सूर्याच्या आरत्या - आरती तिमिर हारकाची । भवा...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


आरती तिमिर हारकाची । भवांबुधि भक्त तारकाची ॥ धृ. ॥

कवतिंन हरितवी तिवहनी । मूर्ति अनुवर्ति अर्तिदहनी ॥

पूर्ति भवहर्ति कीर्ति गहनी । कर्ति मनस्फुर्ति धूर्तिसहनीं ॥ चाल ॥

श्वेता सारंगधृत पाणे ।

प्रखरकर दुरित, तिमिर हरत्वरित, चरित, रसभरीत, हेति अदिलनुज कंदनाची ॥

मंजरी अमर वंदनाची ॥ १ ॥

खंडपाखंड चंडवीर्यां ॥ बंडखल दंडमंडनार्या ॥

भवांड: कृतांड पंडवर्यां । दंडधर थंडमार्तंड सूर्या । चाल ॥

मकरमणिहार कंठधारा ।

विशदयश उदय, विबुधवशह्रुदय, विपदवशसदय, विषय वर्णनीय कीर्ति ज्याची ॥ आरती ॥ २ ॥

शिष्टाविधि निष्ठपुष्ठ करणा । दुष्टआधि कुष्ठ क्लिष्ट हरणा ।

त्रिविष्टप सुपुष्टचरणा । नष्टअलि कष्ठश्रेष्ठ किरणा ॥ चाल ॥

अमर सारंगअंक कांता ।

हाटक पितपटी, घटिकटि तटी, भटीचटि पटी दिटी बटिउटि चंदनाची ॥

रेखिली पीत चंदनाची । आरती ॥ ३ ॥

दशमखरक्षक क्षमाधा । लक्षद्वीज पक्षन्हत्क्ष पाधा ।

लक्षगुण रक्षकभ वेधा । अभया क्षरक्षरा सुबोधा ॥ चाल ॥

कमल पत्राक्ष तीक्ष्णरश्मे ॥

त्रिदश गुरूवर, त्रिशिर सुखकर त्रिपथ परिकर, विविध गरहर त्रिगुणाची ।

मूर्ति निशिहर त्रिपुराची ॥ आरती. ॥ ४ ॥

मित्र मुनि पुत्र गात्र पूता । चित्रशत पत्र वऋधौता ।

छात्र सुखपात्र सौत्रभूता क्षेत्रघर नैत्रमात्र नीता ॥ चाल ॥

सकल रविदास कामदा हे ।

ललित गवजनन, गलितरवसुमन कलितभवशमन, चरणिं तव नमन योजण्याची ॥

आस मम पुरविं पाहण्याची ॥ आरती. ॥ ५ ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP