गणपति पूजन
तांदुळावर, आपल्याकडे शेंडी करुन नारळ ठेवावा. गणपती समजून त्याची पूजा करावयाची आहे.
हातात अक्षता घेऊन गणपतीचे स्मरण / ध्यान करावे. सांगितल्यावर हातातील अक्षता गणपतीवर वाहाव्यात -
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ॥
श्रीमहागणपतये नमः ।
ध्यायेत् ।
ध्यानार्थे अक्षतान् समर्पयामि ।
आवाहनासाठी देवाला अक्षता वाहाव्यात.
श्रीमहागणपतये नमः ।
आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि ।
आसनासाठी देवाला अक्षता वाहाव्या -
श्रीमहागणपतये नमः ।
आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।
डाव्या हाताने पळीत पाणी घेऊन ते पाणी फुलाने किंवा दूर्वेने देवावर शिंपडावे -
श्रीमहागणपतये नमः ।
पादयोः पाद्यं समर्पयामि ।
अर्ध्यपात्रातील पाणी डाव्या हाताने पळीत घेऊन ते अर्ध्य फुलाने देवावर शिंपडावे -
श्रीमहागणपतये नमः ।
हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि ।
पुनः साधे पाणी देवावर शिंपडावे -
श्रीमहागणपतये नमः ।
आचमनीयं समर्पयामि ।
स्नानासाठी देवावर पुनः पाणी शिंपडावे -
श्रीमहागणपतये नमः ।
स्नानं समर्पयामि ।
देवाला कापसाची २ वस्त्रे वहावीत. नसल्यास अक्षता वहाव्या -
श्रीमहागणपतये नमः ।
वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं / अक्षतान् वा समर्पयामि ।
देवाला जानवे वाहावे. नसल्यास अक्षता वाहाव्यात -
श्रीमहागणपतये नमः ।
उपवस्त्रार्थे यज्ञोपवीतं / अक्षतान् वा समर्पयामि ।
देवाला करंगळीजवळच्या बोटाने गंध लावावे -
श्रीमहागणपतये नमः ।
विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ।
देवाला अलंकारासाठी अक्षता वाहाव्या -
श्रीमहागणपतये नमः ।
अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि ।
देवाच्या अंगभूत असणार्या ऋद्धि, सिद्धींना अगोदर हळद व नंतर कुंकू वहावे -
ऋद्धिसिद्धीभ्यां नमः ।
हरिद्रां-कुङ्कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ।
देवाला शेंदूर, अष्टगंध इत्यादी वाहावे -
श्रीमहागणपतये नमः ।
परिमलद्रव्यं समर्पयामि ।
दूर्वांची जुडी सोडून गंध, अक्षत, हळद-कुंकू यांच्यासह आपल्याकडे दूर्वाग्र करुन वाहावी -
श्रीमहागणपतये नमः ।
दूर्वाङ्कुरान् समर्पयामि ।
देवाला लाल फूल वाहावे. ( फुलाचे देठ देवाकडे करावे ) -
श्रीमहागणपतये नमः ।
पूजार्थे कालोद्भवपुष्पं समर्पयामि ।
उजव्या हाताने अगोदर उदबत्ती व नंतर नीरांजन ओवाळावे. डाव्या हाताने घंटा वाजवावी -
श्रीमहागणपतये नमः ।
धूपं समर्पयामि ।
श्रीमहागणपतये नमः ।
दीपं समर्पयामि ।
देवाच्या समोर किंवा चौरंगावर पाण्याने चौकोन करुन त्यावर गूळ, खोबरे, पेढयाची वाटी ठेवावी. नैवेद्य ठेवावा. उजव्या हातात पाणी घेऊन ते नैवेद्याभोवती एकदा फिरवावे, व हात जोडावेत -
सत्यंत वर्तेन परिषिंचामि ।
प्राणाय नमः ।
अपनाय नमः ।
व्यानाय नमः ।
उदानाय नमः ।
समानाय नमः ।
ब्रह्मणे नमः ।
नैवेद्या भोवती पुनः एकदा पाणी फिरवून एक पळी पाणी ताम्हनात सोडावे व
नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि ।
असे म्हणून हात जोडावेत -
प्राणाय नमः ।
अपनाय नमः ।
व्यानाय नमः ।
उदानाय नमः ।
समानाय नमः ।
ब्रह्मणे नमः ।
उजव्या हातावरुन चारवेळा ताम्हनात पाणी सोडावे आणि देवाला गंध फूल वाहावे -
उत्तरापोशनं समर्पयामि ।
हस्तप्रक्षालनं समर्पयामि ।
मुखप्रक्षालनं समर्पयामि ।
आचमनीयं समर्पयामि ।
करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि ।
चौरंगावर विडा, दक्षिणा, खारीक, बदाम व उपलब्ध असलेले फळ ठेवून त्यावर उजव्या हातावरुन पळीने पाणी सोडावे -
श्रीमहागणपतये नमः ।
मुखवासार्थे पूगीफलतांबूलं, खर्जुरीफलं, वाताम्बुफलं, यथासम्पादित कालोद्भवफलं समर्पयामि ।
तथा च सुवर्णपुष्पदक्षिणां च समर्पयामि ।
देवाला गंध, फुल, वाहून नमस्कार करावा -
श्रीमहागणपतये नमः ।
मंत्रपुष्पाञ्लिं समर्पयामि ।
नमस्करोमि ।
हात जोडून प्रार्थना करावी -
कार्यं मे सिद्धिमायातु पूजिते त्वयि धातरि ।
विघ्नानि च विनश्यन्तु सर्वाणि सुरनायक ॥
श्रीमहागणपतये नमः । प्रार्थनां समर्पयामि ।
उजव्या हातावरुन पाणी सोडावे -
अनेन कृतपूजनेन ।
श्रीमहागणपतिः प्रीयतां न मम ।
पूजेसाठी घेतलेल्या कलशावर आपला उजवा हात पालथा ठेवून गंगादि नद्यांचे स्मरण करावे -
गंगे च यमुने चैव, गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिंधु कावेरि, जलेऽस्मिन् संनिधिं कुरु ॥
कलशाला बाहेरच्या बाजूला एकाच ठिकाणी गंध, अक्षता,फूल वाहावे व नमस्कार करावा.
घंटा धुऊन, पुसून जागेवर ठेवावी आणि खालील मंत्र म्हणून तिला गंध, अक्षता व फूल वाहावे. नंतर घंटा वाजवावी.
आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम् ।
कुर्वे घण्टारवं तत्र देवताह्वानलक्षणम् ॥
घण्टादेव्यै नमः । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।
खालील मंत्राने समईला गंध, अक्षता व फूल तसेच हळद-कुंकू वाहावे.
भो दीप ब्रह्मरुपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः ।
आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थाश्च प्रयच्छ मे ॥
दीपदेवताभ्यो नमः ।
सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।
कलशातील पाणी पळीत घेऊन पुढील मंत्र म्हणून ते फुलाने किंवा तुलसीपत्राने आपल्या अंगावर व पूजासाहेत्यावर शिंपडावे.
अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा ।
यः स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः ॥
यानंतर नवग्रहांचे आवाहन करावे त्यानंतर वरुण स्थापना करावी.
प्रत्येक मंत्र म्हणून झाल्यावर आकृतीत दाखविल्याप्रमाणे सुपारीवर नवग्रहांचे आवाहन करावे ( अक्षता वाहाव्यात )