श्री गणेशयोगींद्र रचित - ॐ नमो गणेशपायांसी । जया न...
पूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.
ॐ नमो गणेशपायांसी । जया नमनें सर्वांसी ।
सकळ सिद्धि सरसासीं । पावती अनंत ॥१॥
सगुण निर्गुंण तोच । नाना खेळ करी साच ।
तदपि वेदादि वाच । सांगतां योग भासे ॥२॥
गण अभेदवाचक । ब्रह्मगण कर्मगणादिक ।
देवगणादि नाना ऐक । गणंजयासी शोभे ॥३॥
याहून गणेश नाम । सर्वादि तोच वर्म ।
अंतीं राहतो स्वधर्म । मध्यें नानाविध ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : July 22, 2016
TOP