मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सतरावा|
श्लोक ५६ वा

एकनाथी भागवत - श्लोक ५६ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


यस्त्वासक्तमतिर्गेहे पुत्रवित्तैषणातुरः ।

स्त्रैणः कृपणधीर्मूढो ममाहमिति बध्यते ॥५६॥

जो गृहासक्तीं सुभटु । तो ईषणात्रयीं वरीष्ठु ।

जो विषयांलागी लंपटु । अतिलोभिष्ठ धनेच्छा ॥१६॥

जो विकारांचा अंकिला । जो अहंममतेचा पोसणा जाहला ।

जो स्त्रियेसी जीवें विकिला । तो मूढतेच्या पडिला महादुर्गी ॥१७॥

जो आशेचिया वणवणा । सर्वांगांचा वोळगणा ।

यालागीं बद्धतेचा जाणा । जाहला आंदणा जीवेंभावें ॥१८॥

तेचि बद्धतेची गती । त्याच्या मूर्खत्वाची वदंती ।

स्वयें सांगताहे श्रीपती । उद्धवाप्रती उद्देशें ॥१९॥

अहो मे पितरौ वृद्धौ भार्या बालात्मजाऽत्मजाः ।

अनाथा मामृते दीनाः कथं जीवन्ति दुःखिताः ॥५७॥

माता पिता वृद्धें केवळें । भार्या धाकुटी तान्हीं बाळें ।

मज होतां यांवेगळें । तेणेंची काळें मरतील ॥५२०॥

ऐशिया नानावस्था । आपुल्याही मरणापरता ।

वाहे कुटुंबाची चिंता । ऐक आतां सांगेन ॥२१॥

एखादेनि अकाळकाळें । मजचि जैं मरण आलें ।

तैं काय करितील स्त्रिया बाळें । आंसुवें डोळे लोटती ॥२२॥

मात्यापित्यांची पडो वाट । स्त्रियेसी होईल हृदयस्फोट ।

बाळांचा शोषेल कंठ । पिटी ललाट तेणें दुःखें ॥२३॥

मज निमालियाअंतीं । हीं अतिदुःखी कैशीं जीती ।

ऐशी जीतांची करी खंती । मूढमति यालागीं ॥२४॥

गाढ मूढतेचें भरितें । अपार उथळलें जेथें ।

विवेकाचें तारूं तेथें । विपरीतार्थे बुडालें ॥२५॥


References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP