चौखम्बामुद्रितश्रीसूक्त पुष्पमालायां तु :--- ॐ नमो भगवत्यै महालक्ष्म्यै हिरण्यवर्नायै अंगुष्ठाभ्यां नम: । ॐ नमो भगवत्यै महालक्ष्मै हरिण्यै तर्जनीभ्यां नम: । ॐ नमो भग० सुवर्णरजतस्रजायै मध्यमाभ्यां नम । ॐ नमो भग० चंद्रायै अनामिकाभ्यां नम:। ॐ नमो भग० हिरण्मय्यै कनिष्ठिकाभ्यां नम: । ॐ नमो भग० लक्ष्म्यै करतलकरपृष्ठाभ्यां नम इति ॥ एवं हृदयादि । यथा - ॐ नमो भग० हिरण्यवर्णायै हृदयाय नम: । ॐ नमो भग० हरिण्यै शिरसे स्वाहा । ॐ नमो० सुवर्णरजतस्रजायै शिखाऐ वषट् । ॐ नमो भग० चंद्रायै कवचाय हुम् । ॐ नमो भग० हिरण्मय्यै नेत्रत्रयाय वौषट् ।
ॐ नमो भग० लक्ष्म्यै लक्ष्म्यै अस्त्राय पट् । इति ।
येथें ॐ नमो भगवत्यै महालक्ष्म्यै हें प्रत्येक पदाला विशेषण दिलें असून ऋक्स्थपदाचा चतुर्थ्यंत निर्देश केला आहे. प्रारंभीं - ‘पंचार्णौश्च त्रिभि:’ या वचनांत आद्य ऋचेनें षडंगन्यास सांगितला आहे. या चौखम्बा प्रतींतील न्यासांत - ‘चंद्रां हिरण्मयीं’ या पृथक् पदांचा पृथक् अंगांचे ठिकाणीं न्यास सांगितल्यामुळें ऋचा पूर्ण न होतांच षडंगें पूर्ण होतात. वस्तुत: पंचार्णै: या वचनांत ‘षड्भि:’ असा निर्देश करून ‘चंद्रां हिरण्मयीं’ या समुच्चित्यपदानें करन्यासांत अनामिका व हृदयादि षडंगांत ‘नेत्रत्रयाय’ या अवयवांचे ठिकाणीं न्यास विहित आहे. असें केल्यानें आद्य ऋचा षडंगांचे ठिकाणीं पूर्ण होते. चौखग्बा न्यासांत देवतानामसंयन, चतुर्थ्यंत निर्देश, चंद्रां हिरण्मयीं हीं पदें पृथक् घेणें, याविषयीं जास्त प्रमाणे शिधावें.
अत्र प्रमाणं मृग्यम् ।