पार्वण श्राद्ध उत्तरार्ध

पार्वण श्राद्ध पितृ पंधरवड्यात करतात.यात मागील तीन पितृ देवतांचा समावेश होतो.


१३ - मंडलादिकरण

'तुमच्या आज्ञेने मंडलादि करतो,' असा संकल्प केल्यानंतर ब्राह्मणांनी 'करा' असे म्हणावे.

नंतर देवस्थानीय ब्राह्मणाच्या पान मांडण्याच्या जागी चौकोनी आणि तदनंतर नैऋत्य दिशेकडून आरंभ करून ईशान्य दिशेपर्यन्त 'प्रदक्षिण' मार्गाने मंडल करावे. पितृस्थानीय ब्राह्मणाचे पान मांडण्याचे जागी वाटोळे आणि तदनंतर ईशान्येपासून नैऋत्येपर्यंत 'अप्रदक्षिण' म्हणजे उलट बाजूने मंडल करावे. नंतर त्यावर जेवणाची पाने मांडावीत.

१४ - भस्मवकिरण

नंतर हातात भस्म घेऊन अपसव्य करून यजमानाने पितृस्थानीय ब्राह्मणांच्या पुढे मांडलेल्या पानाच्या सभोवार उलट रीतीने रांगोळीप्रमाणे भस्म घालावे. त्यासमयी

पिशङ्ग भृष्टिमम्भृणं पिशाचिमिन्द्र सं मृण ।

सर्व रक्षो नि बर्हय ॥ (ऋ. १. १३३. ५)

हा मंत्र म्हणावा. नंतर सव्याने देवब्राह्मणांच्या पानभोवती सरळ पद्धतीने भस्म घालावे.

१५ - अग्नौकरण

कर्ता - (सव्यम्) "भवदनुज्ञया विप्रपाणावग्नौकरणं करिष्यै ।"

ब्राह्मणः- "क्रियताम्" ।

(अपसव्यम । घृताक्तमन्नमादाय द्विधा विभज्य ।)

इदं सोमाय पितृमते ।

इदमग्नये कव्यवाहनाय ।

(इति भागद्वयं दक्षिणसंस्थमभिस्पृश्य वामहस्तैन दक्षीणहस्तमुपस्तीर्य मध्यात्पूर्वार्धादवदानधर्मणावदाय पात्रथस्मवत्तं चाभिधाथ)

सोमाय पितृमते स्वधा नमः ।

सोमाय पितृमते इदं न मम ।

(तथैव पुनरवदाय अवत्तमव द्विरभिधार्थ)

अग्नये कव्यवाहनाय स्वधा नमः ।

अग्नये कव्यवाहनायेदं न मम ।

(सव्येनोदकस्पर्शनम्‌)

ॐ च स्वरश्च मे यज्ञोप च ते नमश्च ।

यत्ते न्यूनं तस्मै त उपयत्तेऽतिरिक्तं तस्मै ते नमः ॥

अग्नये नमः । स्वस्ति ।

श्रद्धां मेधां यशः प्रज्ञां विद्यां बुद्धिं श्रियो बलम् ।

आयुष्यं तेज आरोग्यं देहि मे हव्यवाहन ॥

कर्ता - "पाणौ हुतम्" ।

ब्राह्मणः - "सुहुतम् ।"

प्रथम पितृस्थानीय ब्राह्मणाचे हातावर करशुद्धीकरता उदक घालावे. मग देवस्थानीय ब्राह्मणाचे हातावर घालावे.

(सव्य करून) 'आपल्या आज्ञेने ब्राह्मणांच्या हातावर अग्नौकरण करतो; असा संकल्प सोडावा. त्यावर ब्राह्मणाने 'कर' असे प्रतिवचन द्यावे.

यजमाने अपसव्य करून, तूप घातलेला भात घेऊन त्याचे दोन दर्भांनी दोन भाग करावेत, आणि 'पितृस्वरूप सोमाला हे अन्न मी समर्पण करतो; कव्यवाहन अग्नीला हे अन्न समर्पण असो,' असे म्हणून त्या दोन भागांना स्पर्श करावा.

नंतर डाव्या हाताने उजव्या हाताला स्पर्श करून उजव्या हाताने मध्यभागांतील थोडा भात व पहिल्या भागातील थोडा भात घेऊन, हातातील भातावर व पानावरच्या भातावर तुपाचा 'अभिधार' (सिंचन) करावा, व 'सोमाय पितृमते स्वधा नमः' असे म्हणून पितृस्थानीय ब्राह्मणाचे हातावर तो भात द्यावा. नंतर 'सोमाय पितृमते इदं न मम' असे म्हणावे.

नंतर पूर्वीच्याच प्रमाणे दुसर्‍या भागातील व मध्यभागातील भात घेऊन अभिधार करून 'अग्नये कव्यवाहनाय' म्हणून त्याच ब्राह्मणाचे हातावर भात द्यावा. अशा क्रमानेच पिता, पितामह, प्रपितामह यांच्या स्थानी वेगवेगळे ब्राह्मण बसविले असल्यास अग्नौकरण करावे.

नंतर यजमानाने सव्य करून स्वतःचे हात धुवावेत व 'ॐ च मे स्वरश्‍च मे' पासून 'देहि मे हव्यवाहन' पर्यंत मंत्र म्हणावेत व आपला ओला हात ब्राह्मणाच्या हाताला लावावा.

नंतर 'पाणौ हुतम' असे म्हटल्यावर ब्राह्मणांनीं 'सुहुतम्' असे प्रतिवचन द्यावे.

मूर्धान दिवो अरतिं पृथिव्या वैश्वानरमृत आ जातमग्निम् ।

कविं सम्राजमतिथिं जनानामासन्ना पात्रं जनयन्त देवाः ॥५७॥

(इत्यभिधारिते पात्रं विप्राः पाणिस्थमन्नं तत्र क्षिपेयुः ।)

'मूर्धानं दिवो' या मंत्राने ब्राह्मणापुढे मांडलेल्या पानावर तुळशीपत्राने किंवा पात्राने तुपाचा अभिधार करावा (म्हणजे तूप लावावे) व हाताला अग्नौकरणाचा भात ब्राह्मणांनी पानावर ठेवावा. नंतर पाने वाढावयास सांगावीत. पाने वाढीतोपर्यंत 'अन्नसूक्त' किंवा 'त्रिसुपर्ण' म्हणावे.

श्राद्धाचे आमंत्रण आल्याबरोबर ब्राह्मणानी

'दोग्ध्री' ऋचा'

उप ह्रये सुदुघा धेनुमेतां सुहस्तो गोधुगृत दोहदेनाम् ।

श्रेष्ठं सवं स्बिता सविषन्नोऽभीद्धो घर्मस्तदु षु प्र वोचम् ।

हिङ्कृण्वती वसुपत६नी वसूनां वत्समिच्छन्ती मनसाभ्यागात् ।

दुहामश्विभ्यां पयो अध्न्येयं सा वर्धतां महते सौभगाय ॥(ऋ.१.१६४.२६-२७)

म्हणाव्यात; पानावर बसल्यावर

'निषङ्‌गी'

इंद्र दृह्य यामकोशा अभुवन् यज्ञाय शिक्ष गृणते साखभ्यः ।

दुर्मायवो दुरेवा मत्यासो निषङ्गिणो रिपवो हन्त्वासः ।(ऋ. ३.३०.१५)॥

म्हणावी; नंतर भोजनाच्या वेळी

'त्रिसुर्पण'

वाशीमन्त ऋष्टिमन्तो मनीषिणः सुधन्वान इषुमन्तो निषङ्गिणः ।

स्वश्वाः स्थ सुरथाः पृश्निमातरः स्वायुधा मरुतो याथना शुभम् ॥(ऋ.५.५७.२)

चतुष्कपर्दा युवतिः सुपेशा घृतप्रतीका वयुनानि वस्ते ।

तस्या सुपर्णा वृषणा नि षेदतर्यत्र देवा दधिरे भागधेयम् ।

एकः सुपर्णः स समुद्रमा विवेश स इंद्र विश्व भुवनं वि चष्टे ।

तं पाकेन मनसापश्यमन्तितस्तं माता रेळिह स उ रेळिह मातरम् ।

सुपर्ण विप्राः कवयो वचाभेरिके सन्त बहुधा कल्पयन्ति ।

छंदासि च दधतो अध्वरेषु ग्रहान्त्सोमस्य मिमते द्वादश ॥ऋ. ३०. ११४. ३-५)

आणि

'अन्नसूक्त'

पितुं नु स्तोषं महो धर्माणं तविषीम् ।

यस्य त्रितो व्योजसा वृत्रं विपर्वमर्दयत् ॥

स्वादो पितो मधो पितो वयं त्वा ववृमहे ।

अस्माकसविता भव ।

उप नः पितवा चर शिवः शिवाभिरूतिभिः ।

मयोभुरद्विषेण्यः सखा सुशेवो अद्वयाः ।

तव त्ये पितो रसा रजांस्यनु विष्ठिताः ।

दिवि वाता इव श्रिताः ॥

तव त्ये पितो ददतस्तव स्वादिष्ठ ते पितो ।

प्र स्वाद्मानो रसानां तुविग्रीवा इवेरते ॥

त्वे पितो महानां देवानां मनो हितम्‌ ।

अकारि चारु केतुना तवाहिभवसावधीत ॥

यददो पितो अजगन् विवस्व पर्वतानाभ ।

अत्रा चिन्नो मधो पितो ऽ रं भक्षाय गम्याः ॥

यदपामोषधीनां परिंशमारिशामहे ।

वातपि पीव इद भव ॥

यत्‌ ते सोम गवाशिरो यवाशिरो भजामहे ।

वापापे पीव इदू भव ॥

करम्भ ओषधे भव पीवो वृक्क उदारथिः ।

वातपि पीव इद्‌ भव ॥

तं त्वा वयं पितो वचोभिर्गावो न हव्या सुषूदिम ।

देवेभ्यस्त्वा सधमादमस्मभ्ये त्वा सधमादम् ॥(ऋ. १.१८७. १-११)

व श्राद्धाच्या अखेरीस

'वामदेवीय'

कया नश्चित्र आ भवदूती सदावृधः सखा ।

कया शचिष्ठ्या वृता ॥

कस्त्वा सत्यो मदानां मंहिष्ठो मत्‍ह्यदन्धसः ।

दृळहा चिदारुजे वसु ।

अभी षु णः सखीनामविता जरितृणाम् ।

शतं भवास्यूतिमिः ॥ (ऋ. ४ ३१. १-३)

म्हणावे, असा नियम आहे. पण सध्या सर्वच मंत्र एकदम भोजनाचे वेळी म्हणतात.

१६ - अन्ननिवेदन

सव्याने आणि गायत्री मंत्राने ब्राह्मणभोजनार्थ वाढलेले अन्न प्रोक्षण करावे. उजवा गुढगा जमिनीवर टेकावा. देयस्थानीय ब्राह्मणांच्या पानासभोवताली यवोदकाचे पाणी कूर्चाने फिरवावे. नंतर उजवा हात वर आणि डावा हात खाली करून दोन्ही हातानी देवस्थानीय ब्राह्मणाचे पाय धरावे. नंतर

'पृथिवी ते पात्रं' पासून 'विष्णो हव्यं रक्षस्व' येथपर्यंत मंत्र म्हणावे.

अतो देवा अवन्तु नो यतो विष्णुर्विचक्रमे

पृथिव्याः सप्त धामभिः ॥(ऋ. १. २२. १६)

नंतर पालथ्या हाताने ब्राह्मणाचे अंगुष्ठमूल भाताला लावून सर्व पानांवरून प्रदक्षिण फिरवावे, व डाव्या हाताने पानाला स्पर्श करून '

पुरूरर्वाद्रव संज्ञका विश्वेदेवा देवताः इदमन्नं हव्यम, अर्य ब्राह्मण आहवनीयार्थे, इयं भूर्गया, अयं भोक्ता गदाधरः इदमन्नं ब्रह्म, इदं सौवर्णपात्रम्, अक्षय्यवटच्छायेयम् ।"

मंत्र म्हणावा.

१७ - पित्राद्यन्ननिवेदन

नंतर

ये देवासो दिव्येकादश स्थ पृथिव्यामध्येकादश स्थ ।

अप्सुक्षितो महिनैकादश स्थ ते देवासो यज्ञमिमं जुषध्वम् ॥ऋ. १. १३९. ११)

हा मंत्र म्हणून हात जोडावेत.

'ॐ तत्सद् गयायां' असे म्हणून दर्भ व सातू असलेले पाणी पानाच्या डाव्या भागी जमिनीवर सोडावे.

'गयेतील विष्णु प्रसन्न होवो,' असे यजमानाने म्हटल्यावर 'प्रीतो भवतु' ('प्रसन्न होवो') असे ब्राह्मणांनी म्हणावे.

नंतर 'देवाच्या आज्ञेने पितरांना अन्न निवेदन करतो,' म्हणून संकल्प सोडावा. 'सोडा,' असे ब्राह्मणांनी म्हणावे.

अपसव्य करून पितृस्थानीय ब्राह्मणांची पाने तिलोदकाने परिसिचित करावीत.

नंतर डावा हात वरतीं व उजवा हात पानाखाली घेऊन पितृस्थानीय ब्राह्मणाचे पाय धरावे, व

'पृथिवी ते पात्रं'

पासून

'विष्णो कव्यं रक्षस्व'

विप्रांगुष्ठमूलमन्नं निवेश्य अप्रदक्षिणं भ्रामयेत् । ततो वाम हस्तेन पात्रं स्पृशन्) "पितृपितामहप्रपितामहा देवता इदमन्नं कव्यं, अयं ब्राह्मण आहवनीयार्थे, इयं भूर्गया, अयं भोक्ता गदाधरः इदमन्नं ब्रह्म, इदं सौवर्णपात्रमक्षय्यवटच्छायेयम् ।

मंत्र म्हणावेत.

ब्राह्मणाचा हात आपल्या हातात धरून अंगुष्ठमूल भाताला लावून धरलेला हात अप्रदक्षिण असा पात्रावर फिरवावा, व डाव्या हाताने पात्राला स्पर्श करून'

अस्मत्पितृपितामह'

अस्मप्तितृपितामहप्रपितामहेभ्यः अमुकशर्मभ्यः अमुकगोत्रेभ्यः वसुरुद्रादित्यस्वरूपेभ्यः इदमन्नं सोपस्करममृतरूप परिविष्टं परिवेक्ष्यमाणं चास्य ब्राह्मणस्य आतृप्तेः स्वाहा, हव्यं नमो न मम ।

"ॐ तत्सद् गयायां रुद्रपदादि चतुर्दशपदेषु दत्तमन्नमक्षय्यमस्तु । (इति सतिलदर्भजलं पात्रदक्षिणभागै भूमौ पितृतीर्थेन वामकराधोनीतेन दक्षिणकरेण क्षिपेत् "गयागदाधरः प्रीयताम् ।

मंत्र म्हणावा. तदनंतर तीळ व दर्भासहित पाणी पानाच्या उजव्या बाजूला डाव्या हातासहित उजव्या हाताने पितृतीर्थाने सोडावे.

'गयेचा विष्णु प्रसन्न होवो' असे यजमानाने म्हटल्यावर, ब्राह्मणांनी 'प्रसन्न होवो,' असे प्रतिवचन द्यावे.

'ये चेह पितरो ये च नेह यॉंश्च विद्म यॉं उ च न प्रविद्म ।

त्वं वेत्थ यति ते जातवेदः स्वधाभिर्यज्ञं सुकृतं जुषस्व॥ऋ. १०. १५. १३)

हा मंत्र म्हणून पितृस्थानीय ब्राह्मणांची हात जोडून प्रार्थना करावी. या क्रियेने पितर प्रसन्न होवोत,' असे म्हणावे.

१८ - ब्राह्मणप्रार्थना

ब्रह्मार्पणम् ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम ।

ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥

हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिरन्नं प्रजापतिः ।

हरिर्विप्रशरीरस्थो भुक्ते भोजयते हरिः ॥

त्वां योगिनश्चिन्तयन्ति त्वां यजन्ति च यज्वनः ।

हव्यकव्यभुगेकस्त्वं पितृदेवस्वरूपधृक्‌ ॥

चतुर्भिश्च चतुर्भिश्च द्वाभ्यां पंचभिरेव च ।

हूयते च पुनर्द्वाभ्यां स मे विष्णुः प्रसीदतु ॥

तत्सद्‌ब्रह्मार्पणमस्तु

श्राद्धाच्या भोजनासाठी बसलेल्या ब्राह्मणांना उद्देशून हे मंत्र म्हणावेत

१९ - नैवेद्यसमर्पण

नैवेद्य समर्पयामि ।

प्राणाय स्वाहा । अपानाय स्वाहा ।

व्यानाय स्वाहा । उदानाय स्वाहा ।

समानाय स्वाहा । ब्रह्मणे स्वाहा ।

मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि ।

हस्तप्रक्षालनं, करोद्वर्तनार्थे चंदनं च समर्पयामि ।

प्रस्तुत मंत्र म्हणून देवाला नैवेद्य समर्पण करावा.

२० - देवतास्मरण

(अपसव्यम)

ईशानविष्णूकमलासनकार्तिकेय,

वह्नित्रयार्करजनीशगणेश्‍वराणाम् ।

क्रौचामरेंद्रकलशोद्‌भवकश्यपानां,

पादान्नमामि सततं पितृमुक्तिहेतून्

२१ - मधुमती श्रावण

कर्ता - (सव्यम्) "मधुमतीः श्रावयिष्ये ।"

ब्राह्मण - "श्रावय ।"

कर्ता - मधु वात ऋतायते मधु क्षरन्ति सिन्धवः ।

माध्वीनः सन्त्वोषधीः ।

मधु नक्तमुतोषसो मधुमत पार्थिव रजः ।

मधु द्यौरस्तु नः पिता ॥

मधुमान्नो वनस्पतिर्मधुमॉं अस्तु सूर्यः ।

माध्वीर्गावो भवन्तु नः ॥ (ऋ. १. ९०. ६-८)

कर्त्याने सव्य करून 'मधुमती ऐकवतो,' म्हटल्यावर ब्राह्मणांनी त्यास 'ऐकीव, असे म्हणून अनुमोदन द्यावे. 'अनेन पितृणां प्रतिसांवत्सरिक' म्हणून तिलोदकातील कूर्च झाडावा. त्यावर 'परमेश्वर प्रसन्न होवो' असे प्रतिवचन ब्राह्मणांनी द्यावे.

२२ - प्राणाहुती

प्राणाहुतयः

श्रद्धायां प्राणे निर्विष्टोऽमृतं जुहोमिः ।

शिवो मा विश प्रदाहाय ।

प्राणाय स्वाहा ।

श्रद्धायामपाने निविष्टोऽमृतं जुहोमि ।

शिवो मा विशा प्रदाहाय ।

अपानाय स्वाहा ।

श्रद्धायां व्यानं निविष्टोऽमृतं जोहोमि ।

शिवो मा विशा प्रदाहाय ।

व्यानाय स्वाहा ।

नंतर 'श्रद्धायां प्राणे' वगैरे म्हणून क्रमाने पांच आहुती ब्राह्मणास घेण्यास सांगाव्यात व 'ब्रह्मणे स्वाहा ब्रह्मणि' मंत्र म्हणून आणखी एक आहुती घेण्यास सांगावी. नंतर तीन किंवा दहा गायत्री जप करावा. हे सर्व प्राणाहुती मंत्र तैत्तिरीय आरण्यकातील आहेत.

२३ - श्रद्धासूक्त

श्रद्धयाग्निः समिध्येत श्रद्धया हूयते हविः ।

श्रद्धां भगस्य मूर्धनि वचसा वेदयामसि ।

प्रियं श्रद्धे ददतः प्रियं श्रद्धे दिदासतः ।

प्रियं भोजेषु यज्वस्विदं म उदितं कृधि ।

२४ - प्रार्थना

अपेक्षितं याचितव्यं त्याज्यं चैवानपेक्षितम ।

उपविश्य सुखेनैव भोक्तव्यं स्वस्थमानसैः ।

विद्यमानशाकपाकादिपदार्थेषु, यद्रोचते तद्‌ग्राह्यं,

यन्न रोचते तत्त्याज्यं, सुखेनैव भोक्तव्यम् ॥

ब्राह्मणाः - जुषामहे

कर्ता - यथाशक्ति पुरुषसूक्तरक्षोघ्नसूक्तान्याश्रावयिष्ये ।

ब्राह्मणा - श्रावण

(भोजनान्ते किंचिद्दध्योदनं गंगामृतं च दद्यात्‌ ।

२५ - तृप्तिप्रश्न

कर्ता - सर्वं संपूर्णम । सिद्धस्य हविषो मध्ये यद्रोचते तद्याचयध्वम् ।

ब्राह्मण - अलम् ।

कर्ता - मधुमतीः श्रावयिष्ये ।

ब्राह्मण - श्रावय ।

ॐ मदु वाता ऋतायते मधु क्षरन्ति सिन्धवः ।

माध्वीनः सन्त्वोषधीः ।

मधु नक्तमुतोषसो मधुमत पार्थिव रजः ।

मधु द्यौरस्तु नः पिता ।

मधुमान्नौ वनस्पतिमधुमॉं अस्तु सूर्यः ।

माध्वीर्गावो भवन्तु नः ।(ऋ. १. ९०. ६-८)

(अपसव्यम)

अक्षन्नमीमदन्त ह्यव प्रिया अधूषत ।

अस्ताषत स्वभानवो विप्रा नविष्ठ्या मती ।

योजा न्विन्द्र ते हरी ॥(ऋ. १. ८२. २)

कर्ता - "मम पितुः प्रतिसांवत्सरिक श्राद्धं संपन्नम ।

ब्राह्मण - सुसंपन्नम

कर्ता - (सव्यम) विश्वेदेवा; तृप्ताः स्थ

ब्राह्मण - 'तृप्ताः स्मः'।

कर्ता - (अपसव्यम्) 'पितृपितामहप्रपितामहाः तृप्ताः स्थ ।'

ब्राह्मण - तृप्ताः स्म ।

कर्ता - शेषमन्नं किं क्रियताम ।

ब्राह्मण - ( पिण्डार्थं विकिरार्थं चोद्‌धृत्य ) "इष्टै सह भुज्यताम् ।"

ब्राह्मणांनी 'भोजन झाले,' असे सांगितल्यावर तयार झालेल्या अन्नापैकी काही आवडीचे अन्न हवे असल्यास मागा अशी प्रार्थना कर्त्याने करावी. ब्राह्मणांनी 'आता आम्हास नको' असे 'अलग' शब्दाने प्रत्युत्तर द्यावे. नंतर यजमानाने मधुमती ऐकवितो म्हटल्यावर 'श्रावय' (ऐकीव) असे ब्राह्मणांनी प्रत्युत्तर द्यावे.

'अमक्याचे श्राद्ध संपूर्ण होवो, असे कत्याने म्हटल्यानंतर ब्राह्मणांनी सुसंपन्नम (संपूर्ण होवो) असे प्रतिवचन द्यावे.

सव्य करून, 'हे विश्वदेवहो, तुम्ही तृप्त व्हावे;' अशी प्रार्थना केल्यावर आम्ही तृप्त आहोत' असे देवस्थानीय ब्राह्मणांनी प्रतिवचन द्यावे.

अपसव्याने 'हे पिता-पितामह-प्रपितामहहो, तुम्ही तृप्त व्हावे,' अशी प्रार्थना केल्यावर पितृस्थानीय ब्राह्मणांनी 'आम्ही तृप्त आहोत,' असे प्रतिवचन द्यावे. नंतर यजमानाने ब्राह्मणास विचारावे, 'शिल्लक राहिलेल्या अन्नाचे काय करावे?' त्यावर ब्राह्मणांनी उत्तर द्यावे.' 'इष्टमित्रांसह भोजन करावे.'

N/A

References : N/A
Last Updated : February 08, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP