवीपयसापयोभिः ॥ ऋतावरीयज्ञियेमापुनीताम् ॥ बृहद्भिःसवितस्तृभिः ॥ वर्षिष्ठैर्देवमन्मभिः ॥ अग्नेदक्षैःपुनाहिमा ॥ येनदेवताअपुनत ॥ येनापोदिव्यंकशः ॥ तेनदिव्येनब्रह्मणा ॥ इदंब्रह्मपुनीमहे ॥ यःपावमानीरध्येति ॥ ऋषिभिःसंभृत रसम् ॥ सर्व सपूतमश्नाति ॥ स्वदितंमातरिश्वना ॥ पावमानीर्योअध्येति ॥ ऋषिभिःसंभृत रसम् ॥ तस्मैरसस्वतीदुहे ॥ क्षीर सर्पिर्मधूदकं ॥ पावमानीःस्वस्त्ययनीः ॥ सुदुघाहिपयस्वतीः ॥ ऋषिभिःसंभृतोरसः ॥ ब्राह्मणेष्वमृत हितम् ॥ पावमानीर्दिशंतुनः ॥ इमंलोकमथोअमुम् ॥ कामान्त्समर्धयंतुनः ॥ देवीर्देवैःसमाभृताः ॥ पावमानीःस्वस्त्ययनीः ॥ सुदुघाहिघृतश्चुतः ॥ ऋषिभिःसंभृतोरसः ॥ ब्राह्मणेष्वमृत हितम् ॥ येनदेवाःपवित्रेण ॥ आत्मानंपुनतेसदा ॥ तेनसहस्त्रधारेण ॥ पावमान्यःपुनंतुमा ॥ प्राजापत्यंपवित्रम् ॥ शतोद्याम हिरण्मयम् ॥ तेनब्रह्मविदोवयम् ॥ पूतंब्रह्मपुनीमहे ॥ इंद्रःसुनीतीसहमापुनातु ॥ सोमःस्वस्त्यावरुणःसमीच्या ॥ यमोराजाप्रमृणाभिःपुनातुमा ॥ जातवेदामोर्जयंत्यापुनातु ॥
जानवी पिळून जानव्यातील पाणी काढून टाकावे. डाव्या हाताच्या अंगठयात सर्व जानव्यांचा एक भाग अडकवावा. जानव्याचा दुसरा भाग उजव्या बाजूच्या गुडघ्यात अडकवावा. उजव्या हाताच्या अंगठयाने एक एक जानवे अभिमंत्रित करावे.
॥ ॐ भूरग्निंचपृथिवींचमांच ॥ त्री श्चलोकान्त्संवत्सरंच ॥ प्रजापतिस्त्वासादयतु ॥ तयादेवतयांगिरस्वध्रुवासीद ॥
ॐ भुवोवायुंचांतरिक्षंचमांच ॥ त्री श्चलोकान्त्संवत्सरंच ॥ प्रजापतिस्त्वासादयतु ॥ तयादेवतयांगिरस्वध्रुवासीद ॥
ॐ स्वरादित्यंचदिवंचमांच ॥ त्री श्चलोकान्त्संवत्सरंच ॥ प्रजापतिस्त्वासादयतु ॥ तयादेवतयांगिरस्वध्रुवासीद ॥
ॐ भूर्भुवःसुवश्चंद्रमसंचदिशश्चमांच ॥ त्री श्चलोकान्त्संवत्सरंच ॥ प्रजापतिस्त्वासादयतु ॥ तयादेवतयांगिरस्वध्रुवासीद ॥ ॐकारं प्रथमतंतौ न्यसामि ॥ अग्निं द्वितीयतंतौ न्यसामि ॥ नागांस्तृतीयतंतौ न्यसामि ॥ सोमं चतुर्थतंतौ न्यसामि ॥ पितृन्पंचमतंतौ न्यसामि ॥ प्रजापतिं षष्ठतंतौ न्यसामि ॥ वायुं सप्तमतंतौ न्यसामि ॥ सूर्यमष्टमतंतौ न्यसामि ॥ विश्वानदेवान नवमतंतौ न्यसामि ।
जानव्याची दोनही टोके दोन हाताच्या अंगठयात धरुन, आपले तळवे पूर्व दिशेकडे करुन आपले दोनही हात आपल्या मस्तकाच्या समांतर वर करावेत. ( जानवी सूर्याला दाखवावीत. )
॥ उद्वयंतमसस्परिपश्यंतोज्योतिरुत्तरं ॥ देवंदेवत्रासूर्यमगन्मज्योतिरुत्तमं ॥ उदुत्यंजातवेदसंदेवंवहंतिकेतवः ॥ दृशेविश्वायसूर्यं ॥ चित्रंदेवानामुदगादनीकं चक्षुर्मित्रस्यवरुणस्याग्नेः ॥ आप्राद्यावापृथिवीअंतरिक्ष सूर्याआत्माजगतस्तस्थुषश्च ॥ त्रिस्ताडयेत् ॥
दोनही हातातील जानवी गुंतणार नाहीत अशी दक्षता घेऊन ३ वेळा टाळी वाजवावी.
( हस्ताभ्यां त्रिस्ताडयेत् ॥ ) ( इति यज्ञोपवीत अभिमंत्रणम् ) पंचगव्य प्राशन व यज्ञोपवीत धारण संकल्प -
कर्त्याने आचमन प्राणायाम करुन, हातात अक्षता घेऊन संकल्प करावा,
अद्यपूर्वोच्चरित.....फलप्राप्त्यर्थं शरीर शुद्धयर्थं पंचगव्य प्राशनं, तथाच कर्मानुष्ठानसिद्धयर्थं यज्ञोपवीतधारणं करिष्ये ।
पंचगव्य प्राशन मंत्र - ( त्रिवारं ( तीनवेळा ) पिबेत् ! )
यत्वगस्थिगतं पापं देहे तिष्ठति मामके ।
प्राशनात्पंचगव्यस्य दहत्यग्निरिवेंधनम् ॥
" ॐ " असे म्हणून प्राशन करावे, नंतर आचमन करावे. यज्ञेपवीत धारण करताना प्रथम उजव्या हातात जानवे घालून मग गळयात घालावे. यज्ञोपवीत धारणकरण्याचा मंत्र -
ॐ यज्ञोपवीतंपरमंपवित्रंप्रजापतेर्यत्सहजंपुरस्तात् ॥ आयुष्यमग्य्रं प्रतिमुंचशुभ्रंयज्ञोपवीतंबलमस्तुतेजः ॥
आचमन करुन नंतर उदक सोडावे -
यज्ञोपवीतधारणांगभूतं दशगायत्री जपं अहं करिष्ये ।
उजव्या हाताच्या अंगठयात नवे जानवे धरावे, व दहावेळा गायत्री मंत्राचा जप करावा.
जप झाल्यावर जुने जानवे ( असल्यास ) डाव्या खांद्यावरुन खाली घेऊन काढावे व दोरा तोडावा.
जीर्णयज्ञोपवीत विसर्जन मंत्र -
यज्ञोपवीतं यदि जीर्णवंतं वेदांतवेद्यं परब्रह्मसूत्रम् ।
आयुष्यमग्य्रं प्रतिमुंच शुभ्रं जीर्णोपवीतं विसृजस्तु तेजः ॥
समुद्रं गच्छ स्वाहा ।
( इति यज्ञोपवीत धारणम् )
मंगलस्नान करुन उत्तम वस्त्र नेसून स्वच्छ व शुद्ध भूमीवर रांगोळी काढून सुशोभित केलेल्या आसनावर, पत्नीसह, कर्त्याने प्राडमुख बसावे.
कार्यासाठी बसलेल्यांना सुवासिनी कुंकुम तिलक करीत असताना गुरुजींनी मंगलसूचक मंत्रघोष करावा. शांतिसूक्त म्हणावीत -
ॐ स्वस्ति न इंद्रोवृद्धश्रवाः । स्वस्तिनः पूषा विश्ववेदाः । स्वस्तिनस्तार्क्ष्योअरिष्टनेमिः । स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु । ॐ अष्टौदेवावसवः सोम्यासः । चतस्त्रोदेवीरजराश्रविष्ठाः । ते यज्ञं पांतुरजसः परस्तात् । संवत्सरीणममृत स्वस्ति ॥ ॐ देवींवाचमजनयंत देवाः । तां विश्वरुपाः पशवोवदंति । सानोमंद्रेषुमूर्जंदुहाना । धेनुर्वागस्मानुपसुष्टुतैतु ॥ ॐ नमो ब्रह्मणे नमोअस्त्वग्नये, नमः पृथिव्यैः, नम ओषधीभ्यः, । नमो वाचे नमो वाचस्पतये नमो विष्णवे बृहते करोमि । ॐ सहनाववतु । सहनौभुनक्तु । सहवीर्यंकरवावहै । तेजस्विनावधीतमस्तुमाविद्विषावहै । ॐ शांतिः शांतिः शांतिः । ॐ तच्छंयोरावृणीमहे... शं चतुष्पदे ।
कुंकुम तिलक झाल्यावर यजमान पत्नीने कुंकुम तिलक करणार्या सुवासिनीला हळद कुंकू लावावे. कर्त्याने विडा नारळ द्यावा मानाप्रमाणे लहानाने नमस्कार करावा.
कर्त्याने गुरुजींच्या सूचनेप्रमाणे आचमन करुन पवित्रके धारण करुन प्राणायाम करावा. हातात अक्षता घेऊन देवादिकांना हात जोडून वंदन करावे, आणि त्यांचे स्मरण करावे. प्रथम गणपतीचे स्मरण करुन गणपतीला विडा ( नारळ ) ठेवावा. प्रत्येक विडयावर नारळ ठेवावा असे शास्त्र आहे. शक्य नसेल तर कुलदेवतेला व क्षेत्रपाल देवतेला नारळ अवश्य ठेवावा. ) उजव्या हातात अक्षता घेऊन व हात जोडून पुढीलप्रमाणे देवादिकांना वंदन आणि त्यांचे ध्यान करावे.
ॐ गणानां त्वा गणपति हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं । ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन् नूतिभिः सीदसादनं । ॐ भूर्भुवः सुवः महागणपतये नमः । प्रार्थनापूर्वकं ताम्बूलं नारिकेलफलं, समर्पयामि ।
हातातील अक्षता विडा व नारळ यावर वाहाव्यात. पुनः हातात अक्षता घेऊन आपल्या कुलस्वामी व कुलदेवतेचे स्मरण करुन हातातील अक्षता विडा व नारळ यांवर वाहाव्यात व पत्नीने तेथे हळदीकुंकू वाहावे.
ॐ जातवेदसे सुनवाम सोममराती यतो निदहाति वेदः । स नः पर्षदतिदुर्गाणि विश्वानावेव सिंधुं दुरितात्यग्निः ॥ ॐ भूर्भुवःसुवःकुलस्वामी कुलदेवतायै नमः । प्रार्थनापूर्वकम् ताम्बूलं नारिकेलफलं च समर्पयामि ।
पुनः हातात अक्षता घेऊन क्षेत्रपालाचे स्मरण करुन विडा व नारळ यांवर अक्षता वाहाव्यात.
ॐ क्षेत्रस्य पतिना वयं हि तेनेव जयामसि । गामश्चं पोषयित्न्वा स नो मृडातीदृशे ॥ ॐ भूर्भुवःसुवःक्षेत्रपालाय नमः । प्रार्थनापूर्वकं ताम्बूलं नारिकेल फलं समर्पयामि ।
पुनः हातात अक्षता घेऊन वास्तुदेवतेचे स्मरण करुन विडा व नारळ यांवर अक्षता वाहाव्या.
ॐ वास्तोष्पते प्रतिजानीह्यस्मान्त्स्वावेशो अनमीवो भवानः । यत्त्वेमहे प्रति तन्नो जुषस्व शं नो भव द्विपदे शं चतुष्पदे ॥ ॐ भूर्भुवःसुवःवास्तोष्पतये नमः । प्रार्थनापूर्वकं ताम्बूलं नारिकेलफलं सर्मयामि ।
सर्व विडयांवर, नारळावर पाणी वाहून नमस्कार करावा. कुलदेवतेचा विडा नारळ घरातील देवांसमोर ठेवून नमस्कार करावा. घरातील वडील मंडळींना व गुरुजींना नमस्कार करुन कार्य करणार्यांनी आपल्या आसनावर बसावे. हातात अक्षता घेऊन देवतांना वंदन करावे.