अथ सामान्यत: यस्य कस्यापि मंत्रादे: पुरश्चरणार्थं देशकालविचार: प्रस्तूयते, तत्रादौ देश: योगिनीह्रदये, रुद्रयामले, सौभाग्यकल्पद्रुमे च - ‘पुन्यक्षेत्रं नदीतीरं गुहापर्वतमस्तकम् । तीर्थप्रदेशा: सिंधूनां संगम: पावनं वनम् ॥ उद्यानानि विविक्तानि विल्वमूलं तटं गिरे: । तुलसीकाननं गोष्ठं वृषशून्यं शिवालयम् ॥ अश्वत्थामलकीमूलं गोशाला जलमध्यत: । देवतायतनं कूलं समुद्रस्य निजं गृहम् ॥ साधने तु प्रशस्तानि स्थानान्येतानि मंत्रिणाम् । अथवा निवसेत्तत्र यत्र चित्तं प्रसीदति ॥ म्लेच्छदुष्टसृगव्यालशंकातंकितवर्जिते ।
एकांतपावने निंदारहिते भक्तिसंयुते ॥ सुदेशे धार्मिके देशे सुभिक्षे निरुपद्रवे । रम्ये भक्तजनस्थाने निवसेत्तापसप्रिये ॥ गुरुणां संनिधाने च चित्तैकाग्र्यस्थले तथा । एषामन्यतमस्थानमाश्रित्य जपमाचरेत् ॥ इति देश: ।
अर्थ :--- कोणत्याही जप - तपादि अनुष्ठानाची शीघ्र सिद्धि होण्याकरितां देश, काल वदेह हीं अत्यंत शुद्ध पवित्र असावीं लागतात.रुद्रयामलादि ग्रंथांत पुण्यस्थानें संगितलीं आहेत तीं अशीं :--- पुण्यक्षेत्र (गणपतिपुळें, पंढरपूर, नरसोबाची वाडी, सज्जनगड इत्यादि), कृष्णा - नर्मदा - गंगादि नद्यांचें तिर, गुहा, पर्वतशिकर, तीर्थप्रदेश,दोन नद्यांचा संगम, नैमिषादि पवित्र वन, उद्यानप्रदेश, व्याघ्रादि क्रूर पशूंचा उपसर्ग होणार नाहीं असें स्थान, बैल नाहीं असा गोठा किंवा (नदी नाहीं असें) शिवालय, अश्वत्थ, आमलकीवृक्ष, बिल्ववृक्ष, अगस्त्यवृक्ष यांचा मूल प्रदेश, कोणतेंही पवित्र देवालय, तथापि ज्या देवतेची आराधनाकरावयाची तें मंदिर जास्त प्रशस्त, समुद्रतीर, आपलें स्वत:चें घर, हीं सर्व स्थानें जपाद्यनुष्ठानाकरतां सिद्धिकारक आहेत. अथवा जेथें मन सुप्रसन्न होईल, एकाग्रता साध्य होईल. अंत:करणांत जास्त श्रद्धा वाढेल, जे निंदारहित असेल, सज्जनांचा, साधुपुरुषांचा, भक्तजनांचा सहवास व दर्शन जेथें घडेल, गुरुजनांचें सान्निध्य जेथें लाभेल अशा कोणत्याहि ठिकाणीं जपाद्यनुष्ठान आचरावें. देवताप्रसाद शीघ्र होईल.